• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

सैनिक शेतकरी वेलफेयर फाउंडेशनचा भव्य मेळावा; सांगलीत एकाचवेळी ७०० शाखांचा शुभारंभ

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 15, 2026
in ताज्या घडामोडी
0
सैनिक शेतकरी वेलफेयर फाउंडेशनचा भव्य मेळावा; सांगलीत एकाचवेळी ७०० शाखांचा शुभारंभ
0
SHARES
36
VIEWS
Ad 1
Ad 1

कडेगाव (प्रतिनिधी) :
समाज, सैनिक आणि शेतकऱ्यांच्या हक्कासाठी कार्य करण्याच्या उद्देशाने सैनिक शेतकरी वेलफेयर फाउंडेशनच्या वतीने कडेगाव येथे भव्य मेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्यात सांगली जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये एकाच वेळी तब्बल ७०० शाखांचा शुभारंभ संस्थापक अध्यक्ष मेजर मनोजकुमार डांगे यांच्या हस्ते करण्यात आला.

या कार्यक्रमाला फाउंडेशनचे उपाध्यक्ष निलेश निकम, सचिव संजय सतई, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष रमेश पाटील, महिला सक्षमीकरण प्रमुख स्वाती बोराटे, जिल्हाध्यक्ष जयंत मैदानकर, महिला जिल्हाध्यक्ष मनीषा वाघमोडे, आरोग्य महासंचालक चंद्रकांत पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

RelatedPosts

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

यावेळी बोलताना संस्थापक मनोजकुमार डांगे यांनी फाउंडेशनमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती दिली. सैनिक शेतकरी सुकन्या योजना, अंतिम सन्मान योजना, आरोग्य योद्धा उपक्रम, व्यसनमुक्ती अभियान, कचरा मुक्त भारत अशा योजनांच्या माध्यमातून ग्रामीण भागात रोजगारनिर्मिती व महिला सक्षमीकरण साध्य करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, सैनिक आणि शेतकऱ्यांनी संघटन बळकट करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

मीडिया प्रमुख नारायण वाघमोडे यांनी सांगितले की, राज्यभर पाच हजारांहून अधिक शाखा असलेल्या या फाउंडेशनने सांगली जिल्ह्यात एकाचवेळी ७०० शाखांचा शुभारंभ करून नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.

या मेळाव्यासाठी तासगाव, खानापूर, जत, कवठेमहांकाळ, वाळवा, शिराळा, आटपाडी, कडेगाव आदी तालुक्यांमधील पदाधिकारी, महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम उत्साहात व शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला.

Ad 1
Previous Post

नेरूळमध्ये आंबेडकर जयंतीनिमित्त अभिवादन; समता, न्याय व बंधुतेचा संदेश

Next Post

सावता सेनेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अभिवादन

Related Posts

ताज्या घडामोडी

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

October 11, 2026
25
ताज्या घडामोडी

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

October 11, 2026
4
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
11
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
6
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
26
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
Next Post
सावता सेनेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अभिवादन

सावता सेनेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अभिवादन

ताज्या बातम्या

पत्री सरकार १९४२’ : स्वातंत्र्यलढ्याचा धगधगता इतिहास आता रुपेरी पडद्यावर…!

पत्री सरकार १९४२’ : स्वातंत्र्यलढ्याचा धगधगता इतिहास आता रुपेरी पडद्यावर…!

October 14, 2026
आजऱ्यात शिंदे सेनेच्या मेळाव्यात गोकुळच्या सत्तेसाठी महायुतीचा आत्मविश्वास, 25-0 विजयाचा पालकमंत्र्यांचा दावा

आजऱ्यात शिंदे सेनेच्या मेळाव्यात गोकुळच्या सत्तेसाठी महायुतीचा आत्मविश्वास, 25-0 विजयाचा पालकमंत्र्यांचा दावा

October 14, 2026
गजानन महाराज भक्तांच्या सुखकर प्रवासासाठी एसटीच्या अधिकाऱ्यांची बैठक, आमदारांनी केल्या सूचना

गजानन महाराज भक्तांच्या सुखकर प्रवासासाठी एसटीच्या अधिकाऱ्यांची बैठक, आमदारांनी केल्या सूचना

October 14, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In