• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

खेड पिंपरी गावात प्रथमच सर्वधर्मसमभावातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव संपन्न

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 15, 2026
in ताज्या घडामोडी
0
खेड पिंपरी गावात प्रथमच सर्वधर्मसमभावातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव संपन्न
0
SHARES
59
VIEWS
Ad 1

नांदगाव खंडे, ता. (प्रतिनिधी):
अमरावती जिल्ह्यातील मौजा खेड पिंपरी येथे यंदा प्रथमच सर्वधर्मसमभावातून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. गावात यापूर्वी जयंती कार्यक्रम मर्यादित स्वरूपात होत असताना, यंदा सरपंच मंगेश हंसराज कांबळे यांच्या पुढाकारातून भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले.

यासाठी मंगरूळ चव्हाळा पोलीस ठाण्याशी समन्वय साधून परवानगी घेण्यात आली. जयंतीनिमित्त १३ एप्रिल रोजी सुमारे १००० ग्रामस्थांसाठी भोजनदानाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच गावात एकोपा वाढविण्याच्या उद्देशाने सर्वधर्मसमभाव रॅली काढण्यात आली, ज्यात सर्व धर्मीय नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.

RelatedPosts

मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू

ज्येष्ठ पत्रकार मनीष मुथा यांना ‘संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार’ प्रदान

अमळनेर हादरले! टाकरखेड्यात पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची रेल्वेखाली सामूहिक आत्महत्या; एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत

मिरवणुकीदरम्यान विविध ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. नवउत्सव दुर्गा महिला मंडळाच्या वतीने चहा-नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली होती. विशेष म्हणजे ही मिरवणूक सर्व धर्मीय नागरिकांच्या वर्गणीतून आयोजित करण्यात आली होती. धार्मिक गीतांच्या माध्यमातून एकात्मतेचा संदेश देत बाबासाहेबांना मानवंदना अर्पण करण्यात आली.

“गावातील जाती-धर्म भेद विसरून सर्वांनी एकत्र येऊन महामानवांच्या जयंती साजऱ्या केल्यास गावाच्या विकासाला चालना मिळते,” असे प्रतिपादन सरपंच मंगेश कांबळे यांनी यावेळी केले.

कार्यक्रम सुरळीत पार पडण्यासाठी मंगरूळ चव्हाळा येथील पोलीस अधिकारी श्रृंगारे यांचे सहकार्य लाभले. तसेच मिरवणुकीसाठी मोफत ट्रॅक्टर उपलब्ध करून देणारे प्रवीण इंगळे, चालक अक्षय जाधव, तसेच चहा-पाणी व्यवस्था करणारे गौरव चौधरी व संतोष चौधरी यांचा सत्कार सद्धम्म महिला मंडळाच्या वतीने करण्यात आला.

या भव्य जयंती उत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी सद्धम्म महिला मंडळ, युवक कार्यकर्ते आणि ग्रामस्थांनी मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमानंतर गावात एकोप्याचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

यावेळी सत्यशील इंगळे, अजय वाघमारे, हंसराज कांबळे, तुळशीदास खांडेकर, रामदास खांडेकर, सुरेश कांबळे, श्रीकृष्ण देशकर, संदीप पाटील, दिलीप किर्दक, शंकर वाघमारे, प्रशांत पाटील, सिद्धार्थ कांबळे, सचिन काकडे, गणेश चहांदे तसेच प्रतिमा वाघमारे, उज्वला किर्दक, कांताबाई इंगळे, मंगला कांबळे, संगीता खांडेकर, सुहाना पाटील, कुसुम खांडेकर, कौशल कांबळे, वर्षा अंबाडारे, प्रतिमा जवंजळ आदींसह महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: Mangesh Kamble
Previous Post

सुरेगाव (गंगा) येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

Next Post

आ. संग्राम थोपटे यांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

Related Posts

ताज्या घडामोडी

मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू

September 3, 2026
9
ताज्या घडामोडी

ज्येष्ठ पत्रकार मनीष मुथा यांना ‘संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार’ प्रदान

August 27, 2026
7
ताज्या घडामोडी

अमळनेर हादरले! टाकरखेड्यात पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची रेल्वेखाली सामूहिक आत्महत्या; एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत

August 27, 2026
16
ताज्या घडामोडी

खवशी तलावात बुडून बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू; मुलाला वाचवताना वडिलांचाही जीव गेला

August 27, 2026
4
ताज्या घडामोडी

ईद मिलादुन्नबी निमित्त अमळनेरात भव्य जुलूस; हजारो भाविकांचा सहभाग

August 27, 2026
6
ताज्या घडामोडी

सासवड येथे गणेशोत्सव व दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक

August 27, 2026
93
Next Post
आ. संग्राम थोपटे यांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

आ. संग्राम थोपटे यांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

ताज्या बातम्या

मानवत तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ७० हजारांची मदत द्या;

मानवत तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ७० हजारांची मदत द्या;

September 4, 2026
एम.एस.जी.एस. इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शिक्षक दिन व दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा.

एम.एस.जी.एस. इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शिक्षक दिन व दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा.

September 4, 2026
सिडकोच्या घरांची किंमत अडीच लाखांनी कमी होणार; खारघर, कळंबोली व तळोजातील विजेत्यांसाठी सुवर्णसंधी

सिडकोच्या घरांची किंमत अडीच लाखांनी कमी होणार; खारघर, कळंबोली व तळोजातील विजेत्यांसाठी सुवर्णसंधी

September 4, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In