• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

उन्हाचा तडाखा वाढला; लहान बालकांच्या आरोग्याची घ्या विशेष काळजी – बालरोग तज्ञ डॉ. विठ्ठल काळे यांचा इशारा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 18, 2026
in ताज्या घडामोडी
0
उन्हाचा तडाखा वाढला; लहान बालकांच्या आरोग्याची घ्या विशेष काळजी – बालरोग तज्ञ डॉ. विठ्ठल काळे यांचा इशारा
0
SHARES
22
VIEWS
Ad 1
Ad 1

[]कॉटनचे सैल कपडे, भरपूर द्रवपदार्थ आणि दुपारच्या उन्हापासून दूर ठेवणे अत्यावश्यक[]

RelatedPosts

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

मानवत : प्रतिनिधी अहमद अन्सारी पाथरी परभणी

दिनांक १६एप्रिल
राज्यात तसेच मानवत शहरात सध्या उन्हाचा पारा मोठ्या प्रमाणात वाढला असून उष्णतेचा तीव्र परिणाम नागरिकांवर जाणवत आहे. विशेषतः लहान बालकांसाठी हा काळ अधिक धोकादायक ठरू शकतो. त्यामुळे बालकांच्या आरोग्याची योग्य काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे, असे मत मानवत येथील सुप्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉ. विठ्ठल काळे यांनी व्यक्त केले आहे…..
डॉ. काळे यांनी सांगितले की, लहान मुलांची शारीरिक प्रतिकारशक्ती कमी असते तसेच त्यांची त्वचा अतिशय नाजूक असते. त्यामुळे उष्णतेमुळे त्यांना त्वचारोग, घामोळे, उष्माघात (हीट स्ट्रोक), तसेच शरीरातील पाण्याची कमतरता (डिहायड्रेशन) यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. काही वेळा ही स्थिती गंभीर होऊ शकते, त्यामुळे पालकांनी विशेष सतर्कता बाळगणे गरजेचे आहे.
उन्हाळ्यात बालकांना सैल, हलक्या रंगाचे आणि कॉटनचे कपडे परिधान करणे अत्यंत आवश्यक आहे. सिंथेटिक किंवा घट्ट कपडे टाळावेत. कॉटन कपड्यांमुळे शरीराला हवा खेळती राहते आणि घाम शोषला जातो, त्यामुळे त्वचेचे विकार टाळता येतात…..

सकाळी १२ ते दुपारी ०४ या वेळेत उन्हाची तीव्रता सर्वाधिक असते. या काळात बालकांना घराबाहेर नेणे टाळावे. अत्यावश्यक असल्यास डोक्यावर टोपी, छत्री किंवा कापड वापरून संरक्षण करावे….
बालकांच्या शरीरात पाण्याची कमतरता होऊ नये यासाठी वेळोवेळी पाणी, दूध, लस्सी, ताक यांसारखे द्रवपदार्थ द्यावेत. नवजात बालकांसाठी आईचे दूध हेच सर्वोत्तम असल्याचे त्यांनी नमूद केले….
घर थंड व हवेशीर ठेवणे गरजेचे आहे. थेट सूर्यप्रकाश बालकांवर पडणार नाही याची काळजी घ्यावी. पंखा, कूलर किंवा आवश्यक असल्यास एसीचा योग्य वापर करावा; मात्र थंड वातावरण अचानक बदलू देऊ नये…..
बालकांमध्ये सतत रडणे, अंग गरम होणे, अशक्तपणा, उलट्या, जुलाब किंवा भूक न लागणे अशी लक्षणे दिसल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असेही डॉ. काळे यांनी सांगितले…..
उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर लहान मुलांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करणे धोकादायक ठरू शकते. साध्या गोष्टींची काळजी घेतल्यास अनेक आजार टाळता येऊ शकतात. त्यामुळे सर्व पालकांनी जागरूक राहून बालकांचे संरक्षण करावे, असे आवाहन डॉ. विठ्ठल काळे यांनी केले आहे……

Ad 1
Tags: Ahamad Ansari
Previous Post

देवीभोयरे येथे गोमातेची ‘व्हीआयपी’ सेवा; भक्तीचे दर्शन

Next Post

शांताबाई नखाते विद्यालय पाथरी येथे महात्मा ज्योतिबा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

Related Posts

ताज्या घडामोडी

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

October 11, 2026
25
ताज्या घडामोडी

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

October 11, 2026
4
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
15
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
8
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
32
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
Next Post
शांताबाई नखाते विद्यालय पाथरी येथे महात्मा ज्योतिबा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

शांताबाई नखाते विद्यालय पाथरी येथे महात्मा ज्योतिबा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

ताज्या बातम्या

न्यू हायस्कूल उळूप तालुका भूम येथे कायदेविषयक शिबीर मोठ्या उत्साहात पार पडले.

न्यू हायस्कूल उळूप तालुका भूम येथे कायदेविषयक शिबीर मोठ्या उत्साहात पार पडले.

October 18, 2026
माढा तालुक्यात चारा छावणी व पिण्याच्या पाण्यासाठी बालाजी बारबोले पाटील यांचे बेमुदत अन्नत्याग उपोषण

माढा तालुक्यात चारा छावणी व पिण्याच्या पाण्यासाठी बालाजी बारबोले पाटील यांचे बेमुदत अन्नत्याग उपोषण

October 18, 2026

कानळदा-जळगाव रस्त्यावर बेकायदेशीर वाळू वाहतूक पकडली; डंपरसह ५.४८ लाखांचा मुद्देमाल जप्त

October 18, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In