• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कोट्यवधींची इमारत; पाटणबोरी आरोग्य केंद्रात सेवा मात्र तोकडी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 21, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
10
VIEWS
Ad 1

पांढरकवडा (प्रतिनिधी) :
पांढरकवडा तालुक्यातील पाटणबोरी या सुमारे १२ हजार लोकसंख्या असलेल्या मोठ्या ग्रामपंचायतीत कोट्यवधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत सुसज्ज असली, तरी प्रत्यक्षात आरोग्यसेवा अत्यंत अपुरी असल्याचे चित्र समोर आले आहे.

२४ तास सेवा केवळ कागदोपत्री

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४लगत असलेल्या पाटणबोरी परिसरात वारंवार अपघात होतात. मात्र सायंकाळनंतर आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नसल्याने जखमी रुग्णांना तातडीची मदत मिळण्यात अडथळे येतात. केंद्रात केवळ एकच डॉक्टर असून इतर कर्मचारीही अपुरे असल्याने सेवा विस्कळीत होते.
रुग्ण आल्यास आरोग्य सेवक किंवा डॉक्टरांना फोन करून बोलवावे लागते, अशी परिस्थिती आहे.

RelatedPosts

मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू

ज्येष्ठ पत्रकार मनीष मुथा यांना ‘संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार’ प्रदान

अमळनेर हादरले! टाकरखेड्यात पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची रेल्वेखाली सामूहिक आत्महत्या; एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत

रिक्त पदांमुळे अडचणी वाढल्या

गेल्या ३ ते ४ वर्षांपासून येथे कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी नाहीत. अनेक पदे रिक्त असल्याने रुग्णांना योग्य उपचार मिळत नाहीत. सध्या तात्पुरत्या स्वरूपात डॉक्टर नेमण्यात आले असले, तरी ते अपुरे ठरत आहेत.

मूलभूत सुविधांचा अभाव

आरोग्य केंद्रात आवश्यक औषधसाठा, पॅथॉलॉजी लॅब, तसेच प्रसूती कक्षातील सुविधा उपलब्ध नाहीत. त्यामुळे गंभीर रुग्णांना स्वतःच्या खर्चाने पांढरकवडा किंवा आदिलाबाद येथे हलवावे लागते.

गर्भवती महिलांची परवड

आरोग्य केंद्रात सोनोग्राफी सुविधा नसल्यामुळे गर्भवती महिलांना ४० ते ५० किलोमीटर अंतर पार करून पांढरकवडा येथे जावे लागते.
अलीकडेच रविवारी रात्री ६ ते ७ गर्भवती महिला सोनोग्राफीसाठी केंद्रात आल्या असता, केंद्र बंद असल्याने त्यांना खासगी वाहनाने पांढरकवडा गाठावे लागले. या प्रकारामुळे महिलांना मोठा त्रास सहन करावा लागला.

प्रशासनाकडे लक्ष वेधण्याची मागणी

वेळेत उपचार न मिळाल्यास रुग्णांची परिस्थिती गंभीर होऊ शकते, त्यामुळे प्रशासनाने तात्काळ लक्ष देऊन कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी व आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Tags: Vishal Halavale
Previous Post

संघर्षातून उभा राहिलेला यशाचा क्षण; TISS पदवीदान सोहळ्यात कुणाल राऊत यांचा सन्मान

Next Post

नाफेड चणा खरेदी केंद्रावर बारदाना टंचाई; शेतकरी अडचणीत, युवक काँग्रेसचे निवेदन

Related Posts

ताज्या घडामोडी

मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू

September 3, 2026
9
ताज्या घडामोडी

ज्येष्ठ पत्रकार मनीष मुथा यांना ‘संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार’ प्रदान

August 27, 2026
7
ताज्या घडामोडी

अमळनेर हादरले! टाकरखेड्यात पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची रेल्वेखाली सामूहिक आत्महत्या; एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत

August 27, 2026
16
ताज्या घडामोडी

खवशी तलावात बुडून बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू; मुलाला वाचवताना वडिलांचाही जीव गेला

August 27, 2026
4
ताज्या घडामोडी

ईद मिलादुन्नबी निमित्त अमळनेरात भव्य जुलूस; हजारो भाविकांचा सहभाग

August 27, 2026
6
ताज्या घडामोडी

सासवड येथे गणेशोत्सव व दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक

August 27, 2026
93
Next Post
नाफेड चणा खरेदी केंद्रावर बारदाना टंचाई; शेतकरी अडचणीत, युवक काँग्रेसचे निवेदन

नाफेड चणा खरेदी केंद्रावर बारदाना टंचाई; शेतकरी अडचणीत, युवक काँग्रेसचे निवेदन

ताज्या बातम्या

मानवत तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ७० हजारांची मदत द्या;

मानवत तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ७० हजारांची मदत द्या;

September 4, 2026
एम.एस.जी.एस. इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शिक्षक दिन व दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा.

एम.एस.जी.एस. इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शिक्षक दिन व दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा.

September 4, 2026
सिडकोच्या घरांची किंमत अडीच लाखांनी कमी होणार; खारघर, कळंबोली व तळोजातील विजेत्यांसाठी सुवर्णसंधी

सिडकोच्या घरांची किंमत अडीच लाखांनी कमी होणार; खारघर, कळंबोली व तळोजातील विजेत्यांसाठी सुवर्णसंधी

September 4, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In