• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

लोकनेते स्व. संजय देवतळे स्मृतीदिनानिमित्त वरोरा येथे भव्य आरोग्य व रक्तदान शिबिर

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 24, 2026
in Blog
0
लोकनेते स्व. संजय देवतळे स्मृतीदिनानिमित्त वरोरा येथे भव्य आरोग्य व रक्तदान शिबिर
0
SHARES
51
VIEWS
Ad 1

वरोरा (प्रतिनिधी) – जनतेच्या प्रश्नांसाठी आयुष्यभर झटणारे, गरिबांचे आधारवड ठरलेले लोकनेते तथा माजी मंत्री संजय देवतळे यांच्या स्मृतीदिनानिमित्त २५ एप्रिल २०२६ रोजी वरोरा येथे भव्य नि:शुल्क सर्व रोगनिदान व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमातून हजारो नागरिकांना मोफत व दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध होणार आहे.

स्व. देवतळे यांनी आपल्या कार्यकाळात वंचित, दुर्लक्षित आणि गरजू घटकांसाठी उल्लेखनीय कार्य केले होते. त्यांच्या सेवाभावी कार्याला अभिवादन म्हणून आयोजित या शिबिरातून “सेवाच खरा धर्म” हा संदेश अधिक दृढ होत आहे.

RelatedPosts

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

या शिबिरामध्ये मधुमेह, रक्तदाब व हृदयविकार तपासणी, स्तन व गर्भाशय कर्करोग निदान, मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया, हर्निया तसेच इतर आजारांचे निदान, ईसीजी व विविध रक्त तपासण्या पूर्णपणे मोफत करण्यात येणार आहेत. याशिवाय भव्य रक्तदान शिबिर, आयुष्यमान कार्ड वितरण आणि विविध शासकीय आरोग्य योजनांची माहिती नागरिकांना दिली जाणार आहे.

सदर शिबिर २५ एप्रिल रोजी उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय, वरोरा (जि. चंद्रपूर) येथे सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत पार पडणार आहे. या उपक्रमाचे विनीत आमदार करण संजय देवतळे असून, स्व. संजय देवतळे मित्र परिवार आणि उपजिल्हा रुग्णालय, वरोरा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन करण्यात आले आहे.

नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या मोफत आरोग्य व रक्तदान शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

Previous Post

आमडदे येथे फिरते विधी न्यायालय व कायदेविषयक जनजागृती शिबिर संपन्न

Next Post

माहूर तालुक्यात ग्रामसेवकांच्या गैरहजेरीवर संताप; पत्रकार संघाकडून कारवाईची मागणी

Related Posts

Blog

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
0
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी
Blog

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026
3
Blog

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026
41
Blog

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026
13
Blog

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पेणमध्ये वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांची विशेष दक्षता

September 15, 2026
4
गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
6
Next Post
माहूर तालुक्यात ग्रामसेवकांच्या गैरहजेरीवर संताप; पत्रकार संघाकडून कारवाईची मागणी

माहूर तालुक्यात ग्रामसेवकांच्या गैरहजेरीवर संताप; पत्रकार संघाकडून कारवाईची मागणी

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In