• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

माहूर तालुक्यात ग्रामसेवकांच्या गैरहजेरीवर संताप; पत्रकार संघाकडून कारवाईची मागणी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 24, 2026
in ताज्या घडामोडी
0
माहूर तालुक्यात ग्रामसेवकांच्या गैरहजेरीवर संताप; पत्रकार संघाकडून कारवाईची मागणी
0
SHARES
56
VIEWS
Ad 1

माहूर (प्रतिनिधी) – तालुक्यातील अनेक गावांमध्ये ग्रामसेवक नियमितपणे उपस्थित राहत नसल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचा गंभीर आरोप करत निर्भय व युवा ग्रामीण पत्रकार संघाने पंचायत समिती कार्यालयात गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, माहूर तालुक्यातील बहुतांश ग्रामसेवक हे सोमवार ते शुक्रवार या नियोजित कामकाजाच्या दिवसांमध्ये गावात हजर राहत नाहीत. काही ग्रामसेवक आठवड्यातून केवळ एकदाच किंवा पंधरा दिवसांतून एक-दोन वेळाच गावात येतात. यामुळे नागरिकांची विविध शासकीय कामे रखडत असून त्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

RelatedPosts

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

विशेषतः गरीब व गरजू नागरिकांची प्रमाणपत्रे, योजना अर्ज आणि इतर अत्यावश्यक कामे वेळेत पूर्ण होत नसल्याने त्यांची गैरसोय वाढत आहे. त्यामुळे ग्रामसेवकांनी नियमानुसार आठवड्यातील सर्व कामकाजाच्या दिवशी आपल्या संबंधित गावात उपस्थित राहणे बंधनकारक करावे, अशी मागणी संघटनेने केली आहे.

तसेच, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ग्रामसेवकांवर प्रशासनाने कठोर कारवाई करावी, अन्यथा पुढील काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. या निवेदनामुळे तालुक्यातील ग्रामपातळीवरील प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Previous Post

लोकनेते स्व. संजय देवतळे स्मृतीदिनानिमित्त वरोरा येथे भव्य आरोग्य व रक्तदान शिबिर

Next Post

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त एरंडोल येथे शीतपेय वाटपाचा उपक्रम

Related Posts

ताज्या घडामोडी

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

September 10, 2026
101
ताज्या घडामोडी

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

September 10, 2026
192
ताज्या घडामोडी

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

September 10, 2026
4
ताज्या घडामोडी

म्हसळा पोलीस ठाण्याची इमारत भव्य व्हावी; मात्र नागरिकांना येथे येण्याची वेळ कमी यावी

September 10, 2026
3
ताज्या घडामोडी

गणरायाच्या आगमनाची लगबग; चामोर्शीत गणेशमूर्तींना अंतिम रूप

September 10, 2026
2
ताज्या घडामोडी

आदित्य यशवंत घरत यांची उरण तालुका काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी निवड

September 10, 2026
3
Next Post
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त एरंडोल येथे शीतपेय वाटपाचा उपक्रम

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त एरंडोल येथे शीतपेय वाटपाचा उपक्रम

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In