• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कोट्यवधी खर्च तरी रस्ता भंगार! मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचा बोजवारा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 24, 2026
in ताज्या घडामोडी
0
कोट्यवधी खर्च तरी रस्ता भंगार! मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचा बोजवारा
0
SHARES
182
VIEWS
Ad 1

वार्ताहर : दहेगाव
मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत देवधरी फाटा ते दहेगाव रस्त्याच्या निकृष्ट दर्जाच्या कामाबाबत तात्काळ चौकशी, काम बंद व संबंधितांवर कठोर कारवाई करण्याबाबत दहेगाव येथील ग्रामस्थानी तक्रारिचे निवेदन दिले.

मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या देवधरी फाटा ते दहेगाव या अत्यंत महत्त्वाच्या रस्त्याचे बांधकाम सध्या सुरू आहे. मात्र प्रत्यक्ष पाहणीअंती असे निदर्शनास येत आहे की, सदर काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असून आवश्यक तांत्रिक निकष व गुणवत्तेचे पालन होत नाही. यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे . दहेगावात कमिशन मजबूत , रस्ता कमकुवत झाला असून याबाबत रस्त्या बांधकामामध्ये मोठ्याप्रमाणात भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप गावकऱ्यांनी व्यक्त केला आहे.

RelatedPosts

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर


दहेगाव येथे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत करण्यात आलेल्या रस्त्याच्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप ग्रामस्थांकडून होत आहे. लाखो रुपयांचा निधी खर्च करूनही रस्ता काही महिन्यांतच उखडू लागल्याने कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
स्थानिकांनी संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली असून, संपूर्ण कामाची चौकशी व्हावी अशी मागणी जोर धरत आहे. मात्र अद्याप प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे
मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेवर प्रश्न चिन्ह उमटले आहे .

सदर रस्ता हा दहेगावसाठी जीवनवाहिनीच मानला जातो. ग्रामस्थ, शेतकरी, विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच आपत्कालीन सेवांसाठी (रुग्णवाहिका इ.) हा एकमेव प्रमुख मार्ग आहे. असे असताना संबंधित ठेकेदाराकडून कोणतीही पर्यायी रस्त्याची व्यवस्था करण्यात आलेली नाही. परिणामी नागरिकांना प्रचंड गैरसोय, त्रास व जीवितास धोका निर्माण झाला आहे. येणाऱ्या पावसाळ्यात ही परिस्थिती अधिकच बिकट होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही.


या बाबतचे निवेदन दहेगाव येथील युवराज चटकी (शिवसेना विभाग प्रमुख वडकी),रामाजी डाहुले ,प्रशांत काकडे ,सागर पावडे ,सुमित भुते,कुणाल हरबडे ,अक्षय हरबडे ,तेजस डाहुले,अनिकेत बदखल
यांनी तक्रारी चे निवेदन जिल्हाधिकारी साहेबाना दिले आहे

Tags: Aniket Badkhal
Previous Post

जनगणना यशस्वी करण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा : कोमल सावरे

Next Post

तळोजा MIDC मधील साफोर्ड कंपनीत भरघोस पगारवाढ; कामगार संघटनेचा ऐतिहासिक करार

Related Posts

ताज्या घडामोडी

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

September 10, 2026
102
ताज्या घडामोडी

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

September 10, 2026
193
ताज्या घडामोडी

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

September 10, 2026
4
ताज्या घडामोडी

म्हसळा पोलीस ठाण्याची इमारत भव्य व्हावी; मात्र नागरिकांना येथे येण्याची वेळ कमी यावी

September 10, 2026
3
ताज्या घडामोडी

गणरायाच्या आगमनाची लगबग; चामोर्शीत गणेशमूर्तींना अंतिम रूप

September 10, 2026
2
ताज्या घडामोडी

आदित्य यशवंत घरत यांची उरण तालुका काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी निवड

September 10, 2026
3
Next Post
तळोजा MIDC मधील साफोर्ड कंपनीत भरघोस पगारवाढ; कामगार संघटनेचा ऐतिहासिक करार

तळोजा MIDC मधील साफोर्ड कंपनीत भरघोस पगारवाढ; कामगार संघटनेचा ऐतिहासिक करार

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In