• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

अहमदपूर तालुक्यात अवैध दारू वाहतुकीवर पोलिसांची धाड; वाहनासह ९.९६ लाखांचा मुद्देमाल जप्त

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 26, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
17
VIEWS
Ad 1

अहमदपूर (जि. लातूर), दि. २३ एप्रिल २०२६ (गुरुवार) : अवैध विदेशी मद्याची वाहतूक व विक्री रोखण्यासाठी अहमदपूर पोलिसांनी विशेष मोहीम राबवत मोठी कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी अरविंद रायबोले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या कारवाईत पोलिसांनी वाहनासह एकूण सुमारे ९ लाख ९६ हजार ८४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

गुप्त माहितीनुसार पोलिस पथकाने शहरातील प्रमुख मार्गावर सापळा रचून पाळत ठेवली होती. त्यावेळी एमएच 24 BX 0200 क्रमांकाची संशयित कार थांबवून तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान वाहनात विविध नामांकित कंपन्यांच्या विदेशी मद्याच्या ९ बॉक्ससह काही सुट्या बाटल्या आढळून आल्या. जप्त मद्यसाठ्याची किंमत सुमारे ९६ हजार ८४० रुपये असून, वाहतुकीसाठी वापरलेली अंदाजे ९ लाख रुपये किमतीची कारही पोलिसांनी ताब्यात घेतली.

RelatedPosts

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

या प्रकरणी अहमदपूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २२०/२०२६ नोंदविण्यात आला असून, महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ६५ (अ)(इ), ८१ व ८३ अन्वये संजीव ज्ञानोबा सुडे, फिरोज मुसामिया मनियार (दोघे रा. लातूर) तसेच बंटी शेट (जिद्द वाईन शॉप) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस पथकातील अभिमन्यू रेचवाड, धर्मपाल गुट्टे, सुग्रीव देवळे व इतर कर्मचाऱ्यांनी समन्वयाने पार पाडली असून पुढील तपास सुरू आहे.

Tags: Vinod Munde
Previous Post

सुशिक्षित बेरोजगारीमुळे मारेगाव तालुक्यात चोरीच्या घटनांत वाढ; नागरिकांची चिंता वाढली

Next Post

पाखंड खंडनाचे कार्य वारकरीच करू शकतो; शेळप येथे पाचवे वारकरी कीर्तन संमेलन उत्साहात संपन्न

Related Posts

ताज्या घडामोडी

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

September 10, 2026
101
ताज्या घडामोडी

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

September 10, 2026
192
ताज्या घडामोडी

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

September 10, 2026
4
ताज्या घडामोडी

म्हसळा पोलीस ठाण्याची इमारत भव्य व्हावी; मात्र नागरिकांना येथे येण्याची वेळ कमी यावी

September 10, 2026
3
ताज्या घडामोडी

गणरायाच्या आगमनाची लगबग; चामोर्शीत गणेशमूर्तींना अंतिम रूप

September 10, 2026
2
ताज्या घडामोडी

आदित्य यशवंत घरत यांची उरण तालुका काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी निवड

September 10, 2026
3
Next Post
पाखंड खंडनाचे कार्य वारकरीच करू शकतो; शेळप येथे पाचवे वारकरी कीर्तन संमेलन उत्साहात संपन्न

पाखंड खंडनाचे कार्य वारकरीच करू शकतो; शेळप येथे पाचवे वारकरी कीर्तन संमेलन उत्साहात संपन्न

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In