• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पाखंड खंडनाचे कार्य वारकरीच करू शकतो; शेळप येथे पाचवे वारकरी कीर्तन संमेलन उत्साहात संपन्न

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 26, 2026
in ताज्या घडामोडी
0
पाखंड खंडनाचे कार्य वारकरीच करू शकतो; शेळप येथे पाचवे वारकरी कीर्तन संमेलन उत्साहात संपन्न
0
SHARES
9
VIEWS
Ad 1

आजरा : प्रतिनिधी

आजच्या समाजात वाढत्या अपप्रवृत्ती, ढोंगीपणा आणि स्वयंघोषित बाबांच्या प्रभावामुळे समाजात गोंधळाचे वातावरण निर्माण होत आहे. अशा परिस्थितीत पाखंड खंडनाचे प्रभावी कार्य केवळ वारकरी संप्रदायच करू शकतो, असे प्रतिपादन संत साहित्य अभ्यासक प्रा. शिवाजी भुकेले यांनी केले. शेळप (ता. आजरा) येथे सारथी चॅरिटेबल ट्रस्ट, गडहिंग्लज व समस्त आजरा तालुका वारकरी संप्रदाय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पाचवे वारकरी कीर्तन संमेलन उत्साहात पार पडले. या संमेलनात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते.

RelatedPosts

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोकुळच्या संचालिका श्रीमती अंजनाताई रेडेकर होत्या, तर स्वागताध्यक्ष म्हणून प्रा. सुनील शिंत्रे यांनी जबाबदारी सांभाळली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त या संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. गडहिंग्लज, आजरा व चंदगड तालुक्यातील वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात ध्वज पूजन, ग्रंथ पूजन व व्यासपीठ पूजनाने करण्यात आली.

प्रा. भुकेले यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की, काम, क्रोध, लोभ, मत्सर यांसारख्या विकारांवर नियंत्रण मिळवणे हेच खरे कीर्तन आहे. हरिपाठ, कीर्तन आणि प्रवचनातून मिळणारे आत्मिक समाधान हेच खरे स्वास्थ्य असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. महाराष्ट्र ही संतांची भूमी असून ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव यांच्या विचारांची आजही समाजाला गरज आहे, असे त्यांनी नमूद केले.

प्रा. सुनील शिंत्रे यांनी बाळासाहेब ठाकरे जन्मशताब्दीनिमित्त वर्षभर विविध सामाजिक, शैक्षणिक व आध्यात्मिक उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती दिली. या संमेलनात सामूहिक हरिपाठ व वारकरी सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. हभप ज्ञानेश्वर बंडगर महाराज यांच्या कीर्तनाचा लाभ घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली. ‘रामकृष्ण हरी वारकरी सांप्रदायिक संस्था’तर्फे सादर करण्यात आलेल्या हरिपाठात महिलांचा सहभाग विशेष लक्षणीय होता

यावेळी व्यासपीठावर संभाजी पाटील, विमल पाटील, अविनाश शिंदे, सरपंच अर्जुन बागडी, गौरव सुतार, सोमगोंडा देसाई, पार्थ शिंत्रे, पृथ्वी शिंत्रे, मुख्याध्यापक संजय बापट, कृष्ण डाकरे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक युवराज पवार यांनी केले, सूत्रसंचालन दिनकर खवरे यांनी केले, तर आभार प्रा. डॉ. सुनील देसाई यांनी मानले.

“नाचायचे असेल तर कीर्तनात नाचा!”
युवकांना संदेश देताना प्रा. भुकेले म्हणाले की, बेभान होऊन नाचण्यापेक्षा कीर्तनात तल्लीन होऊन सहभागी व्हा. हरी हा केवळ जनात नव्हे तर मनात असावा आणि वारकऱ्यांप्रमाणे समाजातील वाईट प्रवृत्ती दूर करण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा.

Previous Post

अहमदपूर तालुक्यात अवैध दारू वाहतुकीवर पोलिसांची धाड; वाहनासह ९.९६ लाखांचा मुद्देमाल जप्त

Next Post

‘हिवतापमुक्त गाव, निरोगी समाज’; वाटंगी प्राथमिक आरोग्य केंद्रात जागतिक हिवताप दिन उत्साहात

Related Posts

ताज्या घडामोडी

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

September 10, 2026
101
ताज्या घडामोडी

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

September 10, 2026
192
ताज्या घडामोडी

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

September 10, 2026
4
ताज्या घडामोडी

म्हसळा पोलीस ठाण्याची इमारत भव्य व्हावी; मात्र नागरिकांना येथे येण्याची वेळ कमी यावी

September 10, 2026
3
ताज्या घडामोडी

गणरायाच्या आगमनाची लगबग; चामोर्शीत गणेशमूर्तींना अंतिम रूप

September 10, 2026
2
ताज्या घडामोडी

आदित्य यशवंत घरत यांची उरण तालुका काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी निवड

September 10, 2026
3
Next Post
‘हिवतापमुक्त गाव, निरोगी समाज’; वाटंगी प्राथमिक आरोग्य केंद्रात जागतिक हिवताप दिन उत्साहात

‘हिवतापमुक्त गाव, निरोगी समाज’; वाटंगी प्राथमिक आरोग्य केंद्रात जागतिक हिवताप दिन उत्साहात

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In