• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

एन.एम.एम.एस. परीक्षेत कन्या विद्यालयाचे उज्ज्वल यश

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 26, 2026
in ताज्या घडामोडी
0
एन.एम.एम.एस. परीक्षेत कन्या विद्यालयाचे उज्ज्वल यश
0
SHARES
81
VIEWS
Ad 1

श्रीगोंदा (प्रतिनिधी) : श्रीगोंदा शहरातील राजमाता विजयराज शिंदे कन्या विद्यालयाने राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती (एन.एम.एम.एस.) परीक्षेत यंदाही उल्लेखनीय यश संपादन करत गुणवत्तेचा दबदबा कायम राखला आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या निकालात विद्यालयातील 15 विद्यार्थिनी शिष्यवृत्तीधारक ठरल्या असून, त्यांच्या यशाचा सत्कार विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

या विद्यार्थिनींना दरवर्षी ₹12,000 प्रमाणे चार वर्षांत एकूण ₹48,000 इतकी शिष्यवृत्ती मिळणार आहे. परीक्षेस बसलेल्या 140 विद्यार्थिनींपैकी 109 विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या असून विद्यालयाचा निकाल 78 टक्के लागला आहे. यापैकी 50 विद्यार्थिनींनी 100 पेक्षा अधिक गुण मिळवले आहेत.

RelatedPosts

लोकमान्य टिळक आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जिजाऊ महाविद्यालयात अभिवादन

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त उमरगा मसापतर्फे ‘लेखन प्रेरणा दिन’ उत्साहात साजरा

चांभुर्डी येथे बिबट्याचा वावर स्पष्ट; कुत्र्यावर हल्ल्यानंतर ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

या परीक्षेत कु. मयुरी लहू गांगर्डे हिने 156 गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. तसेच देविकर आचल निलेश (150), सप्रे नीता नितीन (148), राऊत तनिष्का संदीप (146), वांगणे स्पंदन विजय (144), राऊत क्रांती राजेंद्र (141), टकले समीक्षा संतोष (140), कविटकर चिन्मयी संदीप (140), खोत प्राची महेश (139), शेळके संस्कृती अनिल (138), खेडकर नेहा ज्ञानदेव (137), खेंडके चिरंजीता प्रवीण (135), शिंदे सायली आबासाहेब (129), काळेवाघ आर्या राहुलकुमार (124) व कांगुणे पूर्वा अर्जुन (87) यांनीही उल्लेखनीय यश मिळवले.

या यशामागे विभाग प्रमुख मिलिंद काळे तसेच विषय शिक्षक कुंदन खामकर, सोनाली कळसकर व ज्ञानदेव पोळ यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थिनींचे मुख्याध्यापिका वर्षा भोईटे, पर्यवेक्षक बाळासाहेब शिंदे व गुरुकुल प्रमुख किरण शिंदे यांनी अभिनंदन केले.

गेल्या अनेक वर्षांप्रमाणे यंदाही रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागात अग्रस्थानी राहण्याची परंपरा विद्यालयाने कायम राखली असून, या यशामुळे परिसरात विद्यार्थिनींचे कौतुक होत आहे.

Previous Post

बेलवंडीबुद्रुक विद्यालयाचा एन.एम.एम.एस. परीक्षेत उल्लेखनीय निकाल

Next Post

नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातर्फे भारतातील पहिली अत्याधुनिक कंटेनराइज्ड इनडोअर शूटिंग रेंज सुरू..

Related Posts

ताज्या घडामोडी

लोकमान्य टिळक आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जिजाऊ महाविद्यालयात अभिवादन

August 2, 2026
1
ताज्या घडामोडी

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त उमरगा मसापतर्फे ‘लेखन प्रेरणा दिन’ उत्साहात साजरा

August 2, 2026
12
ताज्या घडामोडी

चांभुर्डी येथे बिबट्याचा वावर स्पष्ट; कुत्र्यावर हल्ल्यानंतर ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

July 23, 2026
12
ताज्या घडामोडी

दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील कथित लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ शिरूरमध्ये संविधान हातात घेऊन भव्य शांतता मोर्चा

July 23, 2026
20
ताज्या घडामोडी

मलकागुडा येथे स्व. अजितदादा पवार यांची जयंती सर्वधर्मीयांच्या उपस्थितीत साजरी

July 23, 2026
18
ताज्या घडामोडी

स्व. अजितदादा पवार यांची जयंती उत्साहात साजरी

July 23, 2026
4
Next Post
नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातर्फे भारतातील पहिली अत्याधुनिक कंटेनराइज्ड इनडोअर शूटिंग रेंज सुरू..

नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातर्फे भारतातील पहिली अत्याधुनिक कंटेनराइज्ड इनडोअर शूटिंग रेंज सुरू..

ताज्या बातम्या

अकोट फैल पुलावरील खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणातील चार आरोपींना नियमित जामीन

August 2, 2026

सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गावंडगाव येथील शेतकऱ्याची आत्महत्या

August 2, 2026

चांभुर्डीचे सुपुत्र दत्तात्रय दळवी यांचा वाढदिवस विद्यार्थ्यांसमवेत उत्साहात; नव्या ग्रंथालयाचे उद्घाटन

August 2, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In