• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

देवगाव शनी येथे गायरान जमिनीतून अवैध मुरूम उपसा; महसूल प्रशासनावर संगनमताचे आरोप

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 26, 2026
in ताज्या घडामोडी
0
देवगाव शनी येथे गायरान जमिनीतून अवैध मुरूम उपसा; महसूल प्रशासनावर संगनमताचे आरोप
0
SHARES
325
VIEWS
Ad 1

वैजापूर (प्रतिनिधी) : वैजापूर तालुक्यातील गोदावरी काठावरील देवगाव शनी येथे गायरान जमिनीतून मोठ्या प्रमाणावर अवैध मुरूम व पोयटा उपसा सुरू असल्याचे समोर आले आहे. स्थानिकांकडून महसूल प्रशासनाच्या संगनमतामुळेच हा प्रकार दिवसाढवळ्या सुरू असल्याचा गंभीर आरोप करण्यात येत आहे.

माहितीनुसार, या भागातील गायरान जमिनीत जेसीबीच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणावर मुरूम उपसा केला जात असून त्याची अवैध वाहतूकही सुरू आहे. यामुळे स्थानिक रस्त्यांची मोठ्या प्रमाणात हानी होत असून ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत आहे. महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

RelatedPosts

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

दरम्यान, राज्य शासन शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवत असताना प्रत्यक्षात स्थानिक पातळीवर अधिकाऱ्यांकडून आदेशांची पायमल्ली होत असल्याची टीका करण्यात येत आहे. देवगाव शनी चौफुली परिसरात अनेक बेकायदेशीर प्रकार सुरू असल्याचा आरोप असून विरगाव पोलीस प्रशासनालाही याची माहिती नसल्याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

या अवैध कामांमागे काही राजकीय पाठबळ असल्याचीही चर्चा नागरिकांमध्ये रंगली आहे. संबंधितांमध्ये भीतीचे वातावरण असल्याने गोरगरीब जनता याविरोधात आवाज उठवण्यास धजावत नसल्याचे सांगितले जाते. तसेच, गेल्या काही वर्षांत परिसरात चोरीच्या घटनांमध्येही वाढ झाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

या प्रकाराची तात्काळ चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी होत असून संबंधित प्रशासनाने दखल न घेतल्यास हा विषय वरिष्ठ स्तरावर नेण्यात येणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे.

Previous Post

कांदिवलीत १४वा सामूहिक विवाह सोहळा संपन्न; १५ जोडप्यांचे लग्न, सामाजिक बांधिलकीचा प्रत्यय

Next Post

पर्यावरण व जलसंवर्धनासाठी पथनाट्याद्वारे जनजागृती; रिठद व आसेगावमध्ये विद्यार्थ्यांची रॅली

Related Posts

ताज्या घडामोडी

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

September 10, 2026
101
ताज्या घडामोडी

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

September 10, 2026
192
ताज्या घडामोडी

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

September 10, 2026
4
ताज्या घडामोडी

म्हसळा पोलीस ठाण्याची इमारत भव्य व्हावी; मात्र नागरिकांना येथे येण्याची वेळ कमी यावी

September 10, 2026
3
ताज्या घडामोडी

गणरायाच्या आगमनाची लगबग; चामोर्शीत गणेशमूर्तींना अंतिम रूप

September 10, 2026
2
ताज्या घडामोडी

आदित्य यशवंत घरत यांची उरण तालुका काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी निवड

September 10, 2026
3
Next Post
पर्यावरण व जलसंवर्धनासाठी पथनाट्याद्वारे जनजागृती; रिठद व आसेगावमध्ये विद्यार्थ्यांची रॅली

पर्यावरण व जलसंवर्धनासाठी पथनाट्याद्वारे जनजागृती; रिठद व आसेगावमध्ये विद्यार्थ्यांची रॅली

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In