• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कांदिवलीत १४वा सामूहिक विवाह सोहळा संपन्न; १५ जोडप्यांचे लग्न, सामाजिक बांधिलकीचा प्रत्यय

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 26, 2026
in ताज्या घडामोडी
0
कांदिवलीत १४वा सामूहिक विवाह सोहळा संपन्न; १५ जोडप्यांचे लग्न, सामाजिक बांधिलकीचा प्रत्यय
0
SHARES
8
VIEWS
Ad 1

कांदिवली (प्रतिनिधी) : कांदिवली पश्चिम येथील गोरसवाडी परिसरात बाप्पा सिताराम सेवा मंडळातर्फे १४वा सामूहिक विवाह सोहळा उत्साहात पार पडला. या सोहळ्याचे आयोजन आमदार योगेश सागर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. सामाजिक बांधिलकी जपत गरजू कुटुंबातील नववधू-वरांसाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही हा उपक्रम राबविण्यात आला.

शनिवार, दि. २५ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी सहा वाजता मिलाप सिनेमा मागील गोरसवाडी परिसरात १५ जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात बाप्पा सिताराम यांच्या प्रतिमेचे पूजन, पुष्पहार अर्पण व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी “बाप्पा सिताराम”च्या जयघोषाने वातावरण भक्तिमय झाले.

RelatedPosts

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

या सोहळ्यास खासदार गोपाळ शेट्टी, भाजप उत्तर मुंबई अध्यक्ष बाळा तावडे, नगरसेवक गणेश खणकर, माजी नगरसेवक कमलेश यादव, हिमांशू पारेख, नगरसेविका दक्षता कवठणकर, लिना देहेरकर, विजयभाई गिरकर, प्रतिभा गिरकर यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्थानिक भाजप महिला व पुरुष कार्यकर्त्यांनी स्वयंसेवी कामकाज उत्तम प्रकारे पार पाडले.

सोहळ्यानंतर उपस्थितांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच नववधू-वरांना संसारोपयोगी साहित्य वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे गरजू कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला असून नातेवाईकांनी आयोजकांचे आभार मानले. सामाजिक एकोप्याचा आणि सहकार्याचा संदेश देणारा हा सामूहिक विवाह सोहळा उत्साहात पार पडला.

Previous Post

एरंडोलमध्ये उष्माघाताचा संशय; ६० वर्षीय महिलेचा मृत्यू, परिसरात हळहळ

Next Post

देवगाव शनी येथे गायरान जमिनीतून अवैध मुरूम उपसा; महसूल प्रशासनावर संगनमताचे आरोप

Related Posts

ताज्या घडामोडी

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

September 10, 2026
101
ताज्या घडामोडी

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

September 10, 2026
192
ताज्या घडामोडी

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

September 10, 2026
4
ताज्या घडामोडी

म्हसळा पोलीस ठाण्याची इमारत भव्य व्हावी; मात्र नागरिकांना येथे येण्याची वेळ कमी यावी

September 10, 2026
3
ताज्या घडामोडी

गणरायाच्या आगमनाची लगबग; चामोर्शीत गणेशमूर्तींना अंतिम रूप

September 10, 2026
2
ताज्या घडामोडी

आदित्य यशवंत घरत यांची उरण तालुका काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी निवड

September 10, 2026
3
Next Post
देवगाव शनी येथे गायरान जमिनीतून अवैध मुरूम उपसा; महसूल प्रशासनावर संगनमताचे आरोप

देवगाव शनी येथे गायरान जमिनीतून अवैध मुरूम उपसा; महसूल प्रशासनावर संगनमताचे आरोप

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In