• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

गांजा तस्करीवर स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; १.५५ लाखांचा मुद्देमाल जप्त

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 26, 2026
in ताज्या घडामोडी
0
गांजा तस्करीवर स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; १.५५ लाखांचा मुद्देमाल जप्त
0
SHARES
11
VIEWS
Ad 1

वर्धा | प्रतिनिधी

अंमली पदार्थांविरोधात वर्धा पोलिसांनी मोठी कारवाई करत गांजा वाहतूक करणाऱ्या आरोपीला रंगेहाथ पकडले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेने ही धडक मोहीम राबवली.

RelatedPosts

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

दि. २४ एप्रिल २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक हिंगणघाट परिसरात गस्त घालत असताना, मिळालेल्या गुप्त माहितीनुसार जाम ते हिंगणघाट राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वरील मौजा रिमडोह शिवार, कोचर खरर्डा फॅक्टरीजवळ सापळा रचण्यात आला.

यावेळी सुझुकी बर्गमन (क्र. MH 32 AW 4877) या मोपेडवरून गांजा वाहतूक करत असलेला आरोपी अब्दुल रिजवान उर्फ टोनी शेख (वय ३०, रा. संत कबीर वॉर्ड, हिंगणघाट) याला पोलिसांनी रंगेहाथ ताब्यात घेतले.

तपासणीदरम्यान आरोपीकडून २ किलो २२८ ग्रॅम गांजा तसेच मोपेडसह एकूण ₹१,५५,७०० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पुढील तपासात हा गांजा नागपूर येथील जावेद शेख याने पुरवठा केल्याचे निष्पन्न झाले.

या प्रकरणी NDPS Act अंतर्गत हिंगणघाट पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही आरोपींविरुद्ध कारवाई सुरू आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनोद चौधरी, उपनिरीक्षक प्रकाश लसुंते आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली.

अंमली पदार्थांविरोधातील अशा कारवायांमुळे गुन्हेगारीला आळा बसण्यास मदत होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Tags: Shankar Panbude
Previous Post

‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रेचा चौंडीहून भव्य शुभारंभ

Next Post

सेलू पोलिसांचा ‘संवाद’ उपक्रम; कान्हापूर येथे नागरिकांच्या समस्यांचे जागेवरच निराकरण

Related Posts

ताज्या घडामोडी

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

September 10, 2026
101
ताज्या घडामोडी

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

September 10, 2026
192
ताज्या घडामोडी

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

September 10, 2026
4
ताज्या घडामोडी

म्हसळा पोलीस ठाण्याची इमारत भव्य व्हावी; मात्र नागरिकांना येथे येण्याची वेळ कमी यावी

September 10, 2026
3
ताज्या घडामोडी

गणरायाच्या आगमनाची लगबग; चामोर्शीत गणेशमूर्तींना अंतिम रूप

September 10, 2026
2
ताज्या घडामोडी

आदित्य यशवंत घरत यांची उरण तालुका काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी निवड

September 10, 2026
3
Next Post

सेलू पोलिसांचा ‘संवाद’ उपक्रम; कान्हापूर येथे नागरिकांच्या समस्यांचे जागेवरच निराकरण

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In