• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

डॉ. अभिजित मोरे यांना विधान परिषदेवर संधी देण्याची मागणी; शहादा शहराध्यक्ष सुरेंद्र कुवर यांचे निवेदन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 26, 2026
in ताज्या घडामोडी
0
डॉ. अभिजित मोरे यांना विधान परिषदेवर संधी देण्याची मागणी; शहादा शहराध्यक्ष सुरेंद्र कुवर यांचे निवेदन
0
SHARES
10
VIEWS
Ad 1

शहादा, दि. २६ : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजित दिलीपराव मोरे यांना विधान परिषदेवर संधी द्यावी, अशी मागणी शहादा शहराध्यक्ष सुरेंद्र ओंकार कुवर यांनी माजी मंत्री तथा उत्तर महाराष्ट्र प्रभारी आ. अनिलदादा पाटील यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, डॉ. अभिजित मोरे यांनी मागील पाच वर्षांत जिल्ह्यात पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली असून त्यांच्या नेतृत्वाखाली नंदुरबार जिल्ह्यात पक्षाला नवसंजीवनी मिळाली आहे. नवापूर व तळोदा नगरपालिकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला मिळालेला विजय हा त्यांच्या कुशल नियोजनाचा परिणाम असल्याचेही निवेदनात म्हटले आहे.

RelatedPosts

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

डॉ. मोरे यांच्या कुटुंबाची पक्षाशी असलेली निष्ठा दीर्घकालीन असून त्यांच्या वडिलांनी व आजीनेही पक्षसंघटनेत महत्त्वाचे योगदान दिल्याचा उल्लेखही करण्यात आला आहे. २०१५ ते २०२१ या कालावधीत पक्षाची स्थिती खालावलेली असताना, २०२१ मध्ये त्यांनी जिल्हाध्यक्षपद स्वीकारल्यानंतर संघटनेत पुन्हा उत्साह निर्माण झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.

नंदुरबार जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जमातीसाठी राखीव असल्याने डॉ. अभिजित मोरे यांना थेट निवडणूक लढविण्याची संधी उपलब्ध नसल्याचेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना विधान परिषदेवर संधी द्यावी, अशी कार्यकर्त्यांची भावना असल्याचे सांगण्यात आले.

“निष्ठावंत कार्यकर्त्यांचा सन्मान होणे आवश्यक आहे. डॉ. अभिजित मोरे यांची विधान परिषदेवर नियुक्ती ही कार्यकर्त्यांच्या भावना व पक्षनिष्ठेचा सन्मान ठरेल,” असे मत सुरेंद्र कुवर यांनी व्यक्त केले आहे.

या निवेदनावेळी शहादा तालुकाध्यक्ष संतोष पराडके, माजी जिल्हा परिषद सदस्य मोहन शेवाळे, छोटूभाऊ कुवर, संजय खंदारे, चिंतामण पाटील, डॉ. जितेंद्र भंडारी, रणसिंग दादा, रविंद्र जावरे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

Tags: Netradipak Kuwar
Previous Post

जेईई मुख्य परीक्षेत पूज्य साने गुरुजी महाविद्यालयाचे घवघवीत यश; दोन विद्यार्थी ‘ॲडव्हान्स’साठी पात्र

Next Post

शहादा तालुक्यात रस्ते व पुलांची कामे रखडली; पावसाळ्यात विद्यार्थी व शेतकऱ्यांचे हाल होण्याची शक्यता

Related Posts

ताज्या घडामोडी

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

September 10, 2026
101
ताज्या घडामोडी

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

September 10, 2026
192
ताज्या घडामोडी

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

September 10, 2026
4
ताज्या घडामोडी

म्हसळा पोलीस ठाण्याची इमारत भव्य व्हावी; मात्र नागरिकांना येथे येण्याची वेळ कमी यावी

September 10, 2026
3
ताज्या घडामोडी

गणरायाच्या आगमनाची लगबग; चामोर्शीत गणेशमूर्तींना अंतिम रूप

September 10, 2026
2
ताज्या घडामोडी

आदित्य यशवंत घरत यांची उरण तालुका काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी निवड

September 10, 2026
3
Next Post
शहादा तालुक्यात रस्ते व पुलांची कामे रखडली; पावसाळ्यात विद्यार्थी व शेतकऱ्यांचे हाल होण्याची शक्यता

शहादा तालुक्यात रस्ते व पुलांची कामे रखडली; पावसाळ्यात विद्यार्थी व शेतकऱ्यांचे हाल होण्याची शक्यता

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In