• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शहादा शहरात डासांचा कहर; नागरिक त्रस्त, पालिकेची युद्धपातळीवर फॉगिंग मोहीम सुरू

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 26, 2026
in ताज्या घडामोडी
0
शहादा शहरात डासांचा कहर; नागरिक त्रस्त, पालिकेची युद्धपातळीवर फॉगिंग मोहीम सुरू
0
SHARES
7
VIEWS
Ad 1

शहादा शहरात उन्हाळ्याच्या दिवसांतही डासांचा प्रचंड प्रादुर्भाव जाणवत असून नागरिक अक्षरशः त्रस्त झाले आहेत. डासांच्या वाढत्या संख्येमुळे शहरात विविध साथीच्या आजारांचा धोका निर्माण झाला आहे. कडक उन्हामुळे काही प्रमाणात डासांचे प्रमाण कमी झाले असले तरी संध्याकाळ आणि सकाळच्या वेळेत डासांचा त्रास अधिक जाणवत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे

डासांमुळे नागरिकांना घरात बसणेही कठीण झाले आहे. बाजारात उपलब्ध असलेली डास निर्मूलन अगरबत्ती, इलेक्ट्रिक साधने यांसारख्या उपाययोजना करूनही फरक पडत नसल्याने नागरिकांमध्ये मोठा रोष निर्माण झाला आहे. विशेषतः महिलांकडून जुन्या वस्त्यांसह नवीन वसाहतींमध्ये औषधी फवारणी करण्याची वारंवार मागणी होत होती.

RelatedPosts

लोकमान्य टिळक आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जिजाऊ महाविद्यालयात अभिवादन

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त उमरगा मसापतर्फे ‘लेखन प्रेरणा दिन’ उत्साहात साजरा

चांभुर्डी येथे बिबट्याचा वावर स्पष्ट; कुत्र्यावर हल्ल्यानंतर ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

या पार्श्वभूमीवर शहादा नगरपालिकेच्या आरोग्य विभागाने संपूर्ण शहरात फॉगिंग मशीनद्वारे औषधी फवारणी मोहीम युद्धपातळीवर सुरू केली आहे. आतापर्यंत वेळोवेळी फवारणी करण्यात आली असली तरी ती प्रभावीपणे आणि सर्व भागात न झाल्याने डासांचे प्रमाण वाढल्याचे स्पष्ट झाले आहे.

नगरपालिकेने प्रत्येक प्रभागात संध्याकाळी ६ वाजेनंतर फॉगिंग मशीनद्वारे औषधी फवारणी सुरू केली आहे. ही मोहीम अधिक प्रभावी ठरेल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे. नागरिकांचे आरोग्य हेच प्राधान्य असल्याने कोणताही भेदभाव न करता संपूर्ण शहरात फवारणी केली जाणार आहे, असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.

शहरातील नवीन वसाहतींमधील मोकळ्या प्लॉटचा प्रश्नही गंभीर बनला आहे. अनेक ठिकाणी प्लॉटमध्ये सांडपाणी साचल्याने डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणावर होत आहे. तसेच वाढलेल्या काटेरी झुडपांमुळे डासांना आश्रय मिळत आहे. या झुडपांची सफाई आणि प्लॉट स्वच्छ ठेवण्याबाबत नागरिकांना वारंवार सूचना देण्यात आल्या आहेत.

या संदर्भात नवनिर्वाचित आरोग्य सभापती सुनील काशिनाथ पाटील यांनी तातडीने दखल घेत फॉगिंग मोहीम सुरू केली आहे. त्यांनी नागरिकांना नगरपालिका प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. “प्रत्येक प्रभागात नगरसेवकांनी पुढाकार घेऊन फवारणी करून घ्यावी, ही मोहीम भेदभाव न करता राबवली जाईल,” असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, मुख्याधिकारी साजिद पिंजारी यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, नवीन वसाहतींमधील मोकळ्या प्लॉटमध्ये सांडपाणी सोडणाऱ्यांवर आणि अस्वच्छता ठेवणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल. प्लॉटधारकांनी स्वतःहून स्वच्छता राखावी, असेही त्यांनी सांगितले.

सध्या संपूर्ण शहादा शहरात डासांच्या त्रासामुळे नागरिक हैराण झाले असून, प्रशासनाच्या या युद्धपातळीवरील फॉगिंग मोहिमेकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Tags: Netradipak Kuwar
Previous Post

शहादा तालुक्यात रस्ते व पुलांची कामे रखडली; पावसाळ्यात विद्यार्थी व शेतकऱ्यांचे हाल होण्याची शक्यता

Next Post

वीज बिल भरूनही अंधाराचा त्रास; प्रभाग ३ नागरिकांचा महावितरणविरोधात ३० एप्रिल रोजी मोर्चा

Related Posts

ताज्या घडामोडी

लोकमान्य टिळक आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जिजाऊ महाविद्यालयात अभिवादन

August 2, 2026
0
ताज्या घडामोडी

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त उमरगा मसापतर्फे ‘लेखन प्रेरणा दिन’ उत्साहात साजरा

August 2, 2026
9
ताज्या घडामोडी

चांभुर्डी येथे बिबट्याचा वावर स्पष्ट; कुत्र्यावर हल्ल्यानंतर ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

July 23, 2026
9
ताज्या घडामोडी

दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील कथित लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ शिरूरमध्ये संविधान हातात घेऊन भव्य शांतता मोर्चा

July 23, 2026
18
ताज्या घडामोडी

मलकागुडा येथे स्व. अजितदादा पवार यांची जयंती सर्वधर्मीयांच्या उपस्थितीत साजरी

July 23, 2026
17
ताज्या घडामोडी

स्व. अजितदादा पवार यांची जयंती उत्साहात साजरी

July 23, 2026
3
Next Post
वीज बिल भरूनही अंधाराचा त्रास; प्रभाग ३ नागरिकांचा महावितरणविरोधात ३० एप्रिल रोजी मोर्चा

वीज बिल भरूनही अंधाराचा त्रास; प्रभाग ३ नागरिकांचा महावितरणविरोधात ३० एप्रिल रोजी मोर्चा

ताज्या बातम्या

अकोट फैल पुलावरील खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणातील चार आरोपींना नियमित जामीन

August 2, 2026

सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गावंडगाव येथील शेतकऱ्याची आत्महत्या

August 2, 2026

चांभुर्डीचे सुपुत्र दत्तात्रय दळवी यांचा वाढदिवस विद्यार्थ्यांसमवेत उत्साहात; नव्या ग्रंथालयाचे उद्घाटन

August 2, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In