• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कणकवलीत पत्रकार संघाचा पुरस्कार वितरण सोहळा २ मे रोजी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 27, 2026
in ताज्या घडामोडी
0
कणकवलीत पत्रकार संघाचा पुरस्कार वितरण सोहळा २ मे रोजी
0
SHARES
11
VIEWS
Ad 1

कणकवली (प्रतिनिधी)
कणकवली तालुका पत्रकार संघाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे पत्रकारांसह विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या मान्यवरांचा गौरव करण्यासाठी पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा शनिवार, २ मे २०२६ रोजी सकाळी १० वाजता स्वामी विवेकानंद सभागृह, प्रहार भवन येथे पार पडणार आहे.

या कार्यक्रमाला मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असून, सभापती हर्षदा वाळके, नगराध्यक्ष संदेश पारकर, पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष उमेश तोरस्कर तसेच जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

RelatedPosts

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

या सोहळ्यात आचार्य बाळशास्त्री जांभेकर ज्येष्ठ पत्रकार पुरस्कार संजय माळवदे यांना प्रदान करण्यात येणार आहे. ज्येष्ठ पत्रकार कै. शशी तायशेट्ये यांचाही सन्मान केला जाणार आहे. उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार चंद्रशेखर देसाई (दै. तरुण भारत) यांना, तर कै. अनिल सावंत स्मृती ग्रामीण पत्रकार पुरस्कार संतोष पाटणकर (दै. लोकमत – खारेपाटण) यांना दिला जाणार आहे.

तसेच उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार प्रथमेश जाधव, यशस्वी उद्योजक पुरस्कार संदीप चौकेकर (अध्यक्ष – प्राणजीवन संयोग संस्था), सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार उत्तम पुजारे, तर वृत्तपत्र कर्मचारी सन्मान पुरस्कार भास्कर रासम (दै. सकाळ) यांना प्रदान करण्यात येणार आहे.

याशिवाय वृत्तपत्र विक्रेते मालोजी कोकरे (कणकवली), अरविंद मुद्राळे (तळेरे) आणि बाळा फोंडके (फोंडाघाट) यांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात येणार आहे. खारेपाटण येथील कै. सौ. विना राजेंद्र ब्रह्मदंडे यांच्या मरणोत्तर अवयवदानातून अनेकांना नवजीवन मिळाल्याबद्दल त्यांच्या पती राजेंद्र ब्रह्मदंडे यांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष भगवान लोके, सचिव संजय सावंत आणि खजिनदार रोशन तांबे यांनी केले आहे.

Tags: Amit Tendulakr
Previous Post

समाधान शिबिराचा फज्जा; प्रशासनावर नागरिकांचा रोष

Next Post

उष्णतेच्या लाटेत भाविकांसाठी गुरुद्वारा सचखंड येथे विशेष व्यवस्था

Related Posts

ताज्या घडामोडी

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

September 10, 2026
101
ताज्या घडामोडी

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

September 10, 2026
192
ताज्या घडामोडी

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

September 10, 2026
4
ताज्या घडामोडी

म्हसळा पोलीस ठाण्याची इमारत भव्य व्हावी; मात्र नागरिकांना येथे येण्याची वेळ कमी यावी

September 10, 2026
3
ताज्या घडामोडी

गणरायाच्या आगमनाची लगबग; चामोर्शीत गणेशमूर्तींना अंतिम रूप

September 10, 2026
2
ताज्या घडामोडी

आदित्य यशवंत घरत यांची उरण तालुका काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी निवड

September 10, 2026
3
Next Post
उष्णतेच्या लाटेत भाविकांसाठी गुरुद्वारा सचखंड येथे विशेष व्यवस्था

उष्णतेच्या लाटेत भाविकांसाठी गुरुद्वारा सचखंड येथे विशेष व्यवस्था

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In