• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

उष्णतेच्या लाटेत भाविकांसाठी गुरुद्वारा सचखंड येथे विशेष व्यवस्था

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 27, 2026
in ताज्या घडामोडी
0
उष्णतेच्या लाटेत भाविकांसाठी गुरुद्वारा सचखंड येथे विशेष व्यवस्था
0
SHARES
4
VIEWS
Ad 1

नांदेड (प्रतिनिधी)
मराठवाडा विभागात सुरू असलेल्या तीव्र उष्णतेच्या पार्श्वभूमीवर नांदेड येथील गुरुद्वारा तख्त सचखंड श्री हजूर अबचलनगर साहिब येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

गुरुद्वारा सचखंड बोर्डाचे प्रशासक डॉ. विजय सतबीर सिंघ (IAS, निवृत्त) यांच्या निर्देशानुसार, गुरुद्वाराच्या सर्व प्रवेशद्वारांवर तसेच परिसरातील स्थानिक गुरुद्वारांमध्ये भाविकांसाठी शुद्ध व थंड पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. उष्माघाताचा धोका लक्षात घेऊन प्रथमोपचार पेट्या (First-Aid kits) देखील उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

RelatedPosts

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

भाविकांच्या आरोग्याची काळजी घेत लंगरसोबत थंड लस्सी देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच सर्व निवासस्थाने, प्रशासकीय कार्यालये आणि स्थानिक गुरुद्वारांमधील कर्मचाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

याशिवाय, २ व ३ मे २०२६ रोजी होणाऱ्या सामूहिक विवाह सोहळ्यादरम्यान या सर्व उपाययोजनांचे काटेकोर पालन करण्याचे आदेश देण्यात आले असून, रुग्णवाहिका सेवा आणि वैद्यकीय सुविधा पूर्णतः तत्पर ठेवण्यावर विशेष भर देण्यात आला आहे.

या उपाययोजनांमुळे उष्णतेच्या तीव्रतेतही भाविकांना सुरक्षित व सुसह्य दर्शनाचा अनुभव मिळावा, हा गुरुद्वारा प्रशासनाचा उद्देश असल्याचे सांगण्यात आले.

Previous Post

कणकवलीत पत्रकार संघाचा पुरस्कार वितरण सोहळा २ मे रोजी

Next Post

सेलूत वकिलावर खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप; पत्रकार परिषदेत सुनिता ढोले यांचा गंभीर आरोप

Related Posts

ताज्या घडामोडी

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

September 10, 2026
101
ताज्या घडामोडी

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

September 10, 2026
192
ताज्या घडामोडी

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

September 10, 2026
4
ताज्या घडामोडी

म्हसळा पोलीस ठाण्याची इमारत भव्य व्हावी; मात्र नागरिकांना येथे येण्याची वेळ कमी यावी

September 10, 2026
3
ताज्या घडामोडी

गणरायाच्या आगमनाची लगबग; चामोर्शीत गणेशमूर्तींना अंतिम रूप

September 10, 2026
2
ताज्या घडामोडी

आदित्य यशवंत घरत यांची उरण तालुका काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी निवड

September 10, 2026
3
Next Post
सेलूत वकिलावर खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप; पत्रकार परिषदेत सुनिता ढोले यांचा गंभीर आरोप

सेलूत वकिलावर खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप; पत्रकार परिषदेत सुनिता ढोले यांचा गंभीर आरोप

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In