• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

‘स्कूल संसद’ उपक्रमात आलेगावच्या प्रग्यान धारतरकरची राज्यस्तरावर निवड; ‘स्टुडंट एमपी’ म्हणून विधान भवन भेट

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 28, 2026
in ताज्या घडामोडी
0
‘स्कूल संसद’ उपक्रमात आलेगावच्या प्रग्यान धारतरकरची राज्यस्तरावर निवड; ‘स्टुडंट एमपी’ म्हणून विधान भवन भेट
0
SHARES
5
VIEWS
Ad 1

(प्रतिनिधी)
पुणे येथील नामांकित संस्थेच्या वतीने आयोजित ‘स्कूल संसद’ या नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत आलेगाव येथील जैन साध्वी प्रभा प्रकाश कॉन्व्हेंटच्या इयत्ता ९ वीतील विद्यार्थी प्रग्यान धारतरकर याची राज्यस्तरावर निवड झाली आहे. या उपक्रमात त्याला ‘स्टुडंट एमपी’ आणि पक्ष प्रमुख ही सन्माननीय पदवी मिळाली असून, त्याला विधान भवन येथे भेट देण्याची संधी मिळाली आहे.

विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही मूल्यांची जाणीव निर्माण करणे, संसदीय कार्यपद्धतीची ओळख करून देणे आणि नेतृत्वगुण विकसित करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. यावर्षी राज्यभरातून हजारो विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता, त्यापैकी केवळ १४५ विद्यार्थ्यांची अंतिम निवड करण्यात आली.

RelatedPosts

लोकमान्य टिळक आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जिजाऊ महाविद्यालयात अभिवादन

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त उमरगा मसापतर्फे ‘लेखन प्रेरणा दिन’ उत्साहात साजरा

चांभुर्डी येथे बिबट्याचा वावर स्पष्ट; कुत्र्यावर हल्ल्यानंतर ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

विधान भवन भेटीदरम्यान विधानसभा सहसचिव नागनाथ थेटे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत विधानसभेची रचना, कामकाज, प्रश्नोत्तर प्रक्रिया तसेच लोकशाहीतील महत्त्वाच्या बाबींची सविस्तर माहिती दिली. या अनुभवामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडल्याचे सांगण्यात आले.

प्रग्यानने आपल्या यशाचे श्रेय गटशिक्षणाधिकारी प्रवीण डाबेराव, केंद्रप्रमुख निवास चव्हाण, शाळेचे अध्यक्ष अक्षय जैन, मुख्याध्यापक महावीर जैन तसेच शिक्षिका प्रगती महल्ले आणि वर्गशिक्षक निलेश पस्तापुरे यांना दिले आहे.

प्रग्यानच्या या उल्लेखनीय यशाबद्दल परिसरात आणि शैक्षणिक क्षेत्रात त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, हा अनुभव त्याच्या भविष्यातील वाटचालीसाठी प्रेरणादायी ठरणार असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे.

Tags: Pradip Tajne
Previous Post

भालेवाडी येथे तीव्र पाणीटंचाई; पंचायत समितीकडे निवेदन

Next Post

नवेगावात वाढते अतिक्रमण; ग्रामस्थ त्रस्त, प्रशासनावर निष्क्रियतेचा आरोप

Related Posts

ताज्या घडामोडी

लोकमान्य टिळक आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जिजाऊ महाविद्यालयात अभिवादन

August 2, 2026
0
ताज्या घडामोडी

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त उमरगा मसापतर्फे ‘लेखन प्रेरणा दिन’ उत्साहात साजरा

August 2, 2026
9
ताज्या घडामोडी

चांभुर्डी येथे बिबट्याचा वावर स्पष्ट; कुत्र्यावर हल्ल्यानंतर ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

July 23, 2026
8
ताज्या घडामोडी

दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील कथित लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ शिरूरमध्ये संविधान हातात घेऊन भव्य शांतता मोर्चा

July 23, 2026
18
ताज्या घडामोडी

मलकागुडा येथे स्व. अजितदादा पवार यांची जयंती सर्वधर्मीयांच्या उपस्थितीत साजरी

July 23, 2026
17
ताज्या घडामोडी

स्व. अजितदादा पवार यांची जयंती उत्साहात साजरी

July 23, 2026
3
Next Post

नवेगावात वाढते अतिक्रमण; ग्रामस्थ त्रस्त, प्रशासनावर निष्क्रियतेचा आरोप

ताज्या बातम्या

अकोट फैल पुलावरील खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणातील चार आरोपींना नियमित जामीन

August 2, 2026

सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गावंडगाव येथील शेतकऱ्याची आत्महत्या

August 2, 2026

चांभुर्डीचे सुपुत्र दत्तात्रय दळवी यांचा वाढदिवस विद्यार्थ्यांसमवेत उत्साहात; नव्या ग्रंथालयाचे उद्घाटन

August 2, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In