• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शहादा शहरात ‘गौ सन्मान रॅली’चा उत्साह; गौमातेला ‘राष्ट्रमाता’ दर्जा देण्याची मागणी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 28, 2026
in ताज्या घडामोडी
0
शहादा शहरात ‘गौ सन्मान रॅली’चा उत्साह; गौमातेला ‘राष्ट्रमाता’ दर्जा देण्याची मागणी
0
SHARES
7
VIEWS
Ad 1

शहादा, दि.२७ (प्रतिनिधी)
देशभरात सुरू असलेल्या ‘गौ सन्मान अभियान’ अंतर्गत शहादा शहरात भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले. गौमातेला ‘राष्ट्रमाता’ म्हणून घोषित करण्याच्या मागणीसाठी आयोजित या रॅलीत हिंदू समाज बांधवांसह विविध राजकीय व सामाजिक संघटनांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला. संपूर्ण शहर ‘जय श्रीराम’च्या घोषणांनी दुमदुमून गेले होते.

सोमवारी सकाळी १० वाजता चावडी चौक येथील ऐतिहासिक श्रीराम मंदिरापासून रॅलीला सुरुवात झाली. रॅलीच्या अग्रभागी साधुसंत व मान्यवर उपस्थित होते. यामध्ये शहादा नगरपालिकेच्या उपनगराध्यक्ष सौ. माधवीताई मकरंद पाटील, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील, डॉ. कांतीलाल टाटिया, विश्व हिंदू परिषदेचे ज्येष्ठ पदाधिकारी अजय शर्मा, हभप खगेंद्र महाराज, हभप हर्षल महाराज यांचा समावेश होता.

RelatedPosts

कळंबोली-कामोठे परिसरातील वीज समस्येविरोधात स्त्री शक्ती फाउंडेशनचा आवाज बुलंद; चौकशी व कारवाईची विजया कदम यांची मागणी

तिलारी घाटातील महिला हत्याकांडाचा छडा; कोल्हापूर एलसीबीकडून ३ आरोपींना अटक

चिंचोली लिंबाजी ग्रामपंचायत निवडणूक 2026 : वार्डनिहाय आरक्षण सोडत जाहीर

शहरातील मुख्य बाजारपेठेतून मार्गक्रमण करत रॅली प्रांताधिकारी कार्यालयावर पोहोचली. येथे शिष्टमंडळाने आपल्या मागण्यांचे निवेदन प्रशासनाला सादर केले. उपस्थित मान्यवरांनी गौमातेचे धार्मिक, सांस्कृतिक व आर्थिक महत्त्व अधोरेखित करत तिला ‘राष्ट्रमाता’ दर्जा देण्याची मागणी केली.

या रॅलीत विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. महिलांचीही लक्षणीय उपस्थिती या रॅलीचे विशेष आकर्षण ठरली. हातात भगवे ध्वज व फलक घेऊन कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदविला.

दरम्यान, रॅली सुरू असताना नगरपालिकेच्या आरोग्य व स्वच्छता विभागाने मार्गावरील गटारी साफ करून काढलेली घाण रस्त्यावरच ठेवल्याने दुर्गंधी पसरली. या प्रकारामुळे आंदोलकांनी तीव्र संताप व्यक्त करत पालिकेच्या कामकाजाचा निषेध केला.

रॅलीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत कुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. रॅली शांततेत पार पडली.

Tags: Netradipak Kuwar
Previous Post

पांढरकवड्यात कृषी सेवा केंद्रांचा बेमुदत बंद; १२ मागण्यांसाठी आंदोलन

Next Post

पाटचारी बुजविणाऱ्या विकासकावर कारवाईची मागणी; शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा

Related Posts

ताज्या घडामोडी

कळंबोली-कामोठे परिसरातील वीज समस्येविरोधात स्त्री शक्ती फाउंडेशनचा आवाज बुलंद; चौकशी व कारवाईची विजया कदम यांची मागणी

June 12, 2026
0
क्राईम

तिलारी घाटातील महिला हत्याकांडाचा छडा; कोल्हापूर एलसीबीकडून ३ आरोपींना अटक

June 12, 2026
2
ताज्या घडामोडी

चिंचोली लिंबाजी ग्रामपंचायत निवडणूक 2026 : वार्डनिहाय आरक्षण सोडत जाहीर

June 12, 2026
10
ताज्या घडामोडी

ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी सुनील भुसारा बिनविरोध

June 12, 2026
7
ताज्या घडामोडी

भ्रष्टाचाराला जत नगरपरिषदेत थारा नाही : डॉ. रवींद्र आरळी

June 12, 2026
5
मृत सक्षमच्या प्रेताशी लग्न केल्यानंतर चर्चेत आलेली आंचल घर सोडल्याची चर्चा; ताटे कुटुंबावर दुःखाचे सावट
ताज्या घडामोडी

मृत सक्षमच्या प्रेताशी लग्न केल्यानंतर चर्चेत आलेली आंचल घर सोडल्याची चर्चा; ताटे कुटुंबावर दुःखाचे सावट

June 12, 2026
26
Next Post
पाटचारी बुजविणाऱ्या विकासकावर कारवाईची मागणी; शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा

पाटचारी बुजविणाऱ्या विकासकावर कारवाईची मागणी; शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा

ताज्या बातम्या

कळंबोली-कामोठे परिसरातील वीज समस्येविरोधात स्त्री शक्ती फाउंडेशनचा आवाज बुलंद; चौकशी व कारवाईची विजया कदम यांची मागणी

June 12, 2026

शेतीच्या बांधावरील वादातून तरुणाचा मृत्यू; गुन्हा दाखल करण्यासाठी नातेवाईकांचा आक्रमक पवित्रा

June 12, 2026

अन्नदात्यासाठी अन्नत्याग आंदोलन; शेतकरी कर्जमाफीच्या मागण्यांसाठी रोहित पवार आक्रमक

June 12, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In