• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पाटचारी बुजविणाऱ्या विकासकावर कारवाईची मागणी; शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 28, 2026
in ताज्या घडामोडी
0
पाटचारी बुजविणाऱ्या विकासकावर कारवाईची मागणी; शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा
0
SHARES
19
VIEWS
Ad 1

शहादा, दि.२८ (प्रतिनिधी)
पुरुषोत्तमनगर (ता. शहादा) येथील साखर कारखान्याची दूषित मळी वाहणारी पाटचारी बेकायदेशीरपणे बुजविणाऱ्या विकासकावर कठोर कारवाई करावी व भराव तात्काळ हटवावा, या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. या प्रश्नावर तातडीने तोडगा न निघाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

शिवसेना तालुका प्रमुख मनलेश जायसवाल यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन सादर करण्यात आले. निवेदनानुसार, पुरुषोत्तमनगर येथील साखर कारखान्यातील दूषित मळीची विल्हेवाट लावण्यासाठी कारखान्यापासून मोहिदा शिवारापर्यंत पाटचारी तयार करण्यात आली आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपूर्वी मोहिदा परिसरातील सर्वे क्रमांक ५९२ जवळ एका विकासकाने कोणतीही परवानगी न घेता सुमारे १५० ते २०० मीटर लांबीचा मातीचा भराव टाकून ही पाटचारी बुजवली आहे.

RelatedPosts

खारघर-कळंबोलीकरांना दिलासा! वीज तक्रारींसाठी महावितरणचा २४x७ नियंत्रण कक्ष सुरू

कळंबोली-कामोठे परिसरातील वीज समस्येविरोधात स्त्री शक्ती फाउंडेशनचा आवाज बुलंद; चौकशी व कारवाईची विजया कदम यांची मागणी

तिलारी घाटातील महिला हत्याकांडाचा छडा; कोल्हापूर एलसीबीकडून ३ आरोपींना अटक

या प्रकारामुळे पुरुषोत्तमनगर, डोंगरगाव, आदिनाथनगर, महावीर नगर, पार्श्वनाथ नगर, मानस विहार नगर, छोरीया टाऊन आणि शिक्षक कॉलनी परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. दूषित मळी साचून राहिल्याने भूगर्भातील पाणी दूषित होण्याची भीती व्यक्त केली जात असून शेतकऱ्यांच्या शेतीचेही नुकसान होण्याची शक्यता आहे.

प्रशासनाने तात्काळ कारवाई करून संबंधित विकासकावर कठोर कायदेशीर पावले उचलावीत व पाटचारीवरील भराव हटवून मळीचा प्रवाह पूर्ववत करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा शिवसेना स्टाईलने तीव्र जनआंदोलन छेडले जाईल आणि उद्भवणाऱ्या कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नास प्रशासन व संबंधित विकासक जबाबदार राहतील, असा इशारा देण्यात आला आहे.

दरम्यान, शहादा प्रांत कार्यालयात प्रभारी नायब तहसीलदार जगदीश चखणे यांनी तक्रार स्वीकारून तात्काळ कार्यवाहीचे आश्वासन दिले आहे. या निवेदनावर डॉ. राजेंद्र पेंढारकर, महेश पाटील, हितेंद्र वर्मा, रमण नवले, बाबुराव चोंगडे, रेहम ठाकरे, जगदीश ठाकरे आदींच्या सह्या आहेत.

Tags: Netradipak Kuwar
Previous Post

शहादा शहरात ‘गौ सन्मान रॅली’चा उत्साह; गौमातेला ‘राष्ट्रमाता’ दर्जा देण्याची मागणी

Next Post

वाढदिवसाचे समाजसेवेत रूपांतर : माहूरमध्ये भाजपकडून थंड पाण्याची पाणपोई सुरू

Related Posts

ताज्या घडामोडी

खारघर-कळंबोलीकरांना दिलासा! वीज तक्रारींसाठी महावितरणचा २४x७ नियंत्रण कक्ष सुरू

June 12, 2026
0
ताज्या घडामोडी

कळंबोली-कामोठे परिसरातील वीज समस्येविरोधात स्त्री शक्ती फाउंडेशनचा आवाज बुलंद; चौकशी व कारवाईची विजया कदम यांची मागणी

June 12, 2026
0
क्राईम

तिलारी घाटातील महिला हत्याकांडाचा छडा; कोल्हापूर एलसीबीकडून ३ आरोपींना अटक

June 12, 2026
2
ताज्या घडामोडी

चिंचोली लिंबाजी ग्रामपंचायत निवडणूक 2026 : वार्डनिहाय आरक्षण सोडत जाहीर

June 12, 2026
10
ताज्या घडामोडी

ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी सुनील भुसारा बिनविरोध

June 12, 2026
7
ताज्या घडामोडी

भ्रष्टाचाराला जत नगरपरिषदेत थारा नाही : डॉ. रवींद्र आरळी

June 12, 2026
5
Next Post
वाढदिवसाचे समाजसेवेत रूपांतर : माहूरमध्ये भाजपकडून थंड पाण्याची पाणपोई सुरू

वाढदिवसाचे समाजसेवेत रूपांतर : माहूरमध्ये भाजपकडून थंड पाण्याची पाणपोई सुरू

ताज्या बातम्या

खारघर-कळंबोलीकरांना दिलासा! वीज तक्रारींसाठी महावितरणचा २४x७ नियंत्रण कक्ष सुरू

June 12, 2026

कळंबोली-कामोठे परिसरातील वीज समस्येविरोधात स्त्री शक्ती फाउंडेशनचा आवाज बुलंद; चौकशी व कारवाईची विजया कदम यांची मागणी

June 12, 2026

शेतीच्या बांधावरील वादातून तरुणाचा मृत्यू; गुन्हा दाखल करण्यासाठी नातेवाईकांचा आक्रमक पवित्रा

June 12, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In