• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पांढरकवड्यात कृषी सेवा केंद्रांचा बेमुदत बंद; १२ मागण्यांसाठी आंदोलन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 28, 2026
in ताज्या घडामोडी
0
पांढरकवड्यात कृषी सेवा केंद्रांचा बेमुदत बंद; १२ मागण्यांसाठी आंदोलन
0
SHARES
13
VIEWS
Ad 1

पांढरकवडा (प्रतिनिधी)
राज्यातील कृषी निविष्ठा विक्रेत्यांच्या प्रलंबित अडचणींकडे शासन दुर्लक्ष करत असल्याच्या निषेधार्थ पांढरकवडा येथील कृषी सेवा केंद्र चालकांनी सोमवार, २७ एप्रिल २०२६ पासून बेमुदत बंद आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला यवतमाळ जिल्हा कृषी साहित्य उत्पादक व विक्रेता असोसिएशनसह राज्यातील विविध जिल्हा संघटनांनी पाठिंबा दिला आहे.

बियाणे, रासायनिक खते आणि कीटकनाशकांच्या विक्रीतील विविध समस्यांवर मागील ४ ते ५ वर्षांपासून शासनाकडे पाठपुरावा करूनही ठोस निर्णय न झाल्याने विक्रेत्यांनी हा मार्ग स्वीकारला आहे. खतांच्या पुरवठ्यातील ‘लिंकिंग’ पद्धत बंद करणे, अवैध व अप्रमाणित बियाण्यांवर बंदी, तपासणीतील जबाबदारीत बदल, विक्री मार्जिन वाढविणे तसेच प्रलंबित देयके तात्काळ अदा करणे अशा १२ प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत.

RelatedPosts

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

या आंदोलनामुळे खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना बियाणे व खतांच्या उपलब्धतेवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, हा निर्णय शेतकऱ्यांच्या हितासाठीच घेतल्याचे विक्रेता संघटनेने स्पष्ट केले आहे.

शासनाने तातडीने निर्णय न घेतल्यास आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी केळापूर तालुका कृषी निविष्ठा असोसिएशनचे अध्यक्ष काशिनाथ मिलमिले, सचिव किशोर देशटीवार, उपाध्यक्ष राजेंद्र कांडुरवार, नितीन इंगोले, सुशील कैलास्वार, आशिष कानर्तीवार यांच्यासह अनेक सदस्य उपस्थित होते.

Tags: Nitin Ingole
Previous Post

दोंडाईचा येथे बियाणे व खत विक्रेत्यांचा कडकडीत बंद; विविध मागण्यांसाठी आंदोलनाला पाठिंबा

Next Post

शहादा शहरात ‘गौ सन्मान रॅली’चा उत्साह; गौमातेला ‘राष्ट्रमाता’ दर्जा देण्याची मागणी

Related Posts

ताज्या घडामोडी

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

September 10, 2026
101
ताज्या घडामोडी

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

September 10, 2026
192
ताज्या घडामोडी

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

September 10, 2026
4
ताज्या घडामोडी

म्हसळा पोलीस ठाण्याची इमारत भव्य व्हावी; मात्र नागरिकांना येथे येण्याची वेळ कमी यावी

September 10, 2026
3
ताज्या घडामोडी

गणरायाच्या आगमनाची लगबग; चामोर्शीत गणेशमूर्तींना अंतिम रूप

September 10, 2026
2
ताज्या घडामोडी

आदित्य यशवंत घरत यांची उरण तालुका काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी निवड

September 10, 2026
3
Next Post
शहादा शहरात ‘गौ सन्मान रॅली’चा उत्साह; गौमातेला ‘राष्ट्रमाता’ दर्जा देण्याची मागणी

शहादा शहरात ‘गौ सन्मान रॅली’चा उत्साह; गौमातेला ‘राष्ट्रमाता’ दर्जा देण्याची मागणी

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In