• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

बुद्धाचा संदेश आजच्या काळाची गरज – पत्रकार कांबळे यांचे प्रतिपादन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 2, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
7
VIEWS
Ad 1

सावंगी मेघे येथे बुद्ध जयंतीनिमित्त प्रबोधन मेळावा उत्साहात

वर्धा, दि. — छत्रपती शिवाजी महाराज मित्र परिवार, सावंगी मेघे (वर्धा) यांच्या वतीने तथागत गौतम बुद्ध जयंतीनिमित्त खीरदान वाटप व प्रबोधन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन प्रेमदास मोखाडे व वर्षाताई मोखाडे यांनी केले होते.

RelatedPosts

कोलगाव येथे २६ वर्षीय विवाहितेचा मृत्यू; पोलिस तपास सुरू

शांतीनगरच्या राजाचे भव्य रूप; १५ फुटी गणरायाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

शिवयोद्धा प्रतिष्ठान धोंडराईचा सामाजिक उपक्रम; युवकांच्या एकजुटीतून सेवाभावी कार्याला बळ

कार्यक्रमाची सुरुवात गौतम बुद्ध तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून बुद्ध वंदनेने करण्यात आली. यावेळी मित्र परिवारातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यानंतर सामाजिक कार्यकर्ते तथा प्रबोधनकार पत्रकार कांबळे यांनी आपल्या प्रबोधनातून बुद्ध जयंतीचे महत्त्व स्पष्ट केले. त्यांनी सांगितले की, “बुद्धांचे धम्म तत्त्वज्ञान हे जगात शांतता निर्माण करणारे असून आज देशाला युद्धाची नव्हे, तर बुद्धाची गरज आहे.” त्यांनी पुढे स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यांचे महत्त्व अधोरेखित केले.

तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या मूल्यांना भारतीय संविधानात स्थान देऊन बुद्धांच्या विचारांना संवैधानिक अधिष्ठान दिले, असेही त्यांनी नमूद केले. बुद्ध, फुले आणि आंबेडकर हे परिवर्तनवादी, समतावादी आणि विज्ञाननिष्ठ विचारसरणीचे प्रतीक असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमात बुद्ध-भीम गीतांचे सादरीकरण करण्यात आले. “सारे भारत की शान…” या गीताने वातावरण भारावून गेले. शेवटी उपस्थितांना खीरदानाचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी गणेश इखार, रमेश साटोणे, आनंद सोनटक्के, प्रेमसिंग राठोड, विकेश वानखेडे, सुनील शास्त्रकार, प्रफुल देशमुख, अजय जवादे आदी सदस्यांनी परिश्रम घेतले.

Tags: Shankar Panbude
Previous Post

वर्धा येथे महाराष्ट्र दिन उत्साहात; पोलिसांचा गौरव

Next Post

अपघाताच्या खाईत सेलूकरांना ढकलणारे खोदकाम; प्रशासनाचे दुर्लक्ष

Related Posts

कोलगाव येथे २६ वर्षीय विवाहितेचा मृत्यू; पोलिस तपास सुरू
ताज्या घडामोडी

कोलगाव येथे २६ वर्षीय विवाहितेचा मृत्यू; पोलिस तपास सुरू

September 22, 2026
172
शांतीनगरच्या राजाचे भव्य रूप; १५ फुटी गणरायाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी
ताज्या घडामोडी

शांतीनगरच्या राजाचे भव्य रूप; १५ फुटी गणरायाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

September 22, 2026
62
शिवयोद्धा प्रतिष्ठान धोंडराईचा सामाजिक उपक्रम; युवकांच्या एकजुटीतून सेवाभावी कार्याला बळ
ताज्या घडामोडी

शिवयोद्धा प्रतिष्ठान धोंडराईचा सामाजिक उपक्रम; युवकांच्या एकजुटीतून सेवाभावी कार्याला बळ

September 22, 2026
7
ताज्या घडामोडी

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

September 10, 2026
114
ताज्या घडामोडी

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

September 10, 2026
194
ताज्या घडामोडी

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

September 10, 2026
4
Next Post
अपघाताच्या खाईत सेलूकरांना ढकलणारे खोदकाम; प्रशासनाचे दुर्लक्ष

अपघाताच्या खाईत सेलूकरांना ढकलणारे खोदकाम; प्रशासनाचे दुर्लक्ष

ताज्या बातम्या

नवेगावात नवीन अंगणवाडीचे लोकार्पण

September 22, 2026
मुसरामगुड्याचा मुख्य रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात; तातडीने डांबरीकरणाची मागणी

मुसरामगुड्याचा मुख्य रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात; तातडीने डांबरीकरणाची मागणी

September 22, 2026

पुण्याच्या वाहतूक कोंडीवर ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र नाराज

September 22, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In