• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

अपघाताच्या खाईत सेलूकरांना ढकलणारे खोदकाम; प्रशासनाचे दुर्लक्ष

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 2, 2026
in ताज्या घडामोडी
0
अपघाताच्या खाईत सेलूकरांना ढकलणारे खोदकाम; प्रशासनाचे दुर्लक्ष
0
SHARES
19
VIEWS
Ad 1

सेलू प्रतिनिधी –

शहरातील मेडिकल चौक ते धोऱाड रस्त्यावर पाणीपुरवठा योजनेअंतर्गत करण्यात आलेले खोदकाम नागरिकांच्या जीवावर बेतत असल्याचे चित्र समोर आले आहे. सुमारे चार महिन्यांपूर्वी पाइपलाइन टाकण्यासाठी रस्त्याच्या कडेला मोठी नाली खोदण्यात आली होती. मात्र काम पूर्ण झाल्यानंतरही रस्ता पूर्ववत करण्याकडे ठेकेदाराने दुर्लक्ष केल्याने हा मार्ग अक्षरशः ‘अपघाताचा सापळा’ ठरत आहे.

RelatedPosts

कोलगाव येथे २६ वर्षीय विवाहितेचा मृत्यू; पोलिस तपास सुरू

शांतीनगरच्या राजाचे भव्य रूप; १५ फुटी गणरायाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

शिवयोद्धा प्रतिष्ठान धोंडराईचा सामाजिक उपक्रम; युवकांच्या एकजुटीतून सेवाभावी कार्याला बळ

दररोज शेकडो वाहनांची वर्दळ असलेल्या या रस्त्यावर खोदलेल्या नालीत दुचाकींचे टायर अडकून अनेक अपघात घडले आहेत. काही नागरिक किरकोळ जखमी झाले असून काहींना गंभीर दुखापती झाल्याची माहिती स्थानिकांनी दिली. विशेषतः रात्रीच्या वेळी परिस्थिती अधिक धोकादायक बनत असून मोठ्या दुर्घटनेची भीती व्यक्त केली जात आहे.

रस्ता आधीच अरुंद असल्याने खोदकामामुळे वाहतुकीची कोंडी वाढली आहे. समोरासमोर वाहने आल्यास चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. यामुळे नागरिकांचा संताप वाढत असून, “काम सुरू करताना मोठमोठे दावे केले, पण आता नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे,” अशी तीव्र प्रतिक्रिया स्थानिक रहिवाशांनी व्यक्त केली.

दरम्यान, नगरपंचायत प्रशासनाकडे विचारणा केली असता, “कंत्राटदाराकडे मजूर कमी असल्याने काम रखडले आहे,” असे कारण देण्यात आले. मात्र नागरिकांनी या कारणावर नाराजी व्यक्त करत, “मजूर कमी झाले म्हणून नागरिकांनी जीव धोक्यात घालायचा का?” असा सवाल उपस्थित केला आहे.

चार महिन्यांपासून उघडी पडलेली नाली, वाढते अपघात आणि वाहतुकीची कोंडी यामुळे नागरिकांनी तातडीने रस्ता दुरुस्तीची मागणी केली आहे. प्रशासनाने याकडे त्वरित लक्ष देऊन योग्य उपाययोजना करावी, अन्यथा मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Tags: Shankar Panbude
Previous Post

बुद्धाचा संदेश आजच्या काळाची गरज – पत्रकार कांबळे यांचे प्रतिपादन

Next Post

2029 ला जुने प्रतिस्पर्धी असतील तर पुन्हा निवडणूक लढवणार : खा. निलेश लंके

Related Posts

कोलगाव येथे २६ वर्षीय विवाहितेचा मृत्यू; पोलिस तपास सुरू
ताज्या घडामोडी

कोलगाव येथे २६ वर्षीय विवाहितेचा मृत्यू; पोलिस तपास सुरू

September 22, 2026
169
शांतीनगरच्या राजाचे भव्य रूप; १५ फुटी गणरायाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी
ताज्या घडामोडी

शांतीनगरच्या राजाचे भव्य रूप; १५ फुटी गणरायाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

September 22, 2026
62
शिवयोद्धा प्रतिष्ठान धोंडराईचा सामाजिक उपक्रम; युवकांच्या एकजुटीतून सेवाभावी कार्याला बळ
ताज्या घडामोडी

शिवयोद्धा प्रतिष्ठान धोंडराईचा सामाजिक उपक्रम; युवकांच्या एकजुटीतून सेवाभावी कार्याला बळ

September 22, 2026
7
ताज्या घडामोडी

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

September 10, 2026
114
ताज्या घडामोडी

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

September 10, 2026
194
ताज्या घडामोडी

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

September 10, 2026
4
Next Post
2029 ला जुने प्रतिस्पर्धी असतील तर पुन्हा निवडणूक लढवणार : खा. निलेश लंके

2029 ला जुने प्रतिस्पर्धी असतील तर पुन्हा निवडणूक लढवणार : खा. निलेश लंके

ताज्या बातम्या

नवेगावात नवीन अंगणवाडीचे लोकार्पण

September 22, 2026
मुसरामगुड्याचा मुख्य रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात; तातडीने डांबरीकरणाची मागणी

मुसरामगुड्याचा मुख्य रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात; तातडीने डांबरीकरणाची मागणी

September 22, 2026

पुण्याच्या वाहतूक कोंडीवर ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र नाराज

September 22, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In