• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शेवा कोळीवाडा पुनर्वसन प्रकरण: ४० वर्षांच्या विलंबावर उच्च न्यायालयाची प्रशासनाला फटकार; सहा आठवड्यांत निर्णयाचे आदेश

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 2, 2026
in ताज्या घडामोडी
0
शेवा कोळीवाडा पुनर्वसन प्रकरण: ४० वर्षांच्या विलंबावर उच्च न्यायालयाची प्रशासनाला फटकार; सहा आठवड्यांत निर्णयाचे आदेश
0
SHARES
3
VIEWS
Ad 1

उरण, दि. २ – उरण तालुक्यातील शेवा कोळीवाडा येथील प्रकल्पग्रस्तांच्या ४० वर्षांपासून रखडलेल्या पुनर्वसन प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने केंद्र सरकार आणि जेएनपीए प्रशासनाला कडक शब्दांत सुनावले असून तातडीने प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच अंतिम संधी म्हणून सहा आठवड्यांची मुदत देण्यात आली आहे.

जवाहरलाल नेहरू बंदर प्रकल्पामुळे विस्थापित झालेल्या २५६ कुटुंबांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. या प्रकरणी न्यायालयाने दाखल प्रतिज्ञापत्रावर तीव्र नाराजी व्यक्त करत, “केवळ प्रक्रियात्मक बाबी मांडल्या आहेत; परंतु पुनर्वसनासाठी ठोस कालमर्यादा दिलेली नाही,” असे स्पष्ट करत प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

RelatedPosts

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

न्या. मनीष पितळे आणि न्या. श्रीराम शिरसाट यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले की, “हा केवळ प्रशासकीय विलंब नसून मानवी हक्कांचा गंभीर प्रश्न आहे.” बाधित कुटुंबांनी १९८६ पासून संक्रमण शिबिरात अत्यंत हालअपेष्टांमध्ये आयुष्य व्यतीत केल्याबद्दल न्यायालयाने संताप व्यक्त केला.

विशेषतः संक्रमण शिबिरांतील मूलभूत सुविधांची दयनीय अवस्था अधोरेखित करत, पिण्याच्या पाण्याच्या टंचाईवर न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली. “१५ दिवसांतून केवळ एक तास पाणीपुरवठा होतो, ही परिस्थिती अमानवी आहे,” असे निरीक्षण नोंदवत तातडीने पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे निर्देश देण्यात आले.

२९ एप्रिल २०२६ रोजी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने स्पष्ट केले की, सहा आठवड्यांत पुनर्वसन प्रक्रिया पूर्ण न झाल्यास न्यायालय स्वतः अंतिम आदेश देऊन शासनाला भूखंड वाटपाचे निर्देश देईल.

दरम्यान, मंत्रालयात झालेल्या बैठकीत १०.१६ हेक्टर जमीन केंद्र सरकारकडून राज्य सरकारकडे हस्तांतरित करण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करण्याचे आश्वासन देण्यात आले. पुनर्वसन पूर्ण होईपर्यंत संक्रमण शिबिरातील सर्व सुविधा पुरवण्याची जबाबदारी जेएनपीए प्रशासनावर राहील, असेही स्पष्ट करण्यात आले.

या प्रकरणात जेष्ठ वकील रशीद खान आणि अॅड. सिद्धार्थ इंगळे यांनी प्रकल्पग्रस्तांची बाजू प्रभावीपणे मांडली. तसेच महाराष्ट्र स्मॉल स्केल ट्रेडिशनल फिश वर्कर्स युनियनचे अध्यक्ष नंदकुमार पवार आणि सचिव रमेश कोळी यांनी न्यायालयाच्या हस्तक्षेपामुळे न्याय मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.


याचिकेतील मुख्य मुद्दे:

  • १९८३ मध्ये प्रकल्पासाठी जमीन संपादित; २५६ कुटुंबे विस्थापित
  • १९८६ पासून संक्रमण शिबिरात वास्तव
  • ८८ शेतकरी व १६८ बिगर-शेतकरी कुटुंबांचा समावेश

निधीअभावी विलंबाचा दावा:
जेएनपीएकडून निधीअभावी पुनर्वसन रखडल्याचे सांगण्यात आले. अर्थ मंत्रालयाकडून प्रस्तावावर स्पष्टीकरणे मागवण्यात आली असून सुधारित प्रस्ताव सादर केल्याचेही न्यायालयाला कळवण्यात आले.


या संपूर्ण प्रकरणामुळे शेवा कोळीवाडा प्रकल्पग्रस्तांना मोठा दिलासा मिळण्याची चिन्हे दिसत असून, न्यायालयाच्या हस्तक्षेपामुळे ४० वर्षांपासूनचा प्रश्न मार्गी लागण्याची आशा निर्माण झाली आहे.

Tags: Vithal Mamatabade
Previous Post

वायर जळाल्याने पाणीपुरवठा ठप्प; डोल्हारा ग्रामपंचायतीवर दुर्लक्षाचा आरोप.

Next Post

६० वर्षाच्या नराधमानी ३ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करूण तीचा खुण केला

Related Posts

ताज्या घडामोडी

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

September 10, 2026
101
ताज्या घडामोडी

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

September 10, 2026
192
ताज्या घडामोडी

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

September 10, 2026
4
ताज्या घडामोडी

म्हसळा पोलीस ठाण्याची इमारत भव्य व्हावी; मात्र नागरिकांना येथे येण्याची वेळ कमी यावी

September 10, 2026
3
ताज्या घडामोडी

गणरायाच्या आगमनाची लगबग; चामोर्शीत गणेशमूर्तींना अंतिम रूप

September 10, 2026
2
ताज्या घडामोडी

आदित्य यशवंत घरत यांची उरण तालुका काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी निवड

September 10, 2026
3
Next Post
६० वर्षाच्या नराधमानी ३ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करूण तीचा खुण केला

६० वर्षाच्या नराधमानी ३ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करूण तीचा खुण केला

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In