• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

“८ कृषी केंद्रांवर एकाचवेळी कारवाई!” पाथरीत खत वितरणातील तफावत उघड; ६ परवाने निलंबित

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 2, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
9
VIEWS
Ad 1

▶ अभिलेख, ई-पॉश नोंदी व प्रत्यक्ष साठ्यात विसंगती; शेतकरी हितासाठी प्रशासनाचे कठोर पाऊल

पाथरी (प्रतिनिधी):
तालुक्यातील कृषी सेवा केंद्रांमध्ये अभिलेख, ई-पॉश मशीन नोंदी आणि प्रत्यक्ष खत साठ्यात मोठी तफावत आढळल्याने कृषी विभागाने धडक कारवाई करत एकाच वेळी आठ केंद्रांवर छापे टाकले. या कारवाईत सहा केंद्रांचे परवाने तात्पुरते निलंबित करण्यात आले असून दोन केंद्रांना कडक इशारा देण्यात आला आहे.

RelatedPosts

लोकमान्य टिळक आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जिजाऊ महाविद्यालयात अभिवादन

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त उमरगा मसापतर्फे ‘लेखन प्रेरणा दिन’ उत्साहात साजरा

चांभुर्डी येथे बिबट्याचा वावर स्पष्ट; कुत्र्यावर हल्ल्यानंतर ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

एप्रिल महिन्यात राबविण्यात आलेल्या विशेष तपासणी मोहिमेत काही केंद्रांकडून खत साठा उपलब्ध असतानाही शेतकऱ्यांना न देणे, विक्री नोंदी अपूर्ण ठेवणे तसेच ई-पॉश व्यवहारात विसंगती आढळून आली. या अनियमिततेमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असल्याचे स्पष्ट झाले.

कारवाईअंतर्गत जगदंब अॅग्रो एजन्सी (पाथरी) यांचा परवाना १७ एप्रिल ते १६ मेपर्यंत एका महिन्यासाठी निलंबित करण्यात आला आहे. मातोश्री कृषी भंडार (पाथरी) यांचा परवाना २७ एप्रिल ते २६ मेपर्यंत निलंबित करण्यात आला आहे. सर्वोदय फार्मर प्रोड्यूसर कंपनी लिमिटेड (पाथरी) यांचा परवाना १५ दिवसांसाठी निलंबित करण्यात आला असून तेजस ट्रेडिंग अँड फर्टिलायझर्स व ओंकार ट्रेडर्स (पाथरी) या दोन्ही केंद्रांचे परवाने सात दिवसांसाठी निलंबित करण्यात आले आहेत.

दरम्यान, समृद्धी सीड्स अँड फर्टिलायझर्स आणि दिनेश कृषी सेवा केंद्र (पाथरी) यांना नियमांचे काटेकोर पालन करण्याबाबत सक्त ताकीद देण्यात आली आहे.

खत साठा, विक्री नोंदी व ई-पॉश व्यवहारात पारदर्शकता राखणे बंधनकारक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर यापुढेही कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.

ही कारवाई जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डी. एम. चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या धडक कारवाईमुळे तालुक्यातील इतर कृषी सेवा केंद्रांमध्ये खळबळ उडाली आहे.

Tags: Ahamad Ansari
Previous Post

प्रभाग क्र. ३ मधील नागरिकांचा महावितरणाविरोधात भव्य मोर्चा

Next Post

पाथरीत बुद्ध जयंती व महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

Related Posts

ताज्या घडामोडी

लोकमान्य टिळक आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जिजाऊ महाविद्यालयात अभिवादन

August 2, 2026
1
ताज्या घडामोडी

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त उमरगा मसापतर्फे ‘लेखन प्रेरणा दिन’ उत्साहात साजरा

August 2, 2026
11
ताज्या घडामोडी

चांभुर्डी येथे बिबट्याचा वावर स्पष्ट; कुत्र्यावर हल्ल्यानंतर ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

July 23, 2026
10
ताज्या घडामोडी

दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील कथित लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ शिरूरमध्ये संविधान हातात घेऊन भव्य शांतता मोर्चा

July 23, 2026
20
ताज्या घडामोडी

मलकागुडा येथे स्व. अजितदादा पवार यांची जयंती सर्वधर्मीयांच्या उपस्थितीत साजरी

July 23, 2026
18
ताज्या घडामोडी

स्व. अजितदादा पवार यांची जयंती उत्साहात साजरी

July 23, 2026
3
Next Post
पाथरीत बुद्ध जयंती व महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

पाथरीत बुद्ध जयंती व महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

ताज्या बातम्या

अकोट फैल पुलावरील खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणातील चार आरोपींना नियमित जामीन

August 2, 2026

सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गावंडगाव येथील शेतकऱ्याची आत्महत्या

August 2, 2026

चांभुर्डीचे सुपुत्र दत्तात्रय दळवी यांचा वाढदिवस विद्यार्थ्यांसमवेत उत्साहात; नव्या ग्रंथालयाचे उद्घाटन

August 2, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In