• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

प्रभाग क्र. ३ मधील नागरिकांचा महावितरणाविरोधात भव्य मोर्चा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 2, 2026
in ताज्या घडामोडी
0
प्रभाग क्र. ३ मधील नागरिकांचा महावितरणाविरोधात भव्य मोर्चा
0
SHARES
9
VIEWS
Ad 1

पाथरी (प्रतिनिधी):
शहरातील प्रभाग क्र. ३ मधील सततच्या वीज समस्यांमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी ३० एप्रिल रोजी सकाळी १० वाजता महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी (महावितरण) विरोधात भव्य मोर्चा काढला.

शिवाजीनगर, शाहू नगर, नेताजी नगर, नगर परिषद कॉलनी, भीमनगर, गणेश नगर, व्ही.आय.पी. कॉलनी, रशिद कॉलनी, ओंकार नगर आणि शिक्षक कॉलनी परिसरातील शेकडो नागरिक या मोर्चात सहभागी झाले होते. शिक्षक कॉलनी येथून सुरू झालेला मोर्चा बालाजी मंदिर मार्गे, सेलू कॉर्नर, छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे जात महावितरण कार्यालयावर धडकला.

RelatedPosts

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

या मोर्चाचे नेतृत्व नगर परिषदेचे उपाध्यक्ष आलोक चौधरी आणि नगरसेविका चंद्रकला अनिल ढवळे यांनी केले. “नियमित वीज द्या”, “लो व्होल्टेज बंद करा”, “महावितरण हाय हाय” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.

यावेळी नागरिकांच्या वतीने महावितरणचे उपअभियंता यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. वारंवार होणारे वीज खंडित होणे, पाणीपुरवठ्याच्या वेळी वीज जाणे, लो व्होल्टेज, डीपीवरील वाढता लोड या समस्यांकडे लक्ष वेधण्यात आले.

निवेदनात डीपीची क्षमता वाढवणे, नवीन डीपी बसवणे, एबी स्विचेस बसवणे, नवीन वीज खांब उभारणे, फ्युज कॉल सेवा पारदर्शक करणे तसेच वीजपुरवठा खंडित झाल्यास ग्राहकांना नुकसानभरपाई देण्याची मागणी करण्यात आली. तसेच, दीर्घकालीन उपाय म्हणून नवीन टाऊन फोर विद्युत लाईनला तात्काळ मंजुरी देण्याची मागणीही करण्यात आली.

नागरिकांनी इशारा दिला की, वारंवार सूचना देऊनही ठोस उपाययोजना होत नसल्याने आता संयम सुटला असून तात्काळ सुधारणा न झाल्यास अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.

दरम्यान, महावितरणच्या अधिकाऱ्यांनी निवेदन स्वीकारून समस्यांवर लवकरच कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. या निवेदनावर उपाध्यक्ष आलोक चौधरी, नगरसेविका चंद्रकला ढवळे यांच्यासह प्रभागातील अनेक नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Tags: Ahamad Ansari
Previous Post

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुरेगाव रस्ता येथे महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा

Next Post

“८ कृषी केंद्रांवर एकाचवेळी कारवाई!” पाथरीत खत वितरणातील तफावत उघड; ६ परवाने निलंबित

Related Posts

ताज्या घडामोडी

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

September 10, 2026
101
ताज्या घडामोडी

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

September 10, 2026
192
ताज्या घडामोडी

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

September 10, 2026
4
ताज्या घडामोडी

म्हसळा पोलीस ठाण्याची इमारत भव्य व्हावी; मात्र नागरिकांना येथे येण्याची वेळ कमी यावी

September 10, 2026
3
ताज्या घडामोडी

गणरायाच्या आगमनाची लगबग; चामोर्शीत गणेशमूर्तींना अंतिम रूप

September 10, 2026
2
ताज्या घडामोडी

आदित्य यशवंत घरत यांची उरण तालुका काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी निवड

September 10, 2026
3
Next Post

“८ कृषी केंद्रांवर एकाचवेळी कारवाई!” पाथरीत खत वितरणातील तफावत उघड; ६ परवाने निलंबित

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In