• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पाथरीत बुद्ध जयंती व महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 2, 2026
in ताज्या घडामोडी
0
पाथरीत बुद्ध जयंती व महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा
0
SHARES
3
VIEWS
Ad 1

पाथरी (प्रतिनिधी) : जगाला शांतता, करुणा व मानवतेचा संदेश देणारे महामानव तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या २५७० व्या जयंतीनिमित्त तसेच महाराष्ट्र दिनानिमित्त पाथरी शहरात भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात हा कार्यक्रम उत्साहात व भक्तिमय वातावरणात पार पडला.

दि. १ मे २०२६ रोजी सकाळी १० वाजता भारतीय बौद्ध महासभेचे माजी तालुका अध्यक्ष टी. एम. शेळके यांच्या नेतृत्वाखाली बुद्ध वंदना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी टी. एम. शेळके होते.

RelatedPosts

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

यावेळी ज्येष्ठ नेते प्रकाश उजागरे, सा. का. शामराव ढवळे, बौद्धाचार्य शुद्धोधन शिंदे, बौद्धाचार्य दादाराव ब्रम्हराक्षे, बौद्धाचार्य डी. एल. भालेराव, माजी सभापती डॉ. घोक्षे, नगरसेवक अनिल ढवळे, अतिन फुलवरे, वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष दिनकर कदम, धम्मपाल उघडे, धावरे, पत्रकार राजकुमार गायकवाड, भास्कर पंडित तसेच ज्येष्ठ नेते दिलीप ढवळे आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान मान्यवरांच्या हस्ते भगवान बुद्ध व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच पंचरंगी धम्मध्वजाचे ध्वजारोहण ज्येष्ठ नेते प्रकाश उजागरे यांच्या हस्ते करण्यात आले.

यानंतर बौद्धाचार्य शुद्धोधन शिंदे व दादाराव ब्रम्हराक्षे यांनी बुद्ध वंदना घेतली. धम्मपाल उघडे व धावरे यांनी बुद्ध, धम्म व संघ यांचे महत्त्व विशद करत उपस्थितांना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक बौद्धाचार्य शुद्धोधन शिंदे यांनी केले, तर सूत्रसंचालन आवडाजी ढवळे यांनी केले. आभार प्रदर्शन दादाराव ब्रम्हराक्षे यांनी मानले.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मधुकर शेळके, बन्सीधर धनले, नागसेन मनेरे, पद्मिनीबाई ढवळे, श्रीरंग वाकडे, जीवाजी ढवळे, राजू लांडगे, रवि डंबाळे, संभाजी ढवळे, जाधव (बँक व्यवस्थापक), विमलबाई ढवळे, सोनाबाई लांडगे, मंदाबाई ढवळे, जयश्री ढवळे आदींनी विशेष परिश्रम घेतले.

या कार्यक्रमाला शहरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली असून संपूर्ण परिसर बुद्धमय वातावरणाने भारावून गेला.

Tags: Ahamad Ansari
Previous Post

“८ कृषी केंद्रांवर एकाचवेळी कारवाई!” पाथरीत खत वितरणातील तफावत उघड; ६ परवाने निलंबित

Next Post

आधार अपडेट कॅम्पमुळे विद्यार्थ्यांना दिलासा; बोरगव्हान शाळेत उपक्रम उत्साहात संपन्न

Related Posts

ताज्या घडामोडी

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

September 10, 2026
101
ताज्या घडामोडी

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

September 10, 2026
192
ताज्या घडामोडी

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

September 10, 2026
4
ताज्या घडामोडी

म्हसळा पोलीस ठाण्याची इमारत भव्य व्हावी; मात्र नागरिकांना येथे येण्याची वेळ कमी यावी

September 10, 2026
3
ताज्या घडामोडी

गणरायाच्या आगमनाची लगबग; चामोर्शीत गणेशमूर्तींना अंतिम रूप

September 10, 2026
2
ताज्या घडामोडी

आदित्य यशवंत घरत यांची उरण तालुका काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी निवड

September 10, 2026
3
Next Post
आधार अपडेट कॅम्पमुळे विद्यार्थ्यांना दिलासा; बोरगव्हान शाळेत उपक्रम उत्साहात संपन्न

आधार अपडेट कॅम्पमुळे विद्यार्थ्यांना दिलासा; बोरगव्हान शाळेत उपक्रम उत्साहात संपन्न

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In