• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

सीमा रक्षकाच्या मातापित्याची गॅससाठी ससेहोलपट; सामाजिक कार्यकर्ते मदतीला धावले

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 2, 2026
in ताज्या घडामोडी
0
सीमा रक्षकाच्या मातापित्याची गॅससाठी ससेहोलपट; सामाजिक कार्यकर्ते मदतीला धावले
0
SHARES
9
VIEWS
Ad 1

पातुर | ग्रामीण प्रतिनिधी

पातुर तालुक्यातील गोळेगाव येथील देशसेवेत कार्यरत असलेल्या सीमा रक्षक जवान धम्माभाऊ मोहाडे यांच्या वृद्ध आई-वडिलांना गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी गेल्या महिनाभरापासून मोठी ससेहोलपट सहन करावी लागत होती. मात्र, ही बाब समजताच आलेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते निलेश कापकर यांनी तत्परता दाखवत त्यांना घरपोच गॅस सिलेंडर उपलब्ध करून दिला.

RelatedPosts

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

जवान धम्माभाऊ मोहाडे देशाच्या सीमेवर कर्तव्य बजावत असताना त्यांच्या घरी वृद्ध आई-वडील एकटेच राहतात. वडील भीमराव मोहाडे हे तोंडाच्या कॅन्सरने ग्रस्त असून त्यांची प्रकृती नाजूक आहे. अशा परिस्थितीत गेल्या महिनाभरापासून घरातील गॅस संपलेला होता, मात्र ई-केवायसीसह विविध अडचणींमुळे त्यांना गॅस मिळत नव्हता.

दरम्यान, निलेश कापकर हे त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी भेट दिली असता ही समस्या समोर आली. परिस्थितीची जाणीव होताच त्यांनी स्वतः गॅस एजन्सीकडे जाऊन सिलेंडर आणून दिला आणि वृद्ध दांपत्याला दिलासा दिला.

या घटनेनंतर जवानाच्या आईने अकोला जिल्हाधिकारी व पातुर तहसीलदार यांच्याकडे विनंती केली आहे की, सैनिकांच्या वृद्ध आई-वडिलांसाठी गॅस एजन्सींनी घरपोच सेवा सुरू करावी तसेच ई-केवायसी प्रक्रिया सुलभ करावी.

याबाबत सामाजिक कार्यकर्ते निलेश कापकर यांनीही प्रशासनाला आवाहन करत सांगितले की, “सीमेवर देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांच्या कुटुंबीयांना अशा मूलभूत सेवांसाठी त्रास होऊ नये. प्रशासनाने तत्काळ याकडे लक्ष देऊन आवश्यक त्या सूचना द्याव्यात.”

या घटनेमुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, सैनिकांच्या कुटुंबीयांना भेडसावणाऱ्या समस्यांकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी होत आहे.

Tags: Pradip Tajne
Previous Post

शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध; आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी बैठक

Next Post

निमसोड सिद्धनाथ विद्यालयाच्या विद्यार्थिनीचे एन.एम.एस. परीक्षेत यश; सत्कार समारंभ संपन्न

Related Posts

ताज्या घडामोडी

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

September 10, 2026
101
ताज्या घडामोडी

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

September 10, 2026
192
ताज्या घडामोडी

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

September 10, 2026
4
ताज्या घडामोडी

म्हसळा पोलीस ठाण्याची इमारत भव्य व्हावी; मात्र नागरिकांना येथे येण्याची वेळ कमी यावी

September 10, 2026
3
ताज्या घडामोडी

गणरायाच्या आगमनाची लगबग; चामोर्शीत गणेशमूर्तींना अंतिम रूप

September 10, 2026
2
ताज्या घडामोडी

आदित्य यशवंत घरत यांची उरण तालुका काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी निवड

September 10, 2026
3
Next Post
निमसोड सिद्धनाथ विद्यालयाच्या विद्यार्थिनीचे एन.एम.एस. परीक्षेत यश; सत्कार समारंभ संपन्न

निमसोड सिद्धनाथ विद्यालयाच्या विद्यार्थिनीचे एन.एम.एस. परीक्षेत यश; सत्कार समारंभ संपन्न

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In