• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’ अभियानाला अतनुरात सुरुवात; सदृढ आरोग्याचा जागर

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 3, 2026
in ताज्या घडामोडी
0
‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’ अभियानाला अतनुरात सुरुवात; सदृढ आरोग्याचा जागर
0
SHARES
8
VIEWS
Ad 1

अतनूर, जळकोट (प्रतिनिधी) – नागरिकांचे आरोग्यमान उंचावण्यासाठी शासनाने राबविलेल्या ‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’ या महत्त्वाकांक्षी अभियानाची सुरुवात दि. १ मे, महाराष्ट्र दिनानिमित्त अतनूर येथे करण्यात आली.

गावातील प्रत्येक नागरिकाला घराजवळच आरोग्यसेवा उपलब्ध करून देणे, प्रतिबंधात्मक व प्रोत्साहनात्मक आरोग्यसेवा वाढवणे, जीवनशैलीत सकारात्मक बदल घडवणे आणि लोकसहभागातून आरोग्य व्यवस्थेला बळकट करणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. या उपक्रमात ग्रामपंचायत ही केंद्रबिंदू म्हणून कार्यरत राहणार आहे.

RelatedPosts

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

या कार्यक्रमास प्राथमिक आरोग्य केंद्र अतनूर येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. सकलेन शेख, डॉ. भक्ती कोळळे, आरोग्य सहाय्यिका प्रेमिला म्हेत्रे, आरोग्य सहाय्यक बालाजी सोनटक्के, आरोग्य निरीक्षक शेख सलमान, फार्मसिस्ट गजानन तोंडारे, वरिष्ठ लिपिक पांडुरंग सूर्यवंशी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

तसेच शासननियुक्त ग्राहक संरक्षण परिषदेचे अशासकीय सदस्य तथा दलितमित्र बालासाहेब गोविंदराव शिंदे, ग्राहक जनजागरण व मार्गदर्शन संस्थेचे संस्थापक बी. जी. शिंदे, जिजामाता महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. संध्या शिंदे, वसुंधरा महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. रुक्मिणीबाई सोमवंशी यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्ते, आरोग्य कर्मचारी, आशा कार्यकर्त्या व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

● समित्यांची स्थापना

या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी तालुका स्तरावर समिती स्थापन करण्यात आली आहे. गटविकास अधिकारी हे या समितीचे अध्यक्ष असून ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक, बालविकास प्रकल्प अधिकारी, पाणीपुरवठा विभाग, तालुका विस्तार अधिकारी, गटशिक्षणाधिकारी तसेच स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी यांचा यात समावेश आहे.

यासोबतच ग्रामपंचायत पातळीवरही कृती समिती स्थापन करून गावागावांत आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्याचा मानस व्यक्त करण्यात आला आहे.

Previous Post

कन्नडमध्ये ‘गोदा ते नर्मदा जलयात्रा २०२६’ चे भव्य स्वागत; जलसंवर्धनाचा जागर

Next Post

अतनुरात महाराष्ट्र दिन, कामगार दिन व बौद्ध पौर्णिमा उत्साहात साजरी

Related Posts

ताज्या घडामोडी

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

September 10, 2026
101
ताज्या घडामोडी

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

September 10, 2026
192
ताज्या घडामोडी

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

September 10, 2026
4
ताज्या घडामोडी

म्हसळा पोलीस ठाण्याची इमारत भव्य व्हावी; मात्र नागरिकांना येथे येण्याची वेळ कमी यावी

September 10, 2026
3
ताज्या घडामोडी

गणरायाच्या आगमनाची लगबग; चामोर्शीत गणेशमूर्तींना अंतिम रूप

September 10, 2026
2
ताज्या घडामोडी

आदित्य यशवंत घरत यांची उरण तालुका काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी निवड

September 10, 2026
3
Next Post

अतनुरात महाराष्ट्र दिन, कामगार दिन व बौद्ध पौर्णिमा उत्साहात साजरी

ताज्या बातम्या

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In