• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

अतनुरात महाराष्ट्र दिन, कामगार दिन व बौद्ध पौर्णिमा उत्साहात साजरी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 3, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
3
VIEWS
Ad 1

अतनूर, जळकोट (प्रतिनिधी) – जळकोट तालुक्यातील अतनूर येथे महाराष्ट्र दिन, आंतरराष्ट्रीय कामगार दिन आणि बौद्ध पौर्णिमा मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली.

या निमित्ताने प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच विविध शाळा व महाविद्यालयांच्या प्रांगणात कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. विशेष म्हणजे श्रमाचा गौरव करत महिला कामगार व असंघटित बांधकाम कामगार यांच्या हस्ते ध्वजारोहण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच चंद्रशेखर पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले.

RelatedPosts

लोकमान्य टिळक आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जिजाऊ महाविद्यालयात अभिवादन

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त उमरगा मसापतर्फे ‘लेखन प्रेरणा दिन’ उत्साहात साजरा

चांभुर्डी येथे बिबट्याचा वावर स्पष्ट; कुत्र्यावर हल्ल्यानंतर ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

यानंतर गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, अण्णाभाऊ साठे आणि महात्मा गांधी यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून बुद्ध वंदना घेण्यात आली.

● मान्यवरांचे विचार

सरपंच चंद्रशेखर पाटील यांनी महाराष्ट्र दिनाचे महत्त्व स्पष्ट करत मराठी भाषा ही केवळ भाषा नसून आपली ओळख आणि संस्कृती असल्याचे सांगितले.

अखिल भारतीय महाराष्ट्र प्रदेश असंघटित कामगार व कर्मचारी काँग्रेसचे राज्य समन्वयक एस. जी. शिंदे-पाटील आणि राष्ट्रीय मजदूर संघाचे मराठवाडा अध्यक्ष बालासाहेब गोविंदराव शिंदे यांनी कामगार दिनाचे महत्त्व अधोरेखित करत कामगारांच्या हक्कांबाबत जागरूकता निर्माण करण्याचे आवाहन केले.

तसेच बौद्ध पौर्णिमेनिमित्त भगवान गौतम बुद्ध यांच्या करुणा, समता आणि अहिंसेच्या विचारांना उजाळा देत “अप्प दीपो भव” हा संदेश आजही मार्गदर्शक असल्याचे सांगण्यात आले.

● उपस्थिती

या कार्यक्रमास ग्रामसेवक फिरोज शेख, माजी सैनिक इस्माईल मुंजेवार, सेवानिवृत्त मुख्याध्यापक बाबुराव पंचगल्ले, वैद्यकीय अधिकारी डॉ. सकलेन शेख, डॉ. भक्ती कोळ्ळे, तसेच विविध सामाजिक कार्यकर्ते, आरोग्य कर्मचारी, आशा कार्यकर्त्या व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमामुळे अतनूर परिसरात देशभक्ती, सामाजिक जागर आणि अध्यात्मिक वातावरण निर्माण झाले.

Previous Post

‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’ अभियानाला अतनुरात सुरुवात; सदृढ आरोग्याचा जागर

Next Post

स्वस्तात सोने देण्याच्या आमिषाने दाम्पत्याला ७ लाखांचा गंडा

Related Posts

ताज्या घडामोडी

लोकमान्य टिळक आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जिजाऊ महाविद्यालयात अभिवादन

August 2, 2026
0
ताज्या घडामोडी

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त उमरगा मसापतर्फे ‘लेखन प्रेरणा दिन’ उत्साहात साजरा

August 2, 2026
9
ताज्या घडामोडी

चांभुर्डी येथे बिबट्याचा वावर स्पष्ट; कुत्र्यावर हल्ल्यानंतर ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

July 23, 2026
8
ताज्या घडामोडी

दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील कथित लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ शिरूरमध्ये संविधान हातात घेऊन भव्य शांतता मोर्चा

July 23, 2026
18
ताज्या घडामोडी

मलकागुडा येथे स्व. अजितदादा पवार यांची जयंती सर्वधर्मीयांच्या उपस्थितीत साजरी

July 23, 2026
17
ताज्या घडामोडी

स्व. अजितदादा पवार यांची जयंती उत्साहात साजरी

July 23, 2026
3
Next Post

स्वस्तात सोने देण्याच्या आमिषाने दाम्पत्याला ७ लाखांचा गंडा

ताज्या बातम्या

अकोट फैल पुलावरील खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणातील चार आरोपींना नियमित जामीन

August 2, 2026

सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गावंडगाव येथील शेतकऱ्याची आत्महत्या

August 2, 2026

चांभुर्डीचे सुपुत्र दत्तात्रय दळवी यांचा वाढदिवस विद्यार्थ्यांसमवेत उत्साहात; नव्या ग्रंथालयाचे उद्घाटन

August 2, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In