• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पनवेल महापालिकेत जनगणना – २०२७’ अंतर्गत ‘स्व-गणना’ उपक्रमाची महापौरांच्या हस्ते प्रभावी सुरुवात.

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 3, 2026
in ताज्या घडामोडी
0
पनवेल महापालिकेत जनगणना – २०२७’ अंतर्गत ‘स्व-गणना’ उपक्रमाची महापौरांच्या हस्ते प्रभावी सुरुवात.
0
SHARES
8
VIEWS
Ad 1

पनवेल प्रतिनिधी:-
पनवेल महानगरपालिका मुख्यालयात आज भारत सरकारच्या आगामी जनगणना 2027 अंतर्गत ‘स्व-गणना’ (Self Enumeration) उपक्रमाचा शुभारंभ महापौर नितीन पाटील तसेच लोकप्रतिनिधी यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी महापौर आणि उपस्थित लोकप्रतिनिधी तसेच अधिकाऱ्यांनी स्वतः ऑनलाईन माध्यमातून ‘स्व-गणना’ पूर्ण करून नागरिकांसाठी आदर्श निर्माण केला. या उपक्रमाद्वारे नागरिकांनी स्वतःची व कुटुंबाची माहिती डिजिटल पद्धतीने नोंदविण्याचे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.

RelatedPosts

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

महापौरांनी आपल्या संदेशात नमूद केले की, “जनगणना ही देशाच्या विकास आराखड्याचा पाया असून प्रत्येक नागरिकाने अचूक माहिती देणे अत्यंत आवश्यक आहे. ‘स्व-गणना’मुळे प्रक्रिया अधिक सुलभ, पारदर्शक व वेळेची बचत करणारी ठरणार आहे.”

‘स्व गणना’ ०१ मे ते १५ मे दरम्यान होणार आहे. यासाठी भारत सरकारने मोबाईल ॲप तसेच वेबलिंक च्या माध्यमातून सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. शासनाच्या se.census.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपल्या कुटुंबाची माहिती नागरिकांनी अचूक आणि वेळेत भरावी. ही प्रक्रिया अतिशय सोपी, सुरक्षित आणि पूर्णतः ऑनलाइन आहे.

पनवेल महानगरपालिका आयुक्त मंगेश चितळे व प्रशासनाकडून सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, त्यांनी ‘स्व-गणना’ उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवून देशाच्या या महत्त्वपूर्ण जनगणनेच्या कार्यात योगदान द्यावे. स्व-गणना केल्यामुळे वेळेची तर बचत होणारच आहे तसेच अचूक माहितीही नोंदवता येणार आहे. यामुळे प्रशासनाचे काम सुलभ होणार आहे.

पनवेल महानगरपालिका प्रशासन जनगणना २०२७ यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी सज्ज असून नागरिकांच्या सक्रिय सहभागातून ही मोहीम अधिक प्रभावी होणार आहे.

Tags: Shrinath Laad
Previous Post

कामोठ्यात दिशा महिला मंचतर्फे “अस्मिता महाराष्ट्राची २०२६” शताब्दी महोत्सव उत्साहात

Next Post

विड्यात अवैध इंधन साठ्यावर पोलिसांचा छापा; टायर वर्कशॉपच्या नावाखाली चालणाऱ्या काळ्याबाजाराचा पर्दाफाश

Related Posts

ताज्या घडामोडी

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

September 10, 2026
100
ताज्या घडामोडी

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

September 10, 2026
192
ताज्या घडामोडी

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

September 10, 2026
4
ताज्या घडामोडी

म्हसळा पोलीस ठाण्याची इमारत भव्य व्हावी; मात्र नागरिकांना येथे येण्याची वेळ कमी यावी

September 10, 2026
3
ताज्या घडामोडी

गणरायाच्या आगमनाची लगबग; चामोर्शीत गणेशमूर्तींना अंतिम रूप

September 10, 2026
2
ताज्या घडामोडी

आदित्य यशवंत घरत यांची उरण तालुका काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी निवड

September 10, 2026
3
Next Post
विड्यात अवैध इंधन साठ्यावर पोलिसांचा छापा; टायर वर्कशॉपच्या नावाखाली चालणाऱ्या काळ्याबाजाराचा पर्दाफाश

विड्यात अवैध इंधन साठ्यावर पोलिसांचा छापा; टायर वर्कशॉपच्या नावाखाली चालणाऱ्या काळ्याबाजाराचा पर्दाफाश

ताज्या बातम्या

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In