• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

विड्यात अवैध इंधन साठ्यावर पोलिसांचा छापा; टायर वर्कशॉपच्या नावाखाली चालणाऱ्या काळ्याबाजाराचा पर्दाफाश

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 3, 2026
in ताज्या घडामोडी
0
विड्यात अवैध इंधन साठ्यावर पोलिसांचा छापा; टायर वर्कशॉपच्या नावाखाली चालणाऱ्या काळ्याबाजाराचा पर्दाफाश
0
SHARES
42
VIEWS
Ad 1

केज: तालुक्यातील विडा येथे विनापरवाना पेट्रोल आणि डिझेलची बेकायदेशीर साठवणूक करून त्याची चढ्या दराने विक्री करणाऱ्या एका इसमावर केज पोलिसांनी धाड टाकून कारवाई केली आहे. टायर वर्कशॉपच्या नावाखाली चालणाऱ्या या अवैध धंद्याचा पोलिसांनी पर्दाफाश केला असून घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात इंधन जप्त करण्यात आले आहे.

याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण किर्तने यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी या कारवाईत ईश्वर अशोक ढोबळे (राहणार विडा, ता. केज) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपीने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी कोणत्याही परवान्याशिवाय ज्वलनशील पदार्थांची साठवणूक केल्याचे तपासात समोर आले आहे.

RelatedPosts

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

पोलीस पथक हद्दीत गस्त घालत असताना त्यांना विडा गावातील ‘ढोबळे टायर वर्क्स’ या दुकानामध्ये अवैध इंधन साठा असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी पंचांसह दुकानावर अचानक छापा टाकला असता तेथे प्लास्टिकच्या कॅनमध्ये डिझेल आणि पेट्रोल मिळून आले. त्यानंतर पोलिसांनी आरोपीच्या घराची झडती घेतली असता घराच्या पाठीमागील बाजूस निळ्या रंगाच्या कॅनमध्ये लपवून ठेवलेला डिझेलचा साठा हस्तगत केला.

या कारवाईत एकूण १८ हजार ४५० रुपये किमतीचे १९८ लिटर डिझेल आणि ३ लिटर पेट्रोल जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण किर्तने, अंमलदार संतोष गित्ते, शिवाजी कागदे, शहादेव म्हेत्रे आणि नितीन जाधव यांच्या पथकाने यशस्वी केली आहे.

Tags: Sagar Kale
Previous Post

पनवेल महापालिकेत जनगणना – २०२७’ अंतर्गत ‘स्व-गणना’ उपक्रमाची महापौरांच्या हस्ते प्रभावी सुरुवात.

Next Post

भगवंतराव कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय अहेरीची उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम

Related Posts

ताज्या घडामोडी

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

September 10, 2026
101
ताज्या घडामोडी

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

September 10, 2026
192
ताज्या घडामोडी

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

September 10, 2026
4
ताज्या घडामोडी

म्हसळा पोलीस ठाण्याची इमारत भव्य व्हावी; मात्र नागरिकांना येथे येण्याची वेळ कमी यावी

September 10, 2026
3
ताज्या घडामोडी

गणरायाच्या आगमनाची लगबग; चामोर्शीत गणेशमूर्तींना अंतिम रूप

September 10, 2026
2
ताज्या घडामोडी

आदित्य यशवंत घरत यांची उरण तालुका काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी निवड

September 10, 2026
3
Next Post
भगवंतराव कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय अहेरीची उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम

भगवंतराव कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय अहेरीची उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम

ताज्या बातम्या

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In