• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तंत्रज्ञानाधारित उपाययोजनांसह पोलिस प्रशासन अधिक सक्षम करण्यावर भर- पालकमंत्री डॉ.पंकज भोयर

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 3, 2026
in ताज्या घडामोडी
0
नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तंत्रज्ञानाधारित उपाययोजनांसह पोलिस प्रशासन अधिक सक्षम करण्यावर भर- पालकमंत्री डॉ.पंकज भोयर
0
SHARES
9
VIEWS
Ad 1

पालकमंत्र्यांनी घेतला पोलिस विभागाचा आढावा

प्रतिनिधी
वर्धा, दि. २ (जिमाका ) :
गुन्हेगारांना जरब बसेल आणि सामान्य नागरिक सुरक्षित राहील ही आमची प्राथमिकता आहे. बदलत्या गुन्हेगारी पद्धती लक्षात घेता पोलिस यंत्रणाही तितकीच सक्षम असणे आवश्यक आहे. पुढील काळात तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करून पोलिस प्रशासन अधिक सक्षम करण्यावर भर देण्यात येत असल्याचे गृह (ग्रामीण) राज्यमंत्री तथा पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी सांगितले.

पोलिस अधीक्षक कार्यालयात गेल्या वर्षभरात केलेल्या कामकाजाचा आढावा पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी घेतला. जिल्हाधिकारी वान्मथी सी, पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, उपअधिक्षक पुंडलिक भटकर यांच्यासह पोलिस विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

RelatedPosts

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

जिल्ह्यातील प्रत्येक शहरात पोलिस विभागामार्फत सीसीटीव्ही प्रकल्प राबविण्यात आले आहेत. उर्वरित दोन-तीन शहरांमध्येही काम प्रगतीपथावर आहे. गुन्हेगारांकडून होणारा तंत्रज्ञानाचा वापर पाहता, पोलिस विभागानेही तितक्याच आधुनिक पद्धतीने सज्ज राहावे. गुन्ह्यांची उकल करण्यासाठी सीसीटीव्ही यंत्रणा उपयुक्त ठरत असून गुन्हे प्रतिबंध आणि तपास कार्य अधिक परिणामकारक करण्याच्या सूचना पालकमंत्री डॉ. भोयर यांनी दिल्या.
​
जिल्ह्यात नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने मागील आठ ते दहा वर्षांत विविध उपक्रम राबविण्यात आले. जिल्ह्यातील दारूबंदीच्या विषयावर बोलताना स्पष्ट करण्यात आले की, जिल्ह्याची ही परंपरा कायम राखण्यासाठी शासन सकारात्मक आहे. मात्र, केवळ कागदोपत्री बंदी न राहता तिची प्रत्यक्ष आणि कडक अंमलबजावणी व्हावी, यासाठी विशेष मोहिमा राबविण्यात याव्यात. लोकांच्या भावना लक्षात घेऊन या विषयात प्रशासनाने अधिक संवेदनशीलपणे काम करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.


​
शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीच्या समस्येकडेही लक्ष वेधण्यात आले. अनेक रस्ते अरुंद असताना त्यावर वाढलेले अतिक्रमण नागरिकांसाठी त्रासदायक ठरत आहे. अतिक्रमण हटविण्यासाठी प्रशासनाने ठोस कारवाई करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. नागरिकांची सुरक्षितता, पर्यावरणपूरक उपक्रम आणि शिस्तबद्ध शहरी व्यवस्थापन यासाठी जिल्हा प्रशासनाने समन्वयाने काम करण्याची गरज आहे. सुधारित निकषावर पोलिस पदभरती, वाहने, नवीन पोलिस स्टेशन इमारत, पोलिस वसाहत आदी प्रलंबित प्रकरणांबाबत लवकरच बैठक आयोजित करण्यात येईल, असे पालकमंत्री म्हणाले.

यावेळी प्रसारमाध्यम प्रतिनिधीनी शहरातील अवजड वाहतूक, अवैध दारू विक्री, सुगंधित तंबाखू, रेन वॉटर हार्वेस्टिंग आदीबाबत पालकमंत्री डॉ. भोयर यांना माहिती दिली. वर्ध्याचा विकास करताना सुरक्षा, तंत्रज्ञान आणि पर्यावरण यांचा समतोल राखणे ही आमची प्राथमिकता आहे. नवीन उभारण्यात येणाऱ्या सर्व शासकीय इमारतीवर रेन वॉटर हार्वेस्टिंग सक्तीचे करण्यात येणार असून जिल्हाधिकारी कार्यालयात याची अंमलबजावणी करण्यात आली आहे. आपणाकडे असणारी माहिती द्या त्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असे पालकमंत्र्यांनी यावेळी पत्रकारांशी संवाद साधतांना आश्वस्त केले.

Tags: Shankar Panbude
Previous Post

उपप्रादेशिक परिवहन कार्यालय वर्धा येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

Next Post

दीपचंद चौधरी कनिष्ठ महाविद्यालयाचा दिमाखदार निकाल; विज्ञान शाखेत 97.82% यश

Related Posts

ताज्या घडामोडी

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

September 10, 2026
101
ताज्या घडामोडी

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

September 10, 2026
192
ताज्या घडामोडी

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

September 10, 2026
4
ताज्या घडामोडी

म्हसळा पोलीस ठाण्याची इमारत भव्य व्हावी; मात्र नागरिकांना येथे येण्याची वेळ कमी यावी

September 10, 2026
3
ताज्या घडामोडी

गणरायाच्या आगमनाची लगबग; चामोर्शीत गणेशमूर्तींना अंतिम रूप

September 10, 2026
2
ताज्या घडामोडी

आदित्य यशवंत घरत यांची उरण तालुका काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी निवड

September 10, 2026
3
Next Post
दीपचंद चौधरी कनिष्ठ महाविद्यालयाचा दिमाखदार निकाल; विज्ञान शाखेत 97.82% यश

दीपचंद चौधरी कनिष्ठ महाविद्यालयाचा दिमाखदार निकाल; विज्ञान शाखेत 97.82% यश

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In