• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

मुरूममध्ये वीज समस्येवर तातडीची बैठक; आमदार प्रवीण स्वामींचे उपाययोजनांचे निर्देश

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 4, 2026
in ताज्या घडामोडी
0
मुरूममध्ये वीज समस्येवर तातडीची बैठक; आमदार प्रवीण स्वामींचे उपाययोजनांचे निर्देश
0
SHARES
77
VIEWS
Ad 1

मुरूम (प्रतिनिधी) : उमरगा तालुक्यातील मुरूम व परिसरातील वाढत्या वीज समस्येवर तोडगा काढण्यासाठी नगर परिषद कार्यालयात दि. २ मे रोजी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत स्थानिक आमदार प्रवीण स्वामी उपस्थित राहून समस्यांवर तात्काळ उपाययोजना करण्याचे निर्देश महावितरण अधिकाऱ्यांना दिले.

नगरपालिका सभागृहात झालेल्या बैठकीत शेतकरी व नागरिकांनी वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. सततच्या विजेच्या चढ-उतारामुळे विद्युत मोटारी जळत असून, यामुळे पिकांचे व आर्थिक नुकसान होत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

RelatedPosts

लोकमान्य टिळक आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जिजाऊ महाविद्यालयात अभिवादन

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त उमरगा मसापतर्फे ‘लेखन प्रेरणा दिन’ उत्साहात साजरा

चांभुर्डी येथे बिबट्याचा वावर स्पष्ट; कुत्र्यावर हल्ल्यानंतर ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

यावेळी आमदार प्रवीण स्वामी यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट शब्दांत निर्देश देत नागरिकांच्या तक्रारी तातडीने सोडवाव्यात, तसेच प्रलंबित प्रश्नांवर वेळेत कार्यवाही करावी, असे सांगितले. “नागरिकांना होणारा त्रास थांबवणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे,” असे ठाम मत त्यांनी व्यक्त केले. तसेच महावितरणसमोरील अडचणींचा आढावा घेऊन त्यावर तोडगा काढण्याचेही आश्वासन दिले.

बैठकीदरम्यान काही तक्रारींचे तत्काळ निवारण करण्यात आले, तर उर्वरित प्रश्नांवर लवकरच ठोस कार्यवाही करण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले.

शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या :

  • मुरूम शहरासाठी स्वतंत्र १३३ केव्ही उपकेंद्र सुरू करावे
  • उच्च दाबाने वीजपुरवठा करावा
  • वागदरी ते आलूर वीजवाहिनीचे रखडलेले काम तातडीने सुरू करावे
  • केसर जवळगा येथे एक दिवसाआड होणारा वीजपुरवठा नियमित करावा
  • शेतीसाठी किमान सहा तासांचा अखंडित वीजपुरवठा द्यावा

या बैठकीला शिवसेना (उभा टा) उपजिल्हाप्रमुख बसवराज वरनाळे, महावितरणाचे अभियंते, कनिष्ठ अभियंता सचिन मुरूम, गणेश शेबाडकर, तसेच विविध पक्षांचे पदाधिकारी व शेतकरी नेते उपस्थित होते. बेळंब, मुरूम, केसर जवळगा परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपापल्या समस्या मांडल्या.

दरम्यान, मुरूम शहरात प्रथमच अशा प्रकारे बैठक घेऊन थेट शेतकऱ्यांशी संवाद साधल्याबद्दल आमदार प्रवीण स्वामी यांचे उपस्थितांनी आभार मानले.

Tags: Ladlesab Nadaf
Previous Post

जनगणना 2027 अंतर्गत किनवटमध्ये स्वगणनेला उत्साहात प्रारंभ; नगराध्यक्ष सुजाताताई यंड्रलवार यांच्या हस्ते शुभारंभ

Next Post

शिवाना-टाकळी प्रकल्पासाठी १४० कोटींचा निधी मंजूर; कन्नड-सोयगाव मतदारसंघाच्या विकासाला मिळणार गती

Related Posts

ताज्या घडामोडी

लोकमान्य टिळक आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जिजाऊ महाविद्यालयात अभिवादन

August 2, 2026
1
ताज्या घडामोडी

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त उमरगा मसापतर्फे ‘लेखन प्रेरणा दिन’ उत्साहात साजरा

August 2, 2026
11
ताज्या घडामोडी

चांभुर्डी येथे बिबट्याचा वावर स्पष्ट; कुत्र्यावर हल्ल्यानंतर ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

July 23, 2026
10
ताज्या घडामोडी

दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील कथित लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ शिरूरमध्ये संविधान हातात घेऊन भव्य शांतता मोर्चा

July 23, 2026
20
ताज्या घडामोडी

मलकागुडा येथे स्व. अजितदादा पवार यांची जयंती सर्वधर्मीयांच्या उपस्थितीत साजरी

July 23, 2026
18
ताज्या घडामोडी

स्व. अजितदादा पवार यांची जयंती उत्साहात साजरी

July 23, 2026
4
Next Post
शिवाना-टाकळी प्रकल्पासाठी १४० कोटींचा निधी मंजूर; कन्नड-सोयगाव मतदारसंघाच्या विकासाला मिळणार गती

शिवाना-टाकळी प्रकल्पासाठी १४० कोटींचा निधी मंजूर; कन्नड-सोयगाव मतदारसंघाच्या विकासाला मिळणार गती

ताज्या बातम्या

अकोट फैल पुलावरील खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणातील चार आरोपींना नियमित जामीन

August 2, 2026

सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गावंडगाव येथील शेतकऱ्याची आत्महत्या

August 2, 2026

चांभुर्डीचे सुपुत्र दत्तात्रय दळवी यांचा वाढदिवस विद्यार्थ्यांसमवेत उत्साहात; नव्या ग्रंथालयाचे उद्घाटन

August 2, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In