• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

मंजरथ येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर’ उत्साहात संपन्न

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 4, 2026
in ताज्या घडामोडी
0
मंजरथ येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर’ उत्साहात संपन्न
0
SHARES
0
VIEWS
Ad 1

माजलगाव (प्रतिनिधी) : महसूल व वन विभागाच्या वतीने महसूल मंडळ मंजरथ आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर अभियान (टप्पा क्र. १) दि. ३० एप्रिल २०२६ रोजी जि.प. प्राथमिक शाळा, मंजरथ येथे उत्साहात पार पडले. या शिबिरात नागरिकांना विविध शासकीय सेवा एकाच ठिकाणी तत्काळ उपलब्ध करून देण्यात आल्या.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार प्रकाशदादा सोळंके होते. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहेमान, अपर जिल्हाधिकारी अश्विनी जिरंगे उपस्थित होते. तसेच उपविभागीय अधिकारी गौरव इंगोले, तहसीलदार संतोष रुईकर, गटविकास अधिकारी ज्योत्सना मुळीक, तालुका कृषी अधिकारी गणेश बादाडे, तालुका आरोग्य अधिकारी मधुकर घुबडे, तसेच भूमी अभिलेख विभागाचे अधिकारी आदींची विशेष उपस्थिती होती.

RelatedPosts

भीषण अपघातात पती-पत्नी ठार; एक वर्षाचे बाळ चमत्कारिकरित्या बचावले

मंठा तालुक्यात संभाजी ब्रिगेडचे जनआंदोलन; प्रशासनाविरोधात संताप उफाळला

गडचिरोलीत आढळला दुर्मिळ ‘पांढरा उंदीर’; गोकुल नगरात कुतूहल

या शिबिरात नागरिकांना विविध सेवा पुरविण्यात आल्या. त्यामध्ये जातीचे अर्ज स्वीकारणे व प्रमाणपत्र वाटप, रहिवासी व उत्पन्न प्रमाणपत्र देणे, ७/१२ उतारे वितरण, फेरफार प्रकरणे निकाली काढणे, अभिलेख दुरुस्ती, रस्त्यांच्या नोंदी अद्ययावत करणे यांसारख्या महसूल संबंधित सेवा देण्यात आल्या.

तसेच मोफत आरोग्य तपासणी शिबीर, आधार व ई-केवायसी कॅम्प, ई-शिधापत्रिका वाटप, अॅग्रीस्टॅक योजना, पीएम किसान योजनेबाबत मार्गदर्शन, एनसीएमसी स्मार्ट कार्ड सुविधा यांचाही लाभ नागरिकांनी घेतला. विविध अर्थसाह्य योजना, पशुसंवर्धन, कृषी व पंचायत समिती विभागांच्या योजनांबाबत माहिती देण्यात आली.

विशेष म्हणजे पात्र घरकुल लाभार्थ्यांना ५ ब्रास वाळू मोफत देण्याची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली.

या शिबिरामुळे नागरिकांची कामे तात्काळ मार्गी लागली असून ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. विविध विभागांच्या समन्वयातून आयोजित या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

Previous Post

“खुश कर, दहा दिवस सुट्टी देतो” – जळगावात महिला कर्मचाऱ्याचा लैंगिक छळ; वरिष्ठ अधिकाऱ्यावर गुन्हा

Next Post

नगराध्यक्षा प्रेरणाताई कोटलावार यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन

Related Posts

ताज्या घडामोडी

भीषण अपघातात पती-पत्नी ठार; एक वर्षाचे बाळ चमत्कारिकरित्या बचावले

May 4, 2026
1
मंठा तालुक्यात संभाजी ब्रिगेडचे जनआंदोलन; प्रशासनाविरोधात संताप उफाळला
ताज्या घडामोडी

मंठा तालुक्यात संभाजी ब्रिगेडचे जनआंदोलन; प्रशासनाविरोधात संताप उफाळला

May 4, 2026
1
गडचिरोलीत आढळला दुर्मिळ ‘पांढरा उंदीर’; गोकुल नगरात कुतूहल
ताज्या घडामोडी

गडचिरोलीत आढळला दुर्मिळ ‘पांढरा उंदीर’; गोकुल नगरात कुतूहल

May 4, 2026
2
९८% वीजबिल वसुलीबद्दल तंत्रज्ञ राम हरी अण्णा यांचा गौरव
ताज्या घडामोडी

९८% वीजबिल वसुलीबद्दल तंत्रज्ञ राम हरी अण्णा यांचा गौरव

May 4, 2026
3
ताज्या घडामोडी

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्याने मारेगावमध्ये तणाव; ५२ शिवप्रेमींवर गुन्हे

May 4, 2026
8
नगराध्यक्षा प्रेरणाताई कोटलावार यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन
ताज्या घडामोडी

नगराध्यक्षा प्रेरणाताई कोटलावार यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन

May 4, 2026
11
Next Post
नगराध्यक्षा प्रेरणाताई कोटलावार यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन

नगराध्यक्षा प्रेरणाताई कोटलावार यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन

ताज्या बातम्या

भीषण अपघातात पती-पत्नी ठार; एक वर्षाचे बाळ चमत्कारिकरित्या बचावले

May 4, 2026
मंठा तालुक्यात संभाजी ब्रिगेडचे जनआंदोलन; प्रशासनाविरोधात संताप उफाळला

मंठा तालुक्यात संभाजी ब्रिगेडचे जनआंदोलन; प्रशासनाविरोधात संताप उफाळला

May 4, 2026
निगडीतील माई सेवा केंद्रात गर्दीचा भडका; बंदमुळे नागरिक त्रस्त

निगडीतील माई सेवा केंद्रात गर्दीचा भडका; बंदमुळे नागरिक त्रस्त

May 4, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In