• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

चिंचणी येथील श्री शिवाजी हायस्कूलमध्ये माजी विद्यार्थी स्नेहबंध मेळावा उत्साहात संपन्न

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 4, 2026
in Blog
0
चिंचणी येथील श्री शिवाजी हायस्कूलमध्ये माजी विद्यार्थी स्नेहबंध मेळावा उत्साहात संपन्न
0
SHARES
180
VIEWS
Ad 1

कडेगाव (प्रतिनिधी) : गांधी एज्युकेशन सोसायटी, कुंडल संचलित चिंचणी (अं.) येथील श्री शिवाजी हायस्कूलमध्ये सन १९५७ ते २०२५ पर्यंतच्या विविध बॅचमधील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहबंध मेळावा रविवारी (दि. ३ मे) मोठ्या उत्साहात पार पडला. अनेक वर्षांनंतर एकत्र आलेल्या विद्यार्थी-शिक्षकांनी जुन्या आठवणींना उजाळा देत कार्यक्रम रंगतदार केला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यालयातील शिक्षक व माजी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. शालेय जीवनात ज्ञान, विज्ञान व सुसंस्कारांचे धडे देणाऱ्या गुरुजनांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

RelatedPosts

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

या वेळी मुख्याध्यापक अरुण सावत यांनी प्रस्ताविक मार्गदर्शन करताना स्नेहबंध मेळाव्याचे महत्त्व स्पष्ट केले. शालेय जीवनातील नातेसंबंध आयुष्यभर टिकणारे असून गाव व शाळेच्या विकासासाठी माजी विद्यार्थ्यांनी योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

१९५९ च्या बॅचचे माजी विद्यार्थी पी. सी. जाधव यांनी आपल्या मनोगतात शिक्षक-विद्यार्थी नात्याचे महत्त्व अधोरेखित केले. “शाळेने दिलेले संस्कार आणि शिक्षणामुळेच आपण आयुष्यात पुढे जाऊ शकलो,” असे सांगत त्यांनी शाळेच्या विकासासाठी नेहमीच सहकार्य करण्याची ग्वाही दिली.

माजी विद्यार्थ्यांनी आपल्या आयुष्यातील अनुभव मांडत सुख-दुःखाच्या आठवणी शेअर केल्या. दीर्घ काळानंतर झालेल्या भेटीमुळे सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. जणू काही पुन्हा शालेय जीवनात परतल्याची भावना सर्वांच्या मनात दाटून आली होती.

या निमित्ताने अनेक माजी विद्यार्थ्यांनी शाळेसाठी रोख रक्कम, धनादेश तसेच विविध शैक्षणिक साहित्य देणगी स्वरूपात दिले. भविष्यात विद्यार्थ्यांसाठी आधुनिक सुविधा व प्रयोगशाळा उभारण्यासाठी सहकार्य करण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला. दरवर्षी दिवाळीच्या काळात अशा स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्याची अपेक्षा देखील व्यक्त करण्यात आली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल कुंभार यांनी केले, तर आभार प्रदर्शन सौ. वैशाली मोहिते यांनी केले. अत्यंत भावनिक आणि आनंददायी वातावरणात हा स्नेहबंध मेळावा पार पडला.

चौकट : स्पर्धा परीक्षेत श्री शिवाजी हायस्कूलची आघाडी

स्पर्धा परीक्षेत यश मिळवलेल्या आकांक्षा माने व करिष्मा शिखलगार यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी आकांक्षा माने हिने “आई-वडील, गुरुजी व मित्रांच्या मार्गदर्शनामुळेच हे यश मिळाले,” असे सांगत विद्यालयाचे नाव देशभरात उज्ज्वल करण्याची इच्छा व्यक्त केली.

Previous Post

नगराध्यक्षा प्रेरणाताई कोटलावार यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन

Next Post

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्याने मारेगावमध्ये तणाव; ५२ शिवप्रेमींवर गुन्हे

Related Posts

Blog

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
1
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी
Blog

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026
3
Blog

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026
43
Blog

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026
13
Blog

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पेणमध्ये वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांची विशेष दक्षता

September 15, 2026
4
गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
8
Next Post

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्याने मारेगावमध्ये तणाव; ५२ शिवप्रेमींवर गुन्हे

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In