• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

खळबळजनक: वैजापूर तालुक्यात सौर ऊर्जा कंपन्यांकडून शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक; सरकारी नियमांना केराची टोपली!

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 5, 2026
in ताज्या घडामोडी
0
खळबळजनक: वैजापूर तालुक्यात सौर ऊर्जा कंपन्यांकडून शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक; सरकारी नियमांना केराची टोपली!
0
SHARES
209
VIEWS
Ad 1

वैजापूर | प्रतिनिधी:

महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबवल्या जाणाऱ्या सौर कृषी पंप योजनेचा लाभ घेताना वैजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना नाहक आर्थिक त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शासनाने नियुक्त केलेल्या कंत्राटदार कंपन्यांकडून शेतकऱ्यांची सर्रास लूट सुरू असून, प्रशासकीय अधिकाऱ्यांचे याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे.
स्वतःच्या खर्चाने वाहतूक आणि साहित्य
शासकीय नियमांनुसार (GR), सौर पंप बसवण्यासाठी शेतकऱ्यांकडून कोणत्याही प्रकारचे अतिरिक्त शुल्क घेता येत नाही. मात्र, वैजापूर तालुक्यात परिस्थिती अगदी उलट आहे. कंपन्यांचे प्रतिनिधी सौर प्लेट्स शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पोहोचवण्याऐवजी, शेतकऱ्यांनाच स्वतःच्या खर्चाने खासगी वाहने भाड्याने करून साहित्य नेण्यास भाग पाडत आहेत. इतकेच नव्हे तर, सौर प्लेट्स बसवण्यासाठी लागणारी वाळू, सिमेंट, खडी आणि खड्डे खोदण्याचा खर्चही शेतकऱ्यांच्याच खिशातून जात आहे.

RelatedPosts

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

पर्लकोटा नदीच्या पुरात एसडीआरएफचा मदतीचा हात

वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

कमिशनखोरीचा सुळसुळाट
सोलर बसवण्यासाठी येणारे तंत्रज्ञ आणि कर्मचारी कामाच्या बदल्यात शेतकऱ्यांकडे १,००० ते २,००० रुपयांची उघड मागणी करत आहेत. पैसे न दिल्यास काम रेंगाळले जाते किंवा तांत्रिक त्रुटी काढल्या जातात, अशा तक्रारी शेतकऱ्यांनी केल्या आहेत. आधीच नैसर्गिक संकट आणि कर्जबाजारीपणामुळे मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत असताना, दुसरीकडे सरकारी योजनेच्या नावाखाली होणारी ही लूट संतापजनक आहे.
अधिकाऱ्यांचे अर्थपूर्ण दुर्लक्ष?
या सर्व गैरप्रकारांची माहिती स्थानिक प्रशासनाला नाही की ते मुद्दाम डोळेझाक करत आहेत, असा सवाल आता समस्त वैजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांकडून होत आहे

Tags: Ravindra Pawar
Previous Post

पातुर पंचायत समितीत अर्धनग्न आंदोलन; निधीच्या हिशोबावरून प्रशासनाला जाब

Next Post

लातूरमध्ये राजकीय हालचालींना वेग; शिंदे गटात प्रवेशानंतर नेत्यांची भूमिका स्पष्ट

Related Posts

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान
ताज्या घडामोडी

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

September 26, 2026
9
पर्लकोटा नदीच्या पुरात एसडीआरएफचा मदतीचा हात
ताज्या घडामोडी

पर्लकोटा नदीच्या पुरात एसडीआरएफचा मदतीचा हात

September 26, 2026
5
वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला
ताज्या घडामोडी

वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

September 25, 2026
48
ताज्या घडामोडी

महामार्गावरील दुभाजक ठरतोय अपघातांना निमंत्रण

September 25, 2026
16
धान पिकावरील रोगराई व किडींच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी संकटात
ताज्या घडामोडी

धान पिकावरील रोगराई व किडींच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी संकटात

September 25, 2026
16
दुष्काळ परिस्थितीबाबत ३० सप्टेंबरनंतरच पुढील मूल्यांकन; पाऊस व पीकस्थितीच्या अचूक नोंदी ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
ताज्या घडामोडी

दुष्काळ परिस्थितीबाबत ३० सप्टेंबरनंतरच पुढील मूल्यांकन; पाऊस व पीकस्थितीच्या अचूक नोंदी ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

September 25, 2026
8
Next Post
लातूरमध्ये राजकीय हालचालींना वेग; शिंदे गटात प्रवेशानंतर नेत्यांची भूमिका स्पष्ट

लातूरमध्ये राजकीय हालचालींना वेग; शिंदे गटात प्रवेशानंतर नेत्यांची भूमिका स्पष्ट

ताज्या बातम्या

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

September 26, 2026
कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

September 26, 2026
जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 26, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In