• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शहाद्याच्या वरिष्ठ महाविद्यालयाला विद्यापीठाच्या शैक्षणिक अंकेक्षणात ‘अ’ दर्जाचे मानांकन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 5, 2026
in ताज्या घडामोडी
0
शहाद्याच्या वरिष्ठ महाविद्यालयाला विद्यापीठाच्या शैक्षणिक अंकेक्षणात ‘अ’ दर्जाचे मानांकन
0
SHARES
58
VIEWS
Ad 1

शहादा,दि.५
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने नुकतीच मागील वर्षांच्या शैक्षणिक अंकेक्षणाची (Academic Audit) यादी जाहीर केली आहे. या महत्त्वपूर्ण मूल्यांकनात शहादा येथील पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या कला, विज्ञान व वाणिज्य वरिष्ठ महाविद्यालयाने घवघवीत यश संपादन करत ‘अ’ दर्जाचे मानांकन प्राप्त केले आहे. महाविद्यालयाच्या या कामगिरीमुळे संपूर्ण शिक्षण क्षेत्रात कौतुक होत आहे.
विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील महाविद्यालयांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवून हे शैक्षणिक अंकेक्षण पार पडले. यामध्ये अध्यापनाची गुणवत्ता, संशोधन उपक्रम, विद्यार्थी विकास कार्यक्रम आणि संस्थेची एकूण प्रगती यांचे सर्वंकष मूल्यमापन करण्यात आले. या प्रक्रियेत विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, त्यांना घडवणारे विविध उपक्रम, परीक्षा निकाल, महाविद्यालय गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांचे स्थान, राबविल्या जाणाऱ्या विद्यार्थी हिताच्या योजना, अद्ययावत ग्रंथालय आणि पायाभूत सोयी-सुविधा, तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध सुविधा या निकषांवर महाविद्यालयाची पारख करण्यात आली. त्याचबरोबर प्राध्यापकांचे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवरील शोधनिबंध, प्लेसमेंट मुलाखतीद्वारे विद्यार्थ्यांना मिळवून दिलेल्या नोकरीच्या संधी या सर्वांची सखोल तपासणी करून कुलगुरूंनी गठित केलेल्या समितीने महाविद्यालयास ‘अ’ दर्जा बहाल केला आहे.

RelatedPosts

बाळगंगा प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या प्रस्तावास मान्यता

जलतारा व वनराई बंधारे उभारणीसाठी १ ते १० ऑक्टोबरदरम्यान विशेष मोहीम

पाळये दशक्रोशीत वन्यप्राण्यांच्या उपद्रवाविरोधात तीव्र आंदोलन; २ ऑक्टोबरला उपोषण

विशेष म्हणजे, हे महाविद्यालय यापूर्वीच ‘नॅक’कडून (NAAC) ‘अ’ दर्जा प्राप्त असून, नंदुरबार जिल्ह्यातील ‘नॅक’च्या तिसऱ्या फेरीत ‘अ’ दर्जा मिळवणारे कबचौ उमवि कार्यक्षेत्रातील हे एकमेव महाविद्यालय आहे. या यशाबद्दल पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष बापूसाहेब दीपकभाई पाटील, उपाध्यक्ष जगदीश पाटील, मंडळाचे संचालक मयूरभाई दीपक पाटील, शैक्षणिक व सामान्य प्रशासन विभागाचे समन्वयक प्रा. मकरंद पाटील, प्राचार्य डॉ. एम. के. पटेल आणि संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. महाविद्यालयाचा गुणात्मक दर्जा राखण्यासाठी सहकार्य करणाऱ्या विद्यार्थी, माजी विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे प्राचार्य डॉ. एम. के. पटेल यांनी आभार मानले आहेत.

।। विशेष चौकट ।।

“मंडळाचे संस्थापक स्वर्गीय अण्णासाहेब पी. के. पाटील यांच्या ‘थांबला तो संपला’ या सूत्रावर आधारित आमच्या सर्व ज्ञानशाखांची वाटचाल सुरू आहे. शैक्षणिक अंकेक्षणात मिळालेला ‘अ’ दर्जा ही आमच्यासाठी अभिमानास्पद बाब आहे. महाविद्यालयाची शैक्षणिक गुणवत्ता उंचावण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी संस्था नेहमीच आग्रही असते आणि याचा सकारात्मक परिणाम महाविद्यालयाच्या प्रगतीत दिसून येत आहे.”
-बापूसाहेब दीपकभाई पाटील (अध्यक्ष, पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळ, शहादा)

“कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अंकेक्षणातून मिळालेला ‘अ’ दर्जा हा आमच्या सामूहिक आणि प्रामाणिक प्रयत्नांचा विजय आहे. संस्थेच्या व्यवस्थापन मंडळाचे नेहमीच गुणात्मक विकासासाठी मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभत असते. विद्यार्थी हिताला प्राधान्य देत, भविष्यातही नवनवीन उपक्रम राबवून महाविद्यालयाचा नावलौकिक वाढवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
-प्रा. मकरंद पाटील (समन्वयक, शैक्षणिक व सामान्य प्रशासन विभाग, शहादा)

Previous Post

बसवेश्वर महाविद्यालयाचे घवघवीत यशदीपराज रोडे विज्ञान शाखेतून तर श्रुतिका मगर वाणिज्य शाखेतून तालुक्यात प्रथम

Next Post

स्ट्रीट लाईट व नाले सफाईसाठी उपाध्यक्षा माधवीताई पाटील आक्रमक

Related Posts

बाळगंगा प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या प्रस्तावास मान्यता
ताज्या घडामोडी

बाळगंगा प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या प्रस्तावास मान्यता

September 30, 2026
13
ताज्या घडामोडी

जलतारा व वनराई बंधारे उभारणीसाठी १ ते १० ऑक्टोबरदरम्यान विशेष मोहीम

September 30, 2026
6
ताज्या घडामोडी

पाळये दशक्रोशीत वन्यप्राण्यांच्या उपद्रवाविरोधात तीव्र आंदोलन; २ ऑक्टोबरला उपोषण

September 30, 2026
5
खासगी रुग्णालयांतील वैद्यकीय उपकरणांच्या दरांची FDA कडून पडताळणी
ताज्या घडामोडी

खासगी रुग्णालयांतील वैद्यकीय उपकरणांच्या दरांची FDA कडून पडताळणी

September 30, 2026
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी ब्रह्मपुरीत काँग्रेसचे आंदोलन
ताज्या घडामोडी

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी ब्रह्मपुरीत काँग्रेसचे आंदोलन

September 30, 2026
17
ब्रह्मपुरी तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करा; तालुका काँग्रेस कमिटीची मागणी
ताज्या घडामोडी

ब्रह्मपुरी तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करा; तालुका काँग्रेस कमिटीची मागणी

September 30, 2026
12
Next Post
स्ट्रीट लाईट व नाले सफाईसाठी उपाध्यक्षा माधवीताई पाटील आक्रमक

स्ट्रीट लाईट व नाले सफाईसाठी उपाध्यक्षा माधवीताई पाटील आक्रमक

ताज्या बातम्या

१८ महिन्यांची मुदत संपूनही माहूरचा स्कायवॉक अधांतरी!

१८ महिन्यांची मुदत संपूनही माहूरचा स्कायवॉक अधांतरी!

September 30, 2026

बाळगंगा प्रकल्पाच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या आराखड्यास मान्यता

September 30, 2026
बाळगंगा प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या प्रस्तावास मान्यता

बाळगंगा प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या प्रस्तावास मान्यता

September 30, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In