• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

वर्ध्यात पहाटे मोठी कारवाई; १५ लाखांची अवैध दारू जप्त, दोन कारसह तिघे ताब्यात

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 5, 2026
in ताज्या घडामोडी
0
वर्ध्यात पहाटे मोठी कारवाई; १५ लाखांची अवैध दारू जप्त, दोन कारसह तिघे ताब्यात
0
SHARES
43
VIEWS
Ad 1

वर्धा (प्रतिनिधी) : वर्धा शहर पोलिसांनी अवैध दारू तस्करीविरुद्ध मोठी धडक कारवाई करत पहाटेच्या सुमारास नागसेन नगर, नालवाडी परिसरात १५ लाखांहून अधिक किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

पोलीस उपनिरीक्षक विशाल सवाई यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार दोन पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट कारमधून मोठ्या प्रमाणात विदेशी दारूची वाहतूक होणार होती. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संतोष ताले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तत्काळ नाकेबंदी केली.

RelatedPosts

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

पर्लकोटा नदीच्या पुरात एसडीआरएफचा मदतीचा हात

वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

पहाटे सुमारे ४ वाजता संशयित वाहने दिसताच पोलिसांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, चालकांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी पाठलाग करून दोन्ही कार अडवून ताब्यात घेतल्या.

झडतीदरम्यान ३१ पेट्या विदेशी दारू (ऑफिसर चॉईस, बॉम्बे व्हिस्की, मॅजिक मोमेंट व्होडका, बडवायझर बिअर) जप्त करण्यात आली. यासोबत दोन स्विफ्ट कारही जप्त करण्यात आल्या. एकूण मुद्देमालाची किंमत सुमारे १५ लाख ३४ हजार रुपये आहे.

या प्रकरणी सुमीत मनोज पाला (२५), गणेश विजय भाट (२१) आणि प्रद्युम राजन सेन (२६) या तिघांना अटक करण्यात आली आहे. प्राथमिक चौकशीत ही दारू मध्य प्रदेशातील सालबर्डी येथून आणल्याचे समोर आले आहे.

आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा व मोटार वाहन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक सौरव कुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मकेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या यशस्वी कारवाईमुळे शहर पोलिसांचे नागरिकांकडून कौतुक केले जात आहे.

Tags: Shankar Panbude
Previous Post

नागापूरचे ग्रामपंचायत सदस्य विकास भैय्या बनसोडे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमातून साजरा

Next Post

महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी आरोपींना कठोर शिक्षा द्या; आजऱ्यात उपसभापती यशोदा पोवार यांचे निवेदन

Related Posts

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान
ताज्या घडामोडी

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

September 26, 2026
4
पर्लकोटा नदीच्या पुरात एसडीआरएफचा मदतीचा हात
ताज्या घडामोडी

पर्लकोटा नदीच्या पुरात एसडीआरएफचा मदतीचा हात

September 26, 2026
3
वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला
ताज्या घडामोडी

वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

September 25, 2026
44
ताज्या घडामोडी

महामार्गावरील दुभाजक ठरतोय अपघातांना निमंत्रण

September 25, 2026
14
धान पिकावरील रोगराई व किडींच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी संकटात
ताज्या घडामोडी

धान पिकावरील रोगराई व किडींच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी संकटात

September 25, 2026
16
दुष्काळ परिस्थितीबाबत ३० सप्टेंबरनंतरच पुढील मूल्यांकन; पाऊस व पीकस्थितीच्या अचूक नोंदी ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
ताज्या घडामोडी

दुष्काळ परिस्थितीबाबत ३० सप्टेंबरनंतरच पुढील मूल्यांकन; पाऊस व पीकस्थितीच्या अचूक नोंदी ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

September 25, 2026
8
Next Post
महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी आरोपींना कठोर शिक्षा द्या; आजऱ्यात उपसभापती यशोदा पोवार यांचे निवेदन

महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी आरोपींना कठोर शिक्षा द्या; आजऱ्यात उपसभापती यशोदा पोवार यांचे निवेदन

ताज्या बातम्या

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

September 26, 2026
कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

September 26, 2026
जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 26, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In