• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कृषी विज्ञान केंद्र, धुळे येथे कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांची भेट; विविध प्रकल्पांची पाहणी व मार्गदर्शन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 5, 2026
in ताज्या घडामोडी
0
कृषी विज्ञान केंद्र, धुळे येथे कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांची भेट; विविध प्रकल्पांची पाहणी व मार्गदर्शन
0
SHARES
84
VIEWS
Ad 1

धुळे (प्रतिनिधी):
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरीचे सन्माननीय कुलगुरू डॉ. विलासजी खर्चे यांनी कृषी विज्ञान केंद्र (KVK), धुळे येथे भेट देऊन केंद्रातील विविध कृषी उपक्रमांची पाहणी केली. शेतकरी हिताच्या योजनांना गती देणे आणि विस्तार कार्याचा आढावा घेणे हा या भेटीचा प्रमुख उद्देश होता.

भेटीदरम्यान कुलगुरूंनी केंद्राच्या प्रक्षेत्रावरील विविध प्रकल्पांची सखोल पाहणी केली. यामध्ये शेळीपालन प्रकल्प व गोट गॅलरीचे उद्घाटन, “संतुलित खत वापर जागरूकता अभियान–2026” भित्तीपत्रिकेचे विमोचन, तसेच एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन युनिट, नैसर्गिक शेतीतील निविष्ठा उत्पादन प्रकल्प, गांडूळ खत उत्पादन प्रकल्प आणि फळझाडे व भाजीपाला रोपवाटिका यांचा समावेश होता.

RelatedPosts

बोरिवली पूर्व येथे भटक्या-विमुक्तांसाठी शासकीय प्रमाणपत्रांचे शिबिर उत्साहात

ग्रामसभेच्या पूर्वसंमतीशिवाय प्रकल्पाला मंजुरी?

अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणूक : माजी आमदार राहुल जगताप यांचा पहिला अर्ज दाखल

यानंतर झालेल्या बैठकीत वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. दिनेश नांद्रे यांनी केंद्राचा प्रगती अहवाल सादर केला. यावेळी कुलगुरूंनी शास्त्रज्ञ व कर्मचाऱ्यांशी संवाद साधत हवामान अनुकूल शेती, संतुलित खत वापर, नैसर्गिक शेतीचा प्रसार आणि एकात्मिक शेती पद्धती विकसित करण्यावर विशेष भर दिला.

तसेच संशोधनातील तंत्रज्ञान थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी नाविन्यपूर्ण विस्तार पद्धती अवलंबण्याचे निर्देश त्यांनी दिले. ग्रामीण युवकांसाठी कृषी-उद्योजकता विकास प्रशिक्षण, शेतकरी उत्पादक संघटनांना (FPO) तांत्रिक पाठबळ, तसेच विद्यापीठाच्या गुणवत्तापूर्ण निविष्ठा विक्री केंद्राद्वारे शेतकऱ्यांपर्यंत सुविधा पोहोचवण्यावरही त्यांनी भर दिला.

‘फुले समृद्धी ग्राम’ संकल्पनेअंतर्गत विविध विभागांच्या समन्वयातून प्रभावी अंमलबजावणी करण्याचेही त्यांनी मार्गदर्शन केले. केव्हीके, धुळे येथील प्रशिक्षण कार्यक्रमांबाबत समाधान व्यक्त करत कुलगुरूंनी पुढील हंगामासाठी शुभेच्छा दिल्या.

या वेळी विद्यापीठ अभियंता श्री. मिलिंद ढोके, शासकीय कृषी महाविद्यालय, धुळेचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. बबनराव इल्हे, विविध विभाग प्रमुख, कर्मचारी तसेच कृषी विज्ञान केंद्रातील सर्व शास्त्रज्ञ व अधिकारी उपस्थित होते.

Previous Post

उंडेमळा शाळेतील विविध उपक्रमांचे कौतुक; गटविकास अधिकाऱ्यांकडून समाधान व्यक्त

Next Post

बोरधरण प्रकल्पग्रस्तांसाठी १०० कोटींच्या निधीचा प्रस्ताव; जिल्हाधिकाऱ्यांचे तातडीचे आदेश

Related Posts

बोरिवली पूर्व येथे भटक्या-विमुक्तांसाठी शासकीय प्रमाणपत्रांचे शिबिर उत्साहात
ताज्या घडामोडी

बोरिवली पूर्व येथे भटक्या-विमुक्तांसाठी शासकीय प्रमाणपत्रांचे शिबिर उत्साहात

September 29, 2026
4
ग्रामसभेच्या पूर्वसंमतीशिवाय प्रकल्पाला मंजुरी?
ताज्या घडामोडी

ग्रामसभेच्या पूर्वसंमतीशिवाय प्रकल्पाला मंजुरी?

September 29, 2026
1
अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणूक : माजी आमदार राहुल जगताप यांचा पहिला अर्ज दाखल
ताज्या घडामोडी

अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणूक : माजी आमदार राहुल जगताप यांचा पहिला अर्ज दाखल

September 29, 2026
4
सोगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी शारदा सरडे यांची बिनविरोध निवड
ताज्या घडामोडी

सोगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी शारदा सरडे यांची बिनविरोध निवड

September 29, 2026
20
ताज्या घडामोडी

संविधान सप्ताहानिमित्त दोडामार्ग येथे तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा

September 29, 2026
2
ताज्या घडामोडी

दहावीच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान कोणाच्या निष्काळजीपणामुळे?

September 29, 2026
5
Next Post
बोरधरण प्रकल्पग्रस्तांसाठी १०० कोटींच्या निधीचा प्रस्ताव; जिल्हाधिकाऱ्यांचे तातडीचे आदेश

बोरधरण प्रकल्पग्रस्तांसाठी १०० कोटींच्या निधीचा प्रस्ताव; जिल्हाधिकाऱ्यांचे तातडीचे आदेश

ताज्या बातम्या

माहूर शहरातील रखडलेली महामार्गाची कामे पूर्ण करण्यासाठी आमरण उपोषण

माहूर शहरातील रखडलेली महामार्गाची कामे पूर्ण करण्यासाठी आमरण उपोषण

September 30, 2026

लोक परिवर्तन वृत्तपत्र समूहाच्या वर्धापन दिनानिमित्त अशोक सूर्यवंशी यांचा तीन राज्यस्तरीय पुरस्कारांनी गौरव!

September 30, 2026
बोरिवली पूर्व येथे भटक्या-विमुक्तांसाठी शासकीय प्रमाणपत्रांचे शिबिर उत्साहात

बोरिवली पूर्व येथे भटक्या-विमुक्तांसाठी शासकीय प्रमाणपत्रांचे शिबिर उत्साहात

September 29, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In