• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

आश्रमशाळेत विद्यार्थ्याला अमानवी वागणूक प्रकरणी चौकशीचे आदेश; दोषींवर कठोर कारवाईची मागणी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 6, 2026
in ताज्या घडामोडी
0
आश्रमशाळेत विद्यार्थ्याला अमानवी वागणूक प्रकरणी चौकशीचे आदेश; दोषींवर कठोर कारवाईची मागणी
0
SHARES
67
VIEWS
Ad 1

दोषींवर कारवाई करा व शाळेची मान्यता रद्द करण्याची मागणी

अक्राणी प्रतिनिधी : कै.एमडी सोनवणे अनुदानित आदिवासी आश्रम शाळा, त-हाडी तालुका शहादा येथील विद्यार्थी प्रतीक निमा वळवी इयत्ता ४ थी याच्यावर मुत्राशयाला दोरी बांधून झालेल्या अमानवीय वागणूक व शिक्षकांच्या निष्काळजीपणाबाबत योग्य ती कारवाई करावी व आश्रमशाळेची मान्यता रद्द करावी, अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेकडून अपर आयुक्त आदिवासी विकास भवन नाशिक यांच्या कडे निवेदन देऊन करण्यात आली आहे. यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा, आदिवासी युवा संघटनेचे रूपसिंग वसावे, राष्ट्रीय आदिवासी स्वायत्त परिषद भारतचे महासचिव रोहीदास वळवी, जिल्हाध्यक्ष पंकज वळवी, नंदुरबार तालुका अध्यक्ष अजय वळवी, भारत आदिवासी संविधान सेनेचे कार्याध्यक्ष रविंद्र वळवी, दिलीप मुसळदे,मगन पावरा, दिनेश वसावे आदि कार्यकर्ते उपस्थित होते.

RelatedPosts

बाळगंगा प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या प्रस्तावास मान्यता

जलतारा व वनराई बंधारे उभारणीसाठी १ ते १० ऑक्टोबरदरम्यान विशेष मोहीम

पाळये दशक्रोशीत वन्यप्राण्यांच्या उपद्रवाविरोधात तीव्र आंदोलन; २ ऑक्टोबरला उपोषण

‌निवेदनात म्हटले आहे की, अनुदानित आदिवासी आश्रम शाळा, त-हाडी, ता. शहादा, जि. नंदुरबार येथील इयत्ता ४ थीत शिकणारा विद्यार्थी प्रतीक निमा वळवी याच्या मुत्राशयाला दोरी बांधून अत्यंत गंभीर व अमानवी प्रकार घडलेला आहे.दिनांक ०६/०२/२०२५ रोजी सदर विद्यार्थ्याच्या मुत्राशय म्हणजेच प्रायव्हेट भागाला दोरी बांधण्यात आली. हा प्रकार अत्यंत धोकादायक असूनही शाळेतील शिक्षकांनी या गंभीर प्रकाराकडे पूर्णतः दुर्लक्ष केले. दिनांक ०८/०२/२०२५ रोजी ही बाब उघडकीस आली, म्हणजे तीन दिवस विद्यार्थ्याला कोणतीही मदत मिळाली नाही किंवा औषधोपचार करण्यात आले नाहीत.या निष्काळजीपणामुळे विद्यार्थ्याची प्रकृती गंभीर झाली. त्याला प्रथम धुळे येथील रुग्णालयात दाखल करून ऑपरेशन करण्यात आले, परंतु ते यशस्वी झाले नाही. त्यानंतर नंदुरबार येथील खासगी रुग्णालयात पुन्हा ऑपरेशन करण्यात आले.तरी देखील संबंधित शाळेतील शिक्षकांनी या घटनेबाबत कोणतीही जबाबदारी घेतली नाही. उलट, विचारणा केल्यावर “एलसी घेऊन जा” शाळा सोडल्याचा दाखला देऊन जा,असे सांगून पालकांना व विद्यार्थ्याला मानसिक त्रास देण्यात येत आहे.

ही घटना अत्यंत गंभीर असून आदिवासी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत मोठा प्रश्न निर्माण करते. त्यामुळे आपणास नम्र विनंती आहे की:१) या संपूर्ण घटनेची तात्काळ सखोल चौकशी करण्यात यावी.२) संबंधित दोषी शिक्षकांवर कडक कायदेशीर कारवाई करावी.३) पीडित विद्यार्थ्याला योग्य ती वैद्यकीय मदत व आर्थिक सहाय्य करण्यात ४) आश्रमशाळेची मान्यता रद्द करण्यात यावी ५) भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी शाळेत कडक उपाययोजना कराव्यात.तरी आपण या प्रकरणात तात्काळ लक्ष घालून शाळेची मान्यता रद्द करावी,विद्यार्थी व पालकास न्याय द्यावा, अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेकडून अपर आयुक्तांकडे करण्यात आली आहे.निवेदनाची दखल घेऊन अपर आयुक्तांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत.

Previous Post

कळंबोलीत चोरांचा सुळसुळाट; ‘दिशा कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट’चे एसी पाईप चोरीला…

Next Post

शहादा नगरपालिकेची विशेष सभा कोरमअभावी तहकूब

Related Posts

बाळगंगा प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या प्रस्तावास मान्यता
ताज्या घडामोडी

बाळगंगा प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या प्रस्तावास मान्यता

September 30, 2026
13
ताज्या घडामोडी

जलतारा व वनराई बंधारे उभारणीसाठी १ ते १० ऑक्टोबरदरम्यान विशेष मोहीम

September 30, 2026
6
ताज्या घडामोडी

पाळये दशक्रोशीत वन्यप्राण्यांच्या उपद्रवाविरोधात तीव्र आंदोलन; २ ऑक्टोबरला उपोषण

September 30, 2026
5
खासगी रुग्णालयांतील वैद्यकीय उपकरणांच्या दरांची FDA कडून पडताळणी
ताज्या घडामोडी

खासगी रुग्णालयांतील वैद्यकीय उपकरणांच्या दरांची FDA कडून पडताळणी

September 30, 2026
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी ब्रह्मपुरीत काँग्रेसचे आंदोलन
ताज्या घडामोडी

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी ब्रह्मपुरीत काँग्रेसचे आंदोलन

September 30, 2026
17
ब्रह्मपुरी तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करा; तालुका काँग्रेस कमिटीची मागणी
ताज्या घडामोडी

ब्रह्मपुरी तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करा; तालुका काँग्रेस कमिटीची मागणी

September 30, 2026
11
Next Post
शहादा नगरपालिकेची विशेष सभा कोरमअभावी तहकूब

शहादा नगरपालिकेची विशेष सभा कोरमअभावी तहकूब

ताज्या बातम्या

१८ महिन्यांची मुदत संपूनही माहूरचा स्कायवॉक अधांतरी!

१८ महिन्यांची मुदत संपूनही माहूरचा स्कायवॉक अधांतरी!

September 30, 2026

बाळगंगा प्रकल्पाच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या आराखड्यास मान्यता

September 30, 2026
बाळगंगा प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या प्रस्तावास मान्यता

बाळगंगा प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या प्रस्तावास मान्यता

September 30, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In