• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

भूमी अभिलेख कार्यालयाला कायमस्वरूपी अधीक्षकांची प्रतीक्षा; नागरी हित संघर्ष समितीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 7, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
23
VIEWS
Ad 1

शहादा, दि. ०७ (का.प्र.) : कृषी, सहकार आणि शैक्षणिक क्षेत्रात जिल्ह्यात अग्रेसर असलेल्या शहादा तालुक्यातील भूमी अभिलेख कार्यालयाला गेल्या पाच ते सहा वर्षांपासून कायमस्वरूपी अधीक्षक मिळालेले नसल्याने नागरिक व शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे. प्रभारी अधिकाऱ्यांच्या कारभारामुळे कामकाजात शिथिलता आली असून कार्यालयात दलालांचा सुळसुळाट वाढल्याचा आरोप करत शहादा नागरी हित संघर्ष समितीने नंदुरबार जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, शहादा तालुक्यात १८४ महसुली गावे असून लोकसंख्याही मोठ्या प्रमाणात आहे. एवढ्या विस्तीर्ण तालुक्याचा कारभार सध्या शेजारच्या तालुक्यातील अधीक्षकांकडे प्रभारी स्वरूपात सोपवण्यात आला आहे. संबंधित अधिकारी महिन्यातून केवळ काही दिवसच कार्यालयात उपस्थित राहत असल्याने प्रशासकीय कामकाजावर परिणाम होत आहे.

RelatedPosts

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

पर्लकोटा नदीच्या पुरात एसडीआरएफचा मदतीचा हात

वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

अधिकारी अनुपस्थित असल्याचा फायदा घेत काही कर्मचारीही वेळेवर कार्यालयात उपस्थित राहत नसल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. ग्रामीण भागातून उन्हातान्हात प्रवास करून येणाऱ्या शेतकऱ्यांना “साहेब मोजणीला गेले आहेत” असे सांगून परत पाठवले जाते. हक्काच्या कामासाठी आलेल्या नागरिकांकडे दुर्लक्ष करून दलालांच्या कामांना प्राधान्य दिले जात असल्याचा गंभीर आरोप समितीने केला आहे.

कायमस्वरूपी अधिकारी नसल्यामुळे कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार वाढला असून सर्वसामान्य नागरिकांना त्याचा मोठा फटका बसत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार राजेश पाडवी, आमदार चंद्रकांत रघुवंशी तसेच नाशिक महसूल आयुक्त यांनाही पाठवण्यात आल्या आहेत.

शहादा शहराचा वाढता विस्तार आणि शेतीचे वाढते क्षेत्र लक्षात घेता, भूमी अभिलेख कार्यालयात पूर्णवेळ कायमस्वरूपी अधीक्षकांची नियुक्ती करून जनतेचा त्रास कमी करावा, अशी मागणी शहादा नागरी हित संघर्ष समितीने केली आहे.

Tags: Netradipak Kuwar
Previous Post

‘स्वच्छतेत नंबर वन’चा दावा फोल; अवकाळी पावसाने येणेगुर ग्रामपंचायतीच्या नियोजनाचा बोजवारा

Next Post

उदगीर येथे आयोजित २०० व्या नेत्रशिबिरात ५४ यशस्वी शस्त्रक्रिया

Related Posts

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान
ताज्या घडामोडी

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

September 26, 2026
9
पर्लकोटा नदीच्या पुरात एसडीआरएफचा मदतीचा हात
ताज्या घडामोडी

पर्लकोटा नदीच्या पुरात एसडीआरएफचा मदतीचा हात

September 26, 2026
11
वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला
ताज्या घडामोडी

वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

September 25, 2026
50
ताज्या घडामोडी

महामार्गावरील दुभाजक ठरतोय अपघातांना निमंत्रण

September 25, 2026
16
धान पिकावरील रोगराई व किडींच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी संकटात
ताज्या घडामोडी

धान पिकावरील रोगराई व किडींच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी संकटात

September 25, 2026
16
दुष्काळ परिस्थितीबाबत ३० सप्टेंबरनंतरच पुढील मूल्यांकन; पाऊस व पीकस्थितीच्या अचूक नोंदी ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
ताज्या घडामोडी

दुष्काळ परिस्थितीबाबत ३० सप्टेंबरनंतरच पुढील मूल्यांकन; पाऊस व पीकस्थितीच्या अचूक नोंदी ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

September 25, 2026
8
Next Post

उदगीर येथे आयोजित २०० व्या नेत्रशिबिरात ५४ यशस्वी शस्त्रक्रिया

ताज्या बातम्या

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

September 26, 2026
कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

September 26, 2026
जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 26, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In