• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पुण्यातील नोकरी सोडून जळकोटच्या तरुणाची दुग्ध व्यवसायात यशस्वी भरारी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 7, 2026
in ताज्या घडामोडी
0
पुण्यातील नोकरी सोडून जळकोटच्या तरुणाची दुग्ध व्यवसायात यशस्वी भरारी
0
SHARES
25
VIEWS
Ad 1

संगमेश्वर कटके यांची प्रेरणादायी यशोगाथा

जळकोट शहरातील तरुण श्री. संगमेश्वर मुरलीधर कटके यांनी पुण्यातील नोकरी सोडून गावाकडे परत येत दुग्ध व्यवसायात यशस्वी वाटचाल सुरू केली असून, त्यांच्या जिद्द आणि मेहनतीची परिसरात मोठी चर्चा होत आहे.

काही वर्षांपासून पुण्यात नोकरी करणारे संगमेश्वर कटके यांनी “माणूस कितीही दूर गेला तरी त्याची नाळ मातीतच जोडलेली असते” हे पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले आहे. शहरातील नोकरीपेक्षा स्वतःचा व्यवसाय उभारण्याचा निर्धार करत त्यांनी गावात दुग्ध व्यवसाय सुरू केला आणि आज ते दररोज सरासरी तीन हजार रुपयांपर्यंत उत्पन्न मिळवत आहेत.

RelatedPosts

मालगाडीच्या डब्यात नवजात बालिका आढळली; आरपीएफ जवानांच्या सतर्कतेमुळे चिमुकलीचे प्राण वाचले

पंजा भेटीनंतर खत्तल रात्र व खाई खेळणीचे कार्यक्रम उत्साहात संपन्न

नेशन बिल्डर टिचर्स अवॉर्डद्वारे शिक्षकांचा गौरव

सध्या त्यांच्या गोठ्यात जाफराबादी, मेसाणा, मुरा आदी जातींच्या सुमारे १२ म्हशी असून, दररोज ४० ते ५० लिटर दूध डेअरीला पुरवले जाते. संगमेश्वर कटके हे स्वतः जनावरांची देखभाल करतात. दूध काढण्यापासून चारा व्यवस्थापनापर्यंत सर्व कामे ते स्वतः मेहनत घेऊन करतात.

जनावरांच्या आरोग्यासाठी पोषक चारा, मिनरल मिक्सर पावडर तसेच योग्य आहार देऊन त्यांचे संगोपन केले जाते. त्यामुळे जनावरांची तब्येत चांगली राहून दुध उत्पादनातही वाढ होत असल्याचे त्यांनी सांगितले.

आर्थिक अडचणी, संघर्ष आणि खडतर प्रवासाचा सामना करत त्यांनी दुग्ध व्यवसायात यश मिळवले आहे. गावातील आणि बाहेरगावी रोजगारासाठी गेलेल्या तरुणांनी शेतीसोबत दुग्ध व्यवसायाकडे वळावे, असा संदेशही त्यांनी दिला.

संगमेश्वर कटके यांच्या या प्रेरणादायी यशोगाथेबद्दल जळकोट शहरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत असून, सारथी महाराष्ट्राचा परिवाराकडूनही त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

Tags: Sanjay Kalwase
Previous Post

जळकोट येथे श्री नृसिंह मंदिर मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलारोहण सोहळा उत्साहात

Next Post

आज दहावीचा निकाल जाहीर होणार; दुपारी १ वाजता ऑनलाईन पाहता येणार निकाल

Related Posts

ताज्या घडामोडी

मालगाडीच्या डब्यात नवजात बालिका आढळली; आरपीएफ जवानांच्या सतर्कतेमुळे चिमुकलीचे प्राण वाचले

June 26, 2026
10
ताज्या घडामोडी

पंजा भेटीनंतर खत्तल रात्र व खाई खेळणीचे कार्यक्रम उत्साहात संपन्न

June 26, 2026
13
ताज्या घडामोडी

नेशन बिल्डर टिचर्स अवॉर्डद्वारे शिक्षकांचा गौरव

June 26, 2026
17
ताज्या घडामोडी

सैनिक टाकळी गावच्या सैनिकी परंपरेला काळीमा फासणारी प्रस्तावित एमआयडीसी रद्द करा; ग्रामस्थांचा इशारा

June 26, 2026
5
ताज्या घडामोडी

हॉटेलमध्ये पिण्यायोग्य पाणी मोफत द्या; समोर लगेच बाटल्या ठेवू नका — आयुक्त तुकाराम मुंढे यांचे आदेश

June 25, 2026
8
ताज्या घडामोडी

कोल्हापूरच्या ‘पाटगावचा’ जगभर डंका; चौथीच्या इंग्रजी पुस्तकातून विद्यार्थ्यांना चाखायला मिळणार ‘मधाच्या गावाचा’ गोडवा

June 25, 2026
14
Next Post

आज दहावीचा निकाल जाहीर होणार; दुपारी १ वाजता ऑनलाईन पाहता येणार निकाल

ताज्या बातम्या

कडेगावात गगनचुंबी ताबूतांच्या भेटींचा सोहळा उत्साहात संपन्न

June 26, 2026

तुकाराम मुंढे यांच्या समर्थनार्थ कडेगावात आंदोलन; बदली न करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

June 26, 2026

निमसोड येथे स्मार्ट मीटर बसवण्यासाठी सक्ती व दमदाटी केल्याची तक्रार

June 26, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In