मळेगाव थडी येथील कवी श्री बाबासाहेब गंगाधर दाभाडे यांनी लिहिलेल्या ‘आठवणीचा हिंदोळा’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन शनिवार दिनांक २ मे २०२६ रोजी माननीय आमदार अशितोषदादा काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवशंकर विद्यामंदिर, रवंदे येथे उत्साहात पार पडले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुणे येथील ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकांत दादा वानखेडे हे होते. या प्रकाशन सोहळ्यास रयत शिक्षण संस्था सातारा जनरल बॉडी सदस्य श्री बाळासाहेब कचरू कदम, श्री अरुण चंद्रे सर, अश्वमेध ग्रुपचे अध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर वाकचौरे, के.जे.एस. कॉलेज हिंदी विभागप्रमुख डॉ. जीभाऊ मोरे, ऐसे जम महाविद्यालय कोपरगावचे डॉ. मोहन सांगळे, ज्ञानसिंधू प्रकाशनचे श्री तानाजी खोडे, डॉ. नितीन झंवर, ह.भ.प. अविनाश घोटेकर महाराज, कवी पंडित निंबाळकर, विलास दवंगे, गणपत दवंगे, संतोष दवंगे, गोरख दवंगे यांच्यासह मळेगाव थडी व रवंदे येथील ग्रामस्थ, मित्रपरिवार आणि पाहुणे मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अमोल चिने यांनी केले. साहित्यप्रेमींच्या उपस्थितीत पार पडलेल्या या प्रकाशन सोहळ्यामुळे परिसरात साहित्यिक वातावरण निर्माण झाले होते.









