धारणी (मेळघाट) | प्रतिनिधी :
“हे फक्त शिक्षण नाही, तर प्रत्येक गरीब, आदिवासी व वंचित मुलांच्या स्वप्नांना मिळालेली नवी दिशा आहे,” या विचारातून मेळघाट परिसरात मेलघाट शिक्षण लोकसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
दिनांक ७ मे २०२६ रोजी धारणी तहसील अंतर्गत कुसुमकोट येथील Montfort Convent शाळेत हा कार्यक्रम पार पडला. केजी ते पीजी या संकल्पनेतून भविष्याची भक्कम पायाभरणी करत दर्जेदार शिक्षण कसे उपलब्ध होईल, यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
या कार्यक्रमात मेळघाटातील आदिवासी समुदायातील जिल्हा परिषद शाळा, आश्रम शाळा व इतर शाळांतील विद्यार्थी, पालक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांना भविष्यात चांगले शिक्षण मिळावे व त्यांच्या स्वप्नांना दिशा मिळावी, यावर विशेष मार्गदर्शन करण्यात आले.
या उपक्रमात Sadaya Foundation, Unnati Sanstha, Ekalyavya Sanstha, Khoj Sanstha, तसेच Dayasagar Hospital आणि इतर सामाजिक संस्था व संघटनांनी सक्रिय सहभाग नोंदवला.
कार्यक्रमादरम्यान माजी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षणाच्या आठवणी सांगत नव्या पिढीला प्रेरणा दिली. शेकडो नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घेतला.
कार्यक्रमात Adv. जोस, वानखडे सर, प्रेम सर, हरिश्चंद्र सर, स्वामी डुसके, यशवंत गौड, झारेकर सर, मनोज सर, रामेश्वर फड, रणजीत घोडेस्वार, बन्सी परते, सुमित सर तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन ललिता ताई बेठेकर यांनी केले.
उषाताई बेलसरे, लक्ष्मण बेलसरे, सोनुताई भुसारे, अविनाश बेलसरे, पल्लविताई, सुमित्राताई, राजूभाऊ, वासुदेव, प्रवीण भाऊ, विशाल व इतर कार्यकर्त्यांची उपस्थिती लक्षणीय होती.
कार्यक्रमाच्या शेवटी भविष्यात असे उपक्रम सातत्याने राबवण्याची ग्वाही देत सर्वांनी एकत्रित शपथ घेतली.









