वर्धा |
अन्याय निवारण समितीच्या अध्यक्षा तथा प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या ज्वाला जांबुवंतराव धोटे यांनी नागपूर येथील मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्या जनसंपर्क कार्यालयाला भेट दिली.
या भेटीदरम्यान त्यांनी कार्यालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती घेतली. सामान्य जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी तसेच शासकीय योजना लोकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी हे कार्यालय कार्यरत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
“जनता आणि प्रशासन यांच्यातील संवाद अधिक बळकट होणे ही काळाची गरज आहे. मुख्यमंत्री जनसंपर्क कार्यालय त्या दृष्टीने प्रभावीपणे काम करत आहे, ही कौतुकास्पद बाब आहे,” अशी प्रतिक्रिया ज्वाला धोटे यांनी यावेळी दिली.
या प्रसंगी मुख्यमंत्री कार्यालयाचे OSD श्री. संजय मित्रा, RSS चे प्रमुख पदाधिकारी श्री. राजेंद्र बोकारे, दक्षिण पश्चिम विधानसभा समन्वयक श्री. नितीन महाजन, संजय गांधी निराधार योजना नागपूर अध्यक्ष श्री. नानाभाऊ महाल्ले तसेच भाजपा आध्यात्मिक सेलचे महामंत्री श्री. चंद्रकांत दुबे यांनी ज्वाला धोटे यांचे स्वागत केले.










