• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

एमआरपी विरोधात अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे राज्यव्यापी जनआंदोलन; ११ मे रोजी निवेदन मोहीम

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 9, 2026
in ताज्या घडामोडी
0
एमआरपी विरोधात अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे राज्यव्यापी जनआंदोलन; ११ मे रोजी निवेदन मोहीम
0
SHARES
28
VIEWS
Ad 1

पुणे : प्रतिनिधी

अखिल भारतीय ग्राहक पंचायत, मध्य महाराष्ट्र प्रांताच्या वतीने एमआरपी (Maximum Retail Price) व्यवस्थेतील ग्राहकविरोधी त्रुटींविरोधात तसेच ग्राहक संरक्षणासाठी कायदेशीर सुधारणा करण्याच्या मागणीसाठी राज्यव्यापी निवेदन मोहीम व जनआंदोलन छेडण्यात येणार आहे.

RelatedPosts

मालगाडीच्या डब्यात नवजात बालिका आढळली; आरपीएफ जवानांच्या सतर्कतेमुळे चिमुकलीचे प्राण वाचले

पंजा भेटीनंतर खत्तल रात्र व खाई खेळणीचे कार्यक्रम उत्साहात संपन्न

नेशन बिल्डर टिचर्स अवॉर्डद्वारे शिक्षकांचा गौरव

सोमवार दि. ११ मे २०२६ रोजी सर्व जिल्हाध्यक्ष, जिल्हा उपाध्यक्ष, जिल्हा सचिव, तालुका अध्यक्ष व कार्यकर्त्यांनी आपल्या जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून प्रधानमंत्री, केंद्रीय वित्तमंत्री आणि ग्राहक व्यवहार मंत्री यांना निवेदन सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या आंदोलनात लक्षवेधी आंदोलन, सत्याग्रह, धरणे आंदोलन, घोषणाबाजी, पत्रकार परिषद तसेच जनजागृती अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती संघटनेच्या वतीने देण्यात आली.

तालुकास्तरावरही तहसीलदारांना निवेदन देऊन एमआरपी विरोधातील जनजागृती प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

संघटनेच्या प्रमुख मागण्यांमध्ये प्रत्येक वस्तूवर उत्पादन खर्च छापणे, मनमानी एमआरपी बंद करणे, ग्राहकांसाठी न्याय्य किंमत निश्चित करणे, स्वतंत्र एमआरपी नियंत्रण प्राधिकरण स्थापन करणे आणि ग्राहकांची आर्थिक लूट थांबवणे यांचा समावेश आहे.

“ग्राहकांची लूट थांबवा”, “मनमानी MRP बंद करा”, “न्याय्य किंमत द्या” आणि “सशक्त ग्राहक – सक्षम भारत” अशी घोषवाक्ये देत ही व्यापक लोकचळवळ उभारण्यात येत असल्याचे प्रांताध्यक्ष बाळासाहेब सिताराम औटी यांनी सांगितले.

सर्व पदाधिकाऱ्यांनी शिस्तबद्ध व मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले आहे.

Previous Post

कै. शहाजीराव काकडे प्रशाला, ढोराळेची १०० टक्के निकालाची परंपरा कायम

Next Post

रांजणगाव गणपती येथे ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन

Related Posts

ताज्या घडामोडी

मालगाडीच्या डब्यात नवजात बालिका आढळली; आरपीएफ जवानांच्या सतर्कतेमुळे चिमुकलीचे प्राण वाचले

June 26, 2026
10
ताज्या घडामोडी

पंजा भेटीनंतर खत्तल रात्र व खाई खेळणीचे कार्यक्रम उत्साहात संपन्न

June 26, 2026
13
ताज्या घडामोडी

नेशन बिल्डर टिचर्स अवॉर्डद्वारे शिक्षकांचा गौरव

June 26, 2026
17
ताज्या घडामोडी

सैनिक टाकळी गावच्या सैनिकी परंपरेला काळीमा फासणारी प्रस्तावित एमआयडीसी रद्द करा; ग्रामस्थांचा इशारा

June 26, 2026
5
ताज्या घडामोडी

हॉटेलमध्ये पिण्यायोग्य पाणी मोफत द्या; समोर लगेच बाटल्या ठेवू नका — आयुक्त तुकाराम मुंढे यांचे आदेश

June 25, 2026
8
ताज्या घडामोडी

कोल्हापूरच्या ‘पाटगावचा’ जगभर डंका; चौथीच्या इंग्रजी पुस्तकातून विद्यार्थ्यांना चाखायला मिळणार ‘मधाच्या गावाचा’ गोडवा

June 25, 2026
14
Next Post

रांजणगाव गणपती येथे ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन

ताज्या बातम्या

कडेगावात गगनचुंबी ताबूतांच्या भेटींचा सोहळा उत्साहात संपन्न

June 26, 2026

तुकाराम मुंढे यांच्या समर्थनार्थ कडेगावात आंदोलन; बदली न करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

June 26, 2026

निमसोड येथे स्मार्ट मीटर बसवण्यासाठी सक्ती व दमदाटी केल्याची तक्रार

June 26, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In