अक्कलकोट (ता प्रतिनिधी) दि.८-अक्कलकोट तालुक्याचे तहसिल कार्यालया कडून मिळणाऱ्या प्रांत कार्यालया कडील जातीच्या दाखल मुद्दाम अडवणूक करुन वेळेवर दाखला मिळत नाही.तरी आता दहावी व बारावीच्या निकाल लागली असून दाखला वेळेवर देण्यात यावे अन्यथा रिपाइं(आठवले गट)च्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल अशा इशारा रिपाइं जिल्हा उपाध्यक्ष सैदप्पा झळकी यांनी केली आहे.
अक्कलकोट तालुक्यातील कमीत कमी एक हजारापेक्षा जास्त दाखला प्रांताधिकार्यालयात असून मुद्दाम आढवणूक केली जात असल्याचे सैदप्पा झळकी यांनी आमच्या प्रतिनिधीस बोलतांना व्यक्त केली आहे.आता नुकत्याच दहावी व बारावीच्या निकाल लागली असून त्यांना पुढील शिक्षणासाठी,आरक्षणा प्रमाणे एस सी,ओबीसी व नाॅनक्रिमिलियरची आवश्यकता असतात. तरी संबंधीत अधिकारी उप कार्यकारी अधिकारी सोलापूर यांनी वेळेवर लक्ष घालून दाखला मिळविण्याची व्यवस्था करावी अन्यथा रिपाइं कडून तिव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सैदप्पा झळकी यांनी केली आहे.









