• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

जिद्द आणि मेहनतीचे फळ! रिक्षाचालकाच्या कन्येची गगनभरारी; येणेगुरच्या कॅप्टन जोशी स्मारक विद्यालयाचा ९५.७१% निकाल

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 9, 2026
in ताज्या घडामोडी
0
जिद्द आणि मेहनतीचे फळ! रिक्षाचालकाच्या कन्येची गगनभरारी; येणेगुरच्या कॅप्टन जोशी स्मारक विद्यालयाचा ९५.७१% निकाल
0
SHARES
13
VIEWS
Ad 1

उमरगा प्रतिनिधी | ०८ मे २०२६

परिस्थितीवर मात करण्याची जिद्द, कठोर परिश्रम आणि शिक्षणाची ओढ असेल तर यश नक्कीच मिळते, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या दहावी (SSC) परीक्षेच्या निकालात उमरगा तालुक्यातील येणेगुर येथील कॅप्टन जोशी स्मारक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने घवघवीत यश संपादन करत ९५.७१ टक्के निकालाची नोंद केली आहे.

RelatedPosts

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

पर्लकोटा नदीच्या पुरात एसडीआरएफचा मदतीचा हात

वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

यंदाच्या निकालात मुलींनीच आपले वर्चस्व सिद्ध केले असून प्रथम, द्वितीय आणि तृतीय असे तिन्ही क्रमांक मुलींनी पटकावले आहेत. विशेष म्हणजे, रिक्षाचालकाच्या कन्येने शाळेत प्रथम क्रमांक मिळवत आपल्या कुटुंबासह गावाचे नाव उज्ज्वल केले आहे.

शाळेची गुणवंत विद्यार्थिनी कु. श्रावणी श्रीकांत कांबळे हिने ९०.२० टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. अत्यंत सामान्य परिस्थितीत रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या वडिलांच्या कष्टाचे चीज करत श्रावणीने हे यश मिळवले आहे. तिच्या यशामुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून सर्व स्तरांतून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

तसेच कु. आरती संजय लळे हिने ८९.२० टक्के गुण मिळवत द्वितीय क्रमांक, तर कु. संजना आशिषकुमार कांबळे हिने ८८ टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकावला आहे.

यावर्षी शाळेतून एकूण ७१ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी ६७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून शाळेचा एकूण निकाल ९५.७१ टक्के लागला आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

विद्यार्थ्यांच्या या यशामुळे येणेगुर गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी ही यशोगाथा प्रेरणादायी ठरत आहे.

Previous Post

जातीच्या दाखला वेळेवर द्या अन्यथा रिपाइं तर्फे आंदोलन-सैदप्पा झळकी

Next Post

गौरी गोविंद पौळ हिचे दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश; ९४ टक्के गुणांची चमकदार कामगिरी

Related Posts

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान
ताज्या घडामोडी

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

September 26, 2026
4
पर्लकोटा नदीच्या पुरात एसडीआरएफचा मदतीचा हात
ताज्या घडामोडी

पर्लकोटा नदीच्या पुरात एसडीआरएफचा मदतीचा हात

September 26, 2026
0
वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला
ताज्या घडामोडी

वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

September 25, 2026
42
ताज्या घडामोडी

महामार्गावरील दुभाजक ठरतोय अपघातांना निमंत्रण

September 25, 2026
14
धान पिकावरील रोगराई व किडींच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी संकटात
ताज्या घडामोडी

धान पिकावरील रोगराई व किडींच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी संकटात

September 25, 2026
16
दुष्काळ परिस्थितीबाबत ३० सप्टेंबरनंतरच पुढील मूल्यांकन; पाऊस व पीकस्थितीच्या अचूक नोंदी ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
ताज्या घडामोडी

दुष्काळ परिस्थितीबाबत ३० सप्टेंबरनंतरच पुढील मूल्यांकन; पाऊस व पीकस्थितीच्या अचूक नोंदी ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

September 25, 2026
8
Next Post
गौरी गोविंद पौळ हिचे दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश; ९४ टक्के गुणांची चमकदार कामगिरी

गौरी गोविंद पौळ हिचे दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश; ९४ टक्के गुणांची चमकदार कामगिरी

ताज्या बातम्या

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

September 26, 2026
कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

September 26, 2026
जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 26, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In