• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

लोकनेते हितेंद्र ठाकूर यांच्या पाठपुराव्याला यश; विरारमधील नारंगी उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 9, 2026
in ताज्या घडामोडी
0
लोकनेते हितेंद्र ठाकूर यांच्या पाठपुराव्याला यश; विरारमधील नारंगी उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला
0
SHARES
20
VIEWS
Ad 1

विरार | प्रतिनिधी

विरार शहराच्या वाहतूक व्यवस्थेसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणारा बहुप्रतीक्षित नारंगी रेल्वे उड्डाणपूल अखेर नागरिकांच्या सेवेत दाखल झाला आहे. लोकनेते हितेंद्र ठाकूर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्णत्वास आला असून, पुलाच्या लोकार्पणामुळे विरारकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

RelatedPosts

पर्लकोटा नदीच्या पुरात एसडीआरएफचा मदतीचा हात

वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

महामार्गावरील दुभाजक ठरतोय अपघातांना निमंत्रण

केंद्र सरकार आणि महाराष्ट्र राज्य सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून उभारण्यात आलेला हा पूल वाढत्या वाहतुकीचा ताण लक्षात घेऊन चार पदरी करण्यात आला आहे. सुरुवातीला दोन पदरी असलेल्या आराखड्यात बदल करून भविष्यातील गरजांचा विचार करत चौपदरी पुलाचा आग्रह लोकनेते हितेंद्र ठाकूर यांनी धरला होता. त्यासाठी तत्कालीन आमदार क्षितिज ठाकूर, माजी महापौर नारायण मानकर तसेच स्थायी समिती सभापती प्रवीण शेट्टी यांनीही प्रशासनाशी सातत्याने समन्वय साधला.

पुलाच्या विस्तारित आराखड्यामुळे कामाच्या कालावधीत वाढ झाली असली तरी नागरिकांच्या कायमस्वरूपी सोयीचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला होता. यापूर्वी विरार पूर्व-पश्चिम जोडणाऱ्या एकमेव उड्डाणपुलावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत होती. अवघ्या काहीशे मीटरच्या अंतरासाठी नागरिकांना तासन्‌तास अडकून राहावे लागत होते. मात्र, नवीन चौपदरी पुलामुळे ही समस्या मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.

पुलाच्या कामाची गुणवत्ता आणि सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी महापौर अजीव पाटील आणि सभागृह नेते प्रफुल्ल साने यांनी प्रत्यक्ष पाहणीही केली होती. तसेच जुन्या फाटकाजवळ नागरिकांसाठी कायमस्वरूपी भुयारी मार्ग उपलब्ध व्हावा, यासाठीही प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात आला होता.

अखेर सर्व तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करून हा पूल नागरिकांसाठी खुला करण्यात आला असून, यामुळे विरारच्या वाहतूक व्यवस्थेला मोठा दिलासा मिळणार आहे. शहराच्या विकासाच्या दृष्टीने हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

Tags: Mahadev Sutar
Previous Post

कुडाळ-मालवण तालुक्याच्या खरीप पूर्वतयारीचा आढावा; आमदार निलेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न

Next Post

सावरगाव अत्याचारग्रस्त चिमुकलीची वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांकडून भेट; न्यायासाठी लढा सुरू ठेवण्याची ग्वाही

Related Posts

पर्लकोटा नदीच्या पुरात एसडीआरएफचा मदतीचा हात
ताज्या घडामोडी

पर्लकोटा नदीच्या पुरात एसडीआरएफचा मदतीचा हात

September 26, 2026
0
वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला
ताज्या घडामोडी

वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

September 25, 2026
40
ताज्या घडामोडी

महामार्गावरील दुभाजक ठरतोय अपघातांना निमंत्रण

September 25, 2026
14
धान पिकावरील रोगराई व किडींच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी संकटात
ताज्या घडामोडी

धान पिकावरील रोगराई व किडींच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी संकटात

September 25, 2026
16
दुष्काळ परिस्थितीबाबत ३० सप्टेंबरनंतरच पुढील मूल्यांकन; पाऊस व पीकस्थितीच्या अचूक नोंदी ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
ताज्या घडामोडी

दुष्काळ परिस्थितीबाबत ३० सप्टेंबरनंतरच पुढील मूल्यांकन; पाऊस व पीकस्थितीच्या अचूक नोंदी ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

September 25, 2026
8
नवेगाव येथे सिद्धीविनायक गणेश मंडळाचा गणेशोत्सव उत्साहात
ताज्या घडामोडी

नवेगाव येथे सिद्धीविनायक गणेश मंडळाचा गणेशोत्सव उत्साहात

September 24, 2026
7
Next Post
सावरगाव अत्याचारग्रस्त चिमुकलीची वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांकडून भेट; न्यायासाठी लढा सुरू ठेवण्याची ग्वाही

सावरगाव अत्याचारग्रस्त चिमुकलीची वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांकडून भेट; न्यायासाठी लढा सुरू ठेवण्याची ग्वाही

ताज्या बातम्या

पर्लकोटा नदीच्या पुरात एसडीआरएफचा मदतीचा हात

पर्लकोटा नदीच्या पुरात एसडीआरएफचा मदतीचा हात

September 26, 2026
सुरजागड इलाक्यातील विविध समस्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

सुरजागड इलाक्यातील विविध समस्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

September 26, 2026
अपर तहसीलच्या निर्णयाने जारावंडीच्या तोंडाला पाने पुसली!

अपर तहसीलच्या निर्णयाने जारावंडीच्या तोंडाला पाने पुसली!

September 26, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In